पालक आपल्या पाल्यांना नोकर बनवण्यासाठी जबाबदार तर नाहीना?

आज मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, पालक आपल्या पाल्यांना नोकर बनवण्यासाठी जबाबदार तर नाहीना? माझा हा प्रश्न काही पालकांना कदाचित वेगळाच वाटला असेल. काहीं पालकांना समजलाच नसेल तर काही पालकांनी या प्रश्नावर  विचार करायला सुरूवात केली असेल. कोणत्याही पालकाला आपला पाल्य नोकर झाला पाहीजे असे कधीच वाटणार नाही.

https://www.khadedipak.com
पालक आपल्या पाल्यांना नोकर बनवण्यासाठी जबाबदार तर नाहीना? 
 मुळात पालक तर आपल्या पाल्यांना उत्तम जीवन जगता यावे म्हणून मेहनत करत असता, कष्ट करत असता. आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करत असतात.पाल्याच्या भविष्याचा विचार करत असताना आपल्या वर्तमानकाळात जगणंही विसरून गेलेले असतात. असं असेल तर मग पालक  कसे जबाबदार असू शकतात? हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल.
प्रत्येक पालक हा आपल्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सतत काबाड कष्ट करत असतो. प्रत्येक पालकांना त्यांची मुले मोठी अधिकारी , मोठ्या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असताना पाहण्याची इच्छा असते. आपले पाल्य एकदा की त्यांच्या स्वताच्या पायावर उभी राहिली, की मग विषय असतो लग्नाचा. एवढे केल्याने आपली जबाबदारी संपली असं पालकांना वाटत असते.

https://www.khadedipak.com
पाल्यांना हवी असते आपल्या पालकांची साथ
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काही पालक आपल्या पाल्यांना सर्वच मोकळीक देतात पण वेळ द्यायला आज त्यांच्याकडे वेळच नाही. आपला बहुतांश वेळ एकतर सतत आपल्या कामानिमित्त आॕफीसमध्ये नाहीतर घरी आल्यावर मोबाईलमध्ये. पाल्यांना आपल्या पालकांच्या सहवासाची सर्वात जास्त गरज असते. आपले मत पाल्यांवर लादून जबरदस्तीने त्यांना शिकवणे हे काय चुकीचे नाही का? आपल्या पाल्यांचे मत न जानता आपल्या इच्छापुर्तीसाठी त्यांचे विचारांचा बळी घेणे चुकीचे नाही का? कुणाचीतरी बरोबरी करण्यासाठी आपल्या पाल्यांचे स्वप्नावर पाणी फिरवणे चुकीचे नाही का? मित्राचा मुलगा इंजिनियर झाला म्हणून आपल्या पाल्यांनाही इंजिनियर बनवण्यासाठी केलेली जबरदस्ती अयोग्य नाही का?

पालक आपल्या पाल्यांना नोकर बनवण्यासाठी जबाबदार तर नाहीना?
पालक आणि पाल्य यांच्यातील चांगले संबंध 

पालक जर पाल्यांना विश्वासात न घेता त्यांना काय बनवायचे हे ठरवून खरच त्यांचे भविष्य सुरक्षित करत आहे का? एखाद्याच्या मनाविरुद्ध काम करताना ती व्यक्ती खरच मनातून खुश असेल का? पाल्यांना स्वताचे निर्णय घेण्याची मुभा असली पाहीजे. अर्थातच यात पालकांच्या निर्णयही असला पाहीजेच. आपण आपल्या पाल्यांना स्वावलंबी बनवण्याचे सोडून त्यांना परावलंबी बनवण्यासाठी कसरत करत असतो. हळूहळू पाल्यांना याची सवय जडत जाते. आपणच नकळतपणे आपल्या पाल्यांना बेजबाबदार बनवण्यासाठी जबाबदार असतो. कालांतराने आपणच त्याच्याकडून जबाबदारीने वागण्याची आशा लावून बसतो. जे आपण त्यांना दिलेच नाही त्याची अपेक्षा कशासाठी?

पालक आपल्या पाल्यांना नोकर बनवण्यासाठी जबाबदार तर नाहीना?
पाल्यांना त्यांचे निर्णय स्वःत घेऊ द्या.

आपल्या पाल्यांना भविष्यात काय बनवायचे आहे, प्रत्येक पालकांना असं वाटणं साहजिकच आहे यात तिळमात्रही शंका नाही. पालकांनी आपल्या भावना बाजुला ठेवून आपल्या पाल्यांची इच्छा जाणुन घेतली पाहीजे. आपल्या पाल्याला कुठल्या विषयात आवड आहे हे जाणून घेतले पाहीजे. यासाठी पालकांना आपल्या पाल्यांना वेळ द्यावा लागेल. पालक म्हणून नाहीतर मित्र बनून पाल्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील. आवश्यक नाही की पाल्य अभ्यासातच हूशार असला पाहीजे. त्याचे मन जर खेळाडू बनण्याचे असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. ते नियमित अभ्याससुद्धा करतील. कुणाचे मन फोटोग्राफीकडे आकर्षित होत असेल. कुणी संगीत शिकण्यासाठी इच्छूक असेल. आपले पाल्य बरयाचदा कला क्षेत्रात जाण्यासाठी उत्सुक असतात.

पालक आपल्या पाल्यांना नोकर बनवण्यासाठी जबाबदार तर नाहीना?
शिक्षणासाठी पाल्यांवर दबाव टाकू नका

काही पाल्य आपल्या पालकांच्या आग्रह आणि हट्टापायी त्यांचा निर्णय स्विकारतात. निर्णय स्विकारून डाॕक्टर,वकील,इंजिनियर,प्राध्यापक बनतात. योगायोग चांगली नोकरीही मिळते मात्र आपल्या आयुष्यात ते खुश नसतात. पाल्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काम करावं लागते. पालक खुश असावेत म्हणून खोटे हास्य तोंडावर घेऊन मिरत असतो. आतुन एवढ्या असहनीय वेदना ते सहन करत असतात. पालकांनी आपल्या खोट्या आणि स्वयंघोषीत प्रतिष्ठेला बाजुला ठेवले पाहीजे. आपल्या प्रतिष्ठेसाठी आपल्या पाल्यांना आयुष्यभरासाठी दुःख देऊ नका. आपल्या पाल्यांना जिवंतपणीच मरणाची अनुभुती करवून देऊ नका.
पालकांना नेहमीच वाटत असते की परपंरागत चालत आलेला शिक्षणाचा वारसा आपल्या पाल्यांनीही सुरू ठेवावा. इंजिनियरची मुले इंजिनियरच कशासाठी. डाॕक्टरची मुले डाॕक्टरच कशासाठी. शिक्षकाची मुले शिक्षकच कशासाठी. मुलामध्ये इंजिनियर,डाॕक्टर,शिक्षक किंवा वकील बनण्याची इच्छाच नसेल तर मग एवढा हट्ट कशासाठी. काही पाल्यांना मोठे झाल्यानंतर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल. त्यांना त्याच्यासाठी आवश्यक तेवढी मदत पालकांनी का करू नये. पाल्यांना लहानपणापासूनच पैशाची भिती घातलेली असते. आपण ते खरेदी करू शकत नाही. आपली ऐपत नाही. एवढे  नकारात्मक विचार वारंवार पालक आपल्या पाल्यांच्या मनात रुजवत असतात. व्यवहारिक ज्ञान देण्याचे सोडून आपण त्यांच्या मनात भिती घालत असतो.

https://www.khadedipak.com
पाल्यांची इच्छा जाणुनच त्यांचे भविष्य सुरक्षित करा.

अभ्यास महत्त्वपुर्ण आहेच. त्याहुन महत्त्वपुर्ण आहे व्यवहारिक ज्ञान आणि त्याची समज. फक्त पुस्तके वाचून आयुष्य जगता येत नाही. शाळेत, महाविद्यालयात शिकवलेल्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या अस्सल आयुष्यात खुप कमी प्रमाणात होत असतो. पालकांनी पाल्यांच्या चांगल्या भविष्यासाठी शालेय शिक्षण द्यावेच. शालेय शिक्षणासोबत पैसे आणि त्याचे दैनंदिन जीवनात असलेलं महत्व ही पटवून द्यावे. पैसे योग्यप्रकारे कसे ,कुठे गुंतवावे याचे धडे द्यायला सुरूवात करायला पाहीजे. जेणेकरून शिक्षण संपल्यानंतर पैशाची किंमत पाल्यांना माहीती असेल. व्यवहारिक जीवनात पदार्पण करताना योग्य निर्णय घेण्याची समज असेल.
पालकांनी आपल्या पाल्यात असलेल्या गुणांचा आणि कौशल्याचा मान ठेवला पाहीजे.  त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहीजे. पाल्यांची आवड कशामध्ये आहे याकडे लक्ष दिले पाहीजे.  समाजाला चांगला माणूस मिळवून देण्यासाठी पालकांनी  प्रयत्नशील असायला हवे. चला तर मग करूया निर्धार मनाशी, नाते घट्ट करूया आपल्या पाल्यांशी. देऊन वेळ पाल्याला, देऊया माणूस चांगला जगाला.
आणखी पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

3 thoughts on “पालक आपल्या पाल्यांना नोकर बनवण्यासाठी जबाबदार तर नाहीना?”

  1. Khar ahe mulanna apan nokarach banwat ahe. Tyanna udyojak banvanyasathi apan prayatna kele pahije.

    Palkano jage vha. Apalya mulanche bhavishyasathi tumchi ichcha lady naka.

    Reply

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?