महारथी अंगराज कर्ण आणि श्रीकृष्ण यांच्यातील कुरूक्षेत्रातील शेवटचा संवाद.


आज माधव रथ युद्धभुमीपासून दूर घेऊन जात होते. माधवच्या मनात काहीतरी सुरू असल्याचे मला स्पष्ट जाणवत होते. अर्जुनलाही काहीच समजत नव्हते. माधव काहीच ऐकू येत नसल्याचं उत्तम अभिनय करत होते. माझे मन विचलित होत होते. आता मात्र माझा धीर सुटत चालला होता. मी अर्जुनाला युद्धासाठी पुकारले. अर्जुनचे बाण हवेच्या विपरीत मारा करत होते. असाच एक बाण माझ्या छातीला थोडासा भेदत आत शिरला. असा महान धनूरधर पाहुन आज आनंद झाला होता. हा महान धनुरधर माझाच धाकटा भाऊ आहे याचा अभिमानही वाटत होता. 
https://www.khadedipak.com
राधेय कर्ण

अजुनही माधव रथ थांबवण्यास तयार होत नव्हते. एकदा रथ थांबवुन त्यांनी मला अजुनतरी माझी थांबण्याची वेळ आलेली नाही असे सांगितले. रथ परत युद्धभुमीपासून दूर घेऊन जाण्यास सुरूवात केली. मी ब्रम्हास्त्राचे आवाहन करणार असल्याचे माधवला ओरडून सांगितले. माधव जराही आश्चर्यचकित झालेले नव्हते. अर्जुन मात्र चिंतेत दिसत होता. मी ब्रम्हास्त्राचे आवाहन करण्यास सुरूवात केली. 

अर्थातच अर्जुनलाही ब्रम्हास्त्राचे आवाहन कसे करायचे हे माहीत होते. अर्जुननेही ब्रम्हास्त्राचे आवाहन करण्यासाठी सुरुवात करणार तोच माधवने अर्जुनास असे नको करू म्हणुन खुनवले. बघता बघता ब्रम्हास्त्राचे आवाहन पुर्ण झाले पण हे काय मला अनुसंधान विधीचा विसर कसा काय होतो आहे? मला कळतच नव्हते आज माझ्याबरोबर काय घडत आहे. मी पुन्हा पुन्हा ब्रम्हास्त्राचे आवाहन करू लागलो. ब्रम्हास्त्र प्रकट होऊन लगेचच लुप्त होऊ लागले.

https://www.khadedipak.com
सूर्यपुत्र कर्ण

थोड्यावेळ मला विश्वासच बसत नव्हता पण हेच खरे होते.  अचानक माझ्या रथाचे संतुलन बिघडले आणि मी रथापासून दूर जाऊन जमिनीवर पडलो. माझा विजय धनुष्य माझ्यापासून दूर रथामध्येच पडला होता. बघतो तर काय रथाचे चक्र दलदलमध्ये फसले होते. मी रथाचे चक्र काढण्यासाठी प्रयत्न करू लागलो.

मी माझे सारथी असलेले मद्रराज शल्य यांना चक्र काढण्यासाठी आवाज दिला. मद्रराज यांचा माझ्यावर एवढा राग होता की त्यांनी मदत करण्यासाठी नकार दिला. मी एकटाच रथाचे चक्र काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. आज जणू ही धरासुद्धा चक्राला सोडणार नाही असे वाटत होते. तेवढयात एक आवाज माझ्या कानावर येऊन धडकला. तो आवाज आणि ते शब्द ऐकल्यावर माझा स्वतावर विश्वासच बसत नव्हता.

https://www.khadedipak.com
मृत्युंजय कर्ण

माधवने अर्जुनास मला युद्धासाठी आवाहन देण्याचे सांगितले होते. मी विरथ असताना, माझ्याकडे शस्त्र नसताना माधव अशी अनिती कशी करू शकतात. मी माधवला विचारले, माधव ही कुठली निती?, हाच का तुमचा धर्म? अर्जुनचे मनही विचलीत झाले होते. अर्जुनही एका निशस्त्र योद्ध्यावर बाणांचा मारा करण्यास तयार होत नव्हता. केशवने पांचालीचा झालेला अपमान आणि अभिमन्यूचा महारथींनी मिळून केलेली हत्याची आठवण करून दिली. मी पून्हा एकदा मद्रराज शल्य यांना माझा धनुष्य देण्यासाठी विनंती केली. केशवने मद्रराजला आपल्या बरोबर झालेल्या फसवणूकीचा प्रतिशोध घेण्याची ही योग्य वेळ आहे असे सांगितले. पांडवांच्या मामा होण्याचा धर्म पाळून एक मदत करा असे सांगितले.


https://www.khadedipak.com
महादानवीर कर्ण

भावूक झालेल्या अर्जुनाच्या धनुष्यातुन दोन धारदार बाण माझ्या दिशेने यायला निघाले. क्षणाचाही वेळ न जाता ते बाण माझ्या छातीत रूतले. मी परत माधवला प्रश्न केला. धर्माच्या रथावर बसून अधर्माचा बाण चालवण्याचा काय उद्देश होता?  हाच  तुमच्या देवअवतार घेण्याचे कारण होते का? माधव मला उत्तर द्या. मी माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी योगेश्वराकडे याचे उत्तर मागितले होते. सुर्यास्ताची वेळ होती. आकाशही लालसर झालेले होते. दूरदूरपर्यंत आमच्याशिवाय दुसरे कुणीच नव्हते.

माझी मान किंचीत खाली झुकलेली होती. त्या योगेश्वराच्या डोळ्यांच्या इशारा जणू या सृष्टीलाही समजला होता. क्षणातच सर्वकाही स्तब्ध झालेले होते. सुर्यास्ताला जाणारे सुर्यदेव जणूकाही विश्रांती घेण्यासाठी एका जागेवर स्थिर होऊन थांबलेले होते. माझी दृष्टी वर माधवाकडे गेली. माधव आणि माझ्या व्यतिरिक्त सर्व स्तब्ध झाले होते. त्या योगेश्वराने माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कालचक्रही थांबवले होते. आकाशात उंच उडणारे पक्षी एकाच जागी स्थिर झालेले होते.

अर्जुन आपल्या धनुष्याची प्रत्यंचा खेचताना स्थिर झालेला होता. अर्जुनाच्या रथावरील ध्वजही स्तब्ध झाला होता. आता मला कळून चुकले होते की ही सर्व या देवकीनंदन श्रीकृष्णाचीच माया होती. मी माझ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्याकुळ झालो होतो. जर माधव भगवंताचाच अवतार आहे तर हा अन्याय का केला? हा अधर्म कसा करू शकता? 

माधव आपल्या रथातुन खाली उतरुन माझ्याकडेच येत होते. ते जसजसे माझ्याजवळ येत होते, तसतसे मला होणारा त्रास कमी होत चालला होता. मला नेमके आज माझ्यासोबत काय घडत आहे हे कळतच नव्हते. माधवाने आपले दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. मी थोडासा झुकलेला होतो. माधवने मला ताठ उभे केले. क्षणातच माझ्या सर्व वेदना नाहीशा झाल्या. मला आश्चर्य वाटले. माधवने मला माझ्या प्रश्नाची उत्तरे सर्वांसमोर देता येत नाही म्हणून सांगितले.

माधवाने कोमळ स्वरात आवाज देत म्हणाले राधेया, तुला अजुनही तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. मी पण म्हणालो तुम्ही तर सारथी आहात ना रथीच्या मनातलं ओळखतात. तुम्हीच सांगा , माझ्या मनात काय सुरू आहे. राधेया,माझ्या सखा,तुझे वचन, तुला मिळालेले श्राप आणि पाप या सर्वांचा भार खुप जास्त होता. माझी इच्छा नसतांनी मला तुला युद्धभुमीपासून दूर आणावेच लागले रे. मी स्तब्ध आणि आश्चर्यचकित झालो कारण वचन आणि श्रापचा भार मी समजु शकतो. पाप, मी कोणते पाप केले माधव. माझ्या हक्कासाठी धनुष्य उचलने पाप होते. वेदपाठ, शिक्षाची इच्छा ठेवणे पाप होते.

अन्यायाच्या विरूद्ध आवाज उठवणे पाप होते का मग सूत म्हणून जन्माला येणे पाप होते? श्रीकृष्णा सांग मला, मला कळूदे,  मी पुन्हा व्याकुळ होऊन प्रश्न केला. माधवपण कुठे सहजतेने सांगणार होते. कदाचित त्यांना माझ्याच तोंडातून ऐकायचे असेल. मी पुन्हा तेच प्रश्न केशवला केले. माझे प्रश्न ऐकून माधव शांत झालेले होते. मी पुन्हा विचारले, माधव माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही शांत का आहात. 

माधव पुन्हा मधुर आवाजात म्हणाले, कौंत्येया, तुझे शांत असणेच मोठा अपराध, सर्वात मोठे पाप होते. द्युतसभेत पांचालीचा होत असलेला अपमान पाहून तुझ्या धनुष्याचे शांत असणे पापच होते. मित्राच्या अंध प्रेमापुढे तुझा दबता स्वर पाप होते राधेया. लाक्षागृहाच्या घटनेनंतरही तू शांतच होता कर्णा. अभिमन्यूला घेराव घालून महारथींनी तडपुन तडपुन मारत असताना तुझे शांत असणे पाप होते राधेया.

या महाभारतातील महायुद्धाचे पाप दुर्योधनाच्या किंवा मामा शकुनीच्या माथी नाही रे राधेया. हे पाप त्या तीन महारथींचे आहे,ज्यांच्याकडे शक्ती आणि सामर्थ्य दोन्हीही होते. आपल्या वचनासाठी आपला खरा धर्म विसरलेले ते तीन महारथीच होते. महापराक्रमी गंगापुत्र भीष्म, महाबलशाली गुरु द्रोण आणि तू कौंत्येया. धर्म न जाणणाऱ्या व्यक्तींपासून या समाजाला जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान धर्म जाणणाऱ्या व्यक्तीं शांत राहील्याने झालेली आहे.

आता मात्र माझे मन अजुनच व्याकूळ आणि अशांत होत चालले होते. योगेश्वरा मला माझी चूक आता समजली आहे. माझे मार्गदर्शन करा. वासुदेव मला एक सांगा की माझ्या सामर्थ्याची ओळख या जगाला कधीच होणार नाही. जे परीवर्तनाचं स्वप्न मी बघितलं ते कधीच पुर्ण होणार नाही का केशवा? जातीपेक्षा कर्मावर आधारित समाज मला बघायचा होता, हे परीवर्तन कधीच होणार नाही का? माधव माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, राधेया, अरे तुझ्यासारखा शूरवीर महायोद्धा मी माझ्या या अवतारात नाही बघितला. तुझ्यासारखा महादानवीर न झाला न भविष्यात कधी होईल. जोवर सुर्याचे अस्तित्व राहील तोवर तुझ्या पराक्रमाचे कौतुक होत राहील.

आज मला तुझा वध करण्यासाठी या कुटनितीचा वापर करावा लागतोय हे काय तुझ्या सामर्थ्याचे प्रमाण नाही. ज्यावेळी तू रथावर नाहीस, तुझ्या हातात धनुष्य नाही राधेय, ज्यावेळी तुला तुझ्या विद्येचा विसर पडलेला आहे या सर्व संधींचा फायदा घेऊन आज तुझा वध करावा लागतोय राधेया. तुझे सामर्थ्य आणि कौशल्य  यातुनच सिद्ध होते. मला आज तुला सांगायलाच हवे या धरेवरचा तुच एक सर्वश्रेष्ठ धनुरधर होतास.

अर्जुनापेक्षाही तूच मला अधिक प्रिय आहेस कर्णा. मी तुला कित्येकदा संकेत देण्याचा प्रयत्न केला परंतु नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही. तूच होतास महादानवीर कर्ण आणि आज तू मृत्युंजयही होणार आहेस. आज कदाचित मृत्यूलाही तिचा पराभव होतो की काय याची चिंता लागली असेल. कौंत्येया बस कर आता, थांब आता. तुझी जीवनयात्रा येथेच संपव, वेळ खुप कमी आहे. 

आज मला दूत सभेतील माधवचे विराट रूपाचे स्मरण झाले. त्यांचे सर्व शब्द माझ्या कानावर अगदी स्पष्ट ऐकू येत आहे. माधवाने सांगितलेही होते की या पापातील प्रत्येक पापीचे आणि त्याच्या पापात भागीदाराच्या अंतानेच या महाभारताच्या युद्धाचा शेवट होईल. यापासून कुणीही वाचणार नाही. हे युद्ध माझ्या मर्जीने होत आहे. या युद्धातील प्रत्येक योद्ध्याची उपस्थिती माझ्याच निर्णयामुळे आहे. या युद्धात मीच मारणार आणि मरणारही. मीच शस्त्र आणि मीच अस्त्र असेल. विजयी झालेला मीच असेल आणि वीरगतीलाही मीच प्राप्त होणार. मीच जीवन, मीच मृत्युही. प्रत्येक शरीरावरच्या जखमा मीच आणि त्या जखमेतुन निघणारे रक्तही मीच. धर्माच्या रक्षणासाठी अधर्माचा विनाश आवश्यक आहे. 

मी माधवाला हात जोडून म्हणालो, योगेश्वरा थांबा आता, मी धन्य झालो, आता माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तरे बाकी नाहीत. मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या यात्रेवर घेऊन चला आणि माझी मुक्तता करा माधवा. आमच्या दोघांचेही डोळे अश्रूंनी पानावलेले होते. शब्दही संपलेले होते. माधव परत आपल्या रथाकडे जात होते. कालचक्रही पुन्हा पहील्यासारखे सुरू झाले. सायंकाळची वेळ सूर्यदेव अस्ताला जात होते. अर्जुन धनुष्य हातात घेऊन तयार होता.माधवने अर्जुनास अंजलीकाचे अस्त्र वापरण्यास सांगितले.

अर्जुनाचा हात थरथर कापत होता, जणू त्याला आमच्या नात्याची जाणीव झाली असं वाटू लागले. माधवने अर्जुनाकडे पाहीले, अर्जुनास निशस्त्र कर्णावर वार कसा करू असा प्रश्न पडला आहे हे माधवला कळले होते. तू पाप करत नाहीस पार्थ. तु एका चांगल्या आत्म्याला मुक्त करीत आहेस. तुझ्याहातुन पुण्यचं घडत आहे तेव्हा काळजी सोड आणि वार कर. जर का आज तु कर्णाला मारलं नाहीस तर कर्णाला कुणीच मारू शकणार नाही आणि कर्ण अजय होईल.अर्जुनाने धनुष्याची प्रत्यंचा खेचली आणि अंजलीका अस्त्राचे आवाहन केले. धनुष्यातुन निघणारे अस्त्र माझ्याकडे करत प्रत्यंचा सोडली. 

अंजलीकाचे अस्त्र स्वताकडे येत असताना, मी राधेय कर्ण मृत्युचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. अंजलीकाचे अस्त्र माझ्या गळ्याला छेदुन आरपार निघाले. काही क्षणासाठी माझ्या डोळ्यांत भूतकाळात घडलेल्या सर्वच घटना जशाच तशा उभ्या राहील्या होत्या. मी नारायण अवतार भगवंत श्रीकृष्णाला शेवटचा प्रणाम करत या शरीराचा त्याग केला.


उर्वरीत भाग पुढील लेखमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. आमच्या पोस्ट आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुम्ही केलेल्या कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते.

22 thoughts on “महारथी अंगराज कर्ण आणि श्रीकृष्ण यांच्यातील कुरूक्षेत्रातील शेवटचा संवाद.”

  1. आज हा देह संसारात कर्णनाचा रथ जसा दलदलीत गुंतला होता तास माझा रथ संसारात गुंतला ते काढण्यातच मन गुंतले आहे हे मधवा मला आता याषणी इथून सोडवा हे नम्र निवेदन

    Reply

Leave a Comment

फिफा वर्ल्ड कप कतार 2022 चे वेळापत्रक ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला. Suryakumar Yadav mr360 Biography केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण
Suryakumar Yadav mr360 Biography Top 10 Indian CEO’s in the world केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला.