यशाची चावी SUCCESS KEY

जिवनामध्ये यश कुणाला नकोय, असा जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही.यश तर सर्वांनाच हवे आहे.पण हे सर्वांना मिळेलेच असही नाही. यश मिळविण्यासाठी व ते पचवण्यासाठी खुप मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे.

मग नेमकी ही यशाची चावी आपल्याला सापडणार तरी कुठे. तुम्हाला एकाच प्रयत्नामध्ये यश मिळेल असंही नाही,कदाचित भरपूर प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला यश मिळू शकेल. 

जगामध्ये अशाप्रकारचेही भरपूर व्यक्ती आहेत ज्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळाले आहे आणि अशाही व्यक्ती आहेत की ज्यांनी असंख्य प्रयत्न केल्यानंतर यश मिळाले.

https://www.khadedipak.com
KEY FOR SUCCESS
यश मिळविण्यासाठी आपले ध्येय काय आहे ते आपल्याला माहीत पाहीजे, जर तुम्ही तुमचे ध्येय ठरवले नसेल तर अगोदर आपले ध्येय निश्चित करा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची,माहिती गोळा करा, त्यासंबंधीत जी माहिती मिळेल ती एकत्रित करा व त्याबद्दल वाचन करा. 

आपल्या ध्येयासंबंधित जे काही उपयोगी पुस्तक ,लेख,इंटरनेटवर नविन माहिती याचा संग्रह करा. मिळालेल्या माहितीचा सविस्तर खोलवर अभ्यास करा व आपल्या भाषेमध्ये आपल्याला उपयोगी असणाऱ्या व आपल्या विचार पेपरवर लिहित चला. सर्व बाबींवर अत्यंत बारकाईने लक्ष देऊन काम करा.

https://www.khadedipak.com
SUCCESS KEY

स्वतावर  आत्मविश्वास ठेवा:

आपण एखाद्या ध्येयाची पुर्तता करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो, पण या मार्गावर चालत असताना अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. या समस्या कुठल्याही प्रकारच्या असु शकतात, जरूरी नाही कि सर्व समस्या आपल्या ध्येयासंबंधितच असतील,पण त्यावर मात करित आपल्याला पूढे जायचे आहे हे आपल्या लक्षात असले पाहीजे. 

त्यासाठी स्वतावर आत्मविश्वास असला पाहिजे.आपण हाती घेतलेले कार्य आपण करू शकतो, होय मला हे नक्कीच जमेल, मी हे करू शकतो असा  सकारात्मक विचार तुमच्यात असलाच पाहिजे तरच आपल्या ध्येयाची पुर्तता आपण करू शकतो असा मला विश्वास आहे.

अपयश मिळाल्यास खचून न जाणे:

बरेच लोक आपल्या ध्येयाची पुर्तता करत असताना त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो,त्यामुळे ते दुखी होतात,हताश होतात आणि आपले काम मध्येच सोडून देतात. आपल्या मनाशी ठरवून घेतात की हे काम आपण करू शकत नाही. 

त्यांचा स्वतावर असलेला विश्वास कमी कमी होत जातो व आपण हाती घेतलेले काम मध्येच सोडून देतो. पण आपण कुठे चुकलो असेल?, कुठल्या गोष्टीची कमतरता राहून गेली असेल?, आपण कुठे कमी पडलो?,यासर्व बाबींवर विचार करण्याचा विचारच त्यांच्या मनामध्ये येत नाही.

अगदी मोजकेच व्यक्ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहचलेली आहे, त्यांनी कधी अपयशाचा सामना केला नसेल असही नाही याउलट म्हणजेच ह्या सर्व व्यक्तींनी भरपूर वेळेस अपयश पचवले आहे,असंही म्हणायला हरकत नाही कि या व्यक्तींनी अपयशाच्या भरपूर पायऱ्या चढलेल्या असतात तरीही आपल्या ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने पून्हा भरारी घेऊन अपयशाचे जिने चढून यशाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेतला आहे.

https://www.khadedipak.com
SUCCESS

जिद्द आणि चिकाटी:

कुठल्याही ध्येयाचा पाठलाग करत असताना तुमच्यात जिद्द आणि चिकाटी असायला पाहिजे. चिकाटीने काम करताना जर ते काम पूर्ण करण्याची जिद्द जर असेल तर आपण नक्कीच आपल्या ध्येयाचा यशस्वी पाठलाग करून तिथपर्यंत पोहचू शकतो. 

तुमच्यात जर जिद्द असेल तर तुम्हाला कुणीच थांबवू वा रोखून ठेवू शकणार नाही.आपल्या जिद्दीचा एक उपयोगी टूल म्हणून वापर करा.जिद्द आणि चिकाटी असेल तर आपले ध्येय आपण लवकर गाठू शकतो यात मला तिळमात्रही शंका नाही.


अपयशावर मात:


मिळालेल्या अपयशावर मात करणे म्हणजे नेमके काय? अपयश हे काही कायमस्वरुपी तुमच्या पदरात पडलेले नसते तर ते आपल्याला मजबूत व स्थिर राहण्यासाठी मदत करत असते. 

अपयश मिळाले म्हणून खचून न जाता आपल्या हाथुन काही गोष्टी  करण्याच्या राहून गेल्या असतील.बहुतांशवेळी आपणा बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो,आपल्याला ती गोष्ट त्यावेळी एवढी महत्त्वाची वाटत नसते आणि नेमकी तीच आपल्या अपयशाचे कारण बनते.

अशावेळी आपल्या कामापासून थोड्या दिवस दूर राहिले पाहिजे. फिरायला जाणे, आपले आवडते छंद जोपासने,मित्रांना भेटने,गप्पा मारने यासर्व गोष्टी काहीदिवस तरी करायलाच हव्या. यामुळे सततच्या कामामुळे आलेला थकवा दूर होण्यास मदत होईल. 

मन हलके व प्रसन्न झाल्यासारखे आपल्याला जाणवेल. एक विश्रांती आपल्याला मिळालेली असते, त्यानंतर परत एक प्रसन्न मन घेऊन कामाला सुरूवात करावी. सुरवाततीपासून सर्व बारीकसारीक बाबीं तपासून बघायला सुरूवात करा. कुठेतरी आपल्या हाथुन झालेली चूक किंवा एखादे काम करावयाचे राहून गेले असल्यास ते आपल्या लक्षात येईल. 

ती दुरूस्त करून बघा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचले असाल.

बहुतांशवेळी सततच्या कामामुळे आपण लहानशा बाबींवर लक्ष देत नाहीत किंवा आपल्या लक्षात येत नाही,यावेळी आपल्या बुद्धीला थोड्या विश्रांतीची आवश्यकता असते.

वरील सांगितलेल्या सर्व यश मिळविण्यासाठी लागणाऱ्या चाव्याच आहेत,आता ते सर्व तुमच्या हातात आहेत ह्या चाव्यांचा वापर तुम्ही कसा करून घेतात.

         

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?