ताणमुक्त होऊन कसे जगावे?


टेंशन(ताण)

टेंशन काहीना काही कारणांमुळे, कळत-नकळत येत असते. काही करावे तर टेंशन नाही करावे तरिहि टेंशन. माणूस ज्यावेळी रिकामा बसलेला असतो म्हणजेच काही कामामध्ये व्यस्त नसतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचारांचे भयंकर युद्ध पेटलेले असते.

तो सतत भूतकाळात घडलेल्या व भविष्यात घडणाऱ्या गोष्टीवर विचार करत असतो मग ह्या सर्व गोष्टीचा होणारा त्रास टेंशन ह्या समस्येला नकळतपणे जन्म घालतो.
ताणमुक्त होऊन कसे जगावे?
ताणमुक्त होऊन कसे जगावे?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ताण येणं हे माणसाला नैसर्गिकरित्या लाभलेलं आहे. तुम्ही कितीही ठरवलं की, आज ताण घ्यायचा नाही. खरंतर तुम्ही नकळत त्या ताणाविषयी विचार करत असतात. सतत एखाद्या गोष्टींचा सतत विचार राहील्यानेच तुमच्या मानावर ताण येत असतो. 
ताण आपला अविभाज्य घटकच आहे. आता ते आपल्यावर अवलंबून आहे की, आपण ही परिस्थिती कशी सांभाळतो. आपल्यावर येणाऱ्या ताणाचा प्रभाव आपण नक्कीच कमी शकतो. ताण आपल्यावर एक वेगळा प्रभाव टाकत असतो. 
जर हा ताण आणि त्याचा वाईट प्रभावापासून आपल्याला सुरक्षित  रहावे लागणार आहे. या वाईट प्रभावापासून आपण स्वताला सुरक्षित कसे ठेऊ शकतो? आपल्याला आवड असलेले कामे करायला सुरूवात करा. दररोज आणि नियमितपणे आपल्याला आवड असलेली कामे करण्यासाठी वेळ काढा. आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

 छंद जोपासण्यामुळे मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्यावर मानसिक ताण वाढत जात असतो. वाढत चाललेल्या मानसिक ताणांमुळे आपली चिडचिड होते. चिडचिड वाढल्याने आपण वाईट सवयींला आपण बळी पडत असतो. 

वाईट सवयीमुळे आपले आयुष्यही अडचणीत येते. आपआपसांत वादविवाद वाढत जातात. जर आपण आपला काही वेळ आपला छंद जोपासण्यासाठी दिला,तर आपल्यावरील ताण नक्कीच कमी होईल. आपण वाईट सवयींपासून स्वताला दूर ठेवण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. 
आपल्यावर आलेल्या ताणाचा परिणाम आपल्या मनावर होत आसतो. या ताणामुळे आपले मन थकुन जात असते. स्वताचे मानसिक खच्चीकरण होण्यास सुरूवात होत असते. थकलेल्या अवस्थेत आपण काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आपली मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला काही नवीन कामात आपल्याला गुंतवून ठेवावे लागणार आहे. एक-दोन तास दररोज आपण आपल्या छंदासाठी द्यायलाच पाहीजे. आपल्याला आवड असलेल्या गोष्टी करत असताना, आपले मनावरील ताण कमी होत जातो.

ह्या टेंशनमुळेअनेकांना आपले प्राण गमवावे लागतात हे तर आपण जाणतोच.पण तरिही कितीही ठरवले की आता टेंशन घ्यायचे नाही तरिही ते आपला पाठलाग सोडत नाही. यामुळे विविध आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागते जसे कि हृदयविकार,रक्तदाब इत्यादी .

या टेंशनपासून आपण पळवाट नक्कीच काढु शकतो एवढे मात्र नक्की, पण ते कसे काय असा प्रश्न आपल्या सर्वांना पडणे योग्यच आहे. त्यासाठी आपल्याला दररोज किमान १-२तास वेळ देणे आवश्यक आहे, आता मी काही तुम्हाला कुठली कसरत करायला सांगणार नाही त्यामुळे तुम्ही सुटकेचा श्वास घेऊ शकता.

१-२ तास वेळ दररोज द्या तो आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, की असं म्हणुया आपल्या छंदासाठी(Hobbies). होय छंद मग तो कुठलाही असो गाणी ऐकणे,फिरायला जाणे,फोटोग्राफी,स्केचींग,कविता लिहिणे,मूव्हि बघणे किंवा मग कुठल्याही प्रकारचे खेळ खेळणे. 

असे केल्यास आपण दिवसभराच्या कटकटीतून कुठेतरी खूप दूर येऊन थांबतो व मन प्रसन्न राहते. मग मन प्रसन्न म्हटले की नो टेंशन.

बघा वेळ काढुन छंद जोपासण्याचा प्रयत्न करा व कळत-नकळत येणाऱ्या टेंशनपासून दूर रहा.

“छंद जोपासा व ताणमुक्त रहा.

4 thoughts on “ताणमुक्त होऊन कसे जगावे?”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?