एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. – मुकेश नायक

आज आपण जाणून घेणार आहोत एका यशस्वी शिक्षकाची यशोगाथा एका मुलाखत घेऊन. आकाशात एक उंच भरारी घेणारे खुप कमी लोक असतात आणि त्यातील एक physics gyaan youtube channel चे श्री. मुकेश नायक सर.


एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. - मुकेश नायक
एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. – मुकेश नायक


जमिनीवर राहून मी, बघतोय या आकाशाकडे, स्वप्ने उराशी ठेवून, घेतोय झेप या गगनाकडे. मुलाखतीला सुरूवात करण्याच्या अगोदर आपण एक छोटासा परीचय जाणून घेऊयात. स्वप्ने बघणारी पुष्कळ लोक असतात पण त्या स्वप्नांना खरं करणारी क्वचितच असतात.

मुकेश नायक सरांनी खुप कमी वेळेत आपले स्वताचे एक नाव आणि एक ओळख निर्माण केली आहे. नायक सरांनी केलेल्या मेहनतीचेच हे एक फळ आहे असं मानायला हरकत नाही.

परीचयः

Table of Contents

नावः  मुकेश सुभाषराव नायक

शिक्षणः एमएससी बीएड, भौतिकशास्त्र physics, 

शाळाः Z.P. सवना, ता.सेनगाव, जि.हिंगोली.

महाविद्यालयः आदर्श महाविद्यालय, हिंगोली

व्यवसायः शिक्षक

व्यवसाय पत्ताः आर आय जी एम एस, रायपुर, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद

मोबाईल नं: ८६००६७४०२६

युट्युब चॕनलचे नावः physics gyaan

Telegram channel : २०२१ Batch Maharashtra Board

आपला जन्म कोठे झाला? आणि आपले बालपण कुठे व कसे गेले याबद्दल थोडक्यात सांगाल का?

माझा जन्म हिंगोली जिल्ह्यातील, सेनगाव तालुक्यातील सवना या गावी झाला. माझे बालपणही सवना गावीच झाला. सवना या गावातील माझ्या खुप आठवणी आहेत. एकंदरीत माझे बालपण व्यवस्थित आणि चांगलेच गेले.

एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. - मुकेश नायक
एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. – मुकेश नायक


१.  आपण शिक्षक होण्याचा निर्णय केव्हा घेतला?

मी शिक्षक बनण्याचा निर्णय ७वी मध्ये असताना घेतला होता. घरातील सदस्य काका-काकू शिक्षक असल्याने माझी ओढ शिक्षक बनण्यासाठी लागली होती. मी लहानांपासुनच शिक्षक बनण्याचे स्वप्न बघत होतो. खुप कष्ट आणि परिश्रमानंतर आज मी शिक्षक बनलो आहे.

२.  शिक्षक बनल्यानंतर आपण काय बदल करण्याचा निर्णय घेतला होता?

शिक्षक बनल्यानंतर माझ्यासाठी सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे अवघड विषयही विद्यार्थ्यांना सोप्या पध्दतीने कसा शिकवावा? शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना कुठलाही ताण येणार नाही त्यासाठी वर्गात हसत खेळत आणि उदाहरणे देऊन शिकवण्यासाठी मी माझे प्रयत्न सुरू केले.
विद्यार्थ्यांचे मन वर्गात लक्ष वेधुन ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच माझे प्रयत्न असत.

३.  विद्यार्थ्यांना युट्युब चॕनलच्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्याची कल्पना कशी सुचली?

आज शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विशेषतः ग्रामीण भागातील होतकरू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित रहावे लागते.

याला एक माध्यम असणे आवश्यक होते आणि ते मला या युट्युब चॕनलच्या मदतीने मिळाले. आज हजारो होतकरू विद्यार्थी माझ्या physics gyaan या युट्युब चॕनलवर जोडल्या गेले आहे.

भौतिकशास्त्र(physics) हा विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटत असतो. भौतिकशास्त्र म्हटले की, विद्यार्थ्यांना अंगावर काटा येतो. माझ्यासाठी ही एक उत्तम संधी होती. मी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजुन घेत गेलो. भौतिकशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न माझा सतत सुरू असतो.

४. विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी काय करायला पाहीजे?

यश मिळवण्यासाठी सर्वचजण धडपड करत असतात. जीवनात यशस्वी होण्याची सर्वांचीच इच्छा असते. यासाठी आपल्याला बेसिक कंसेप्टवर भर देणे आवश्यक आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयाच्या बेसिक गोष्टींसाठी जास्त वेळ दाणे गरजेचे आहे.

५. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल?

तुम्हाला आपले करियर कशात बनवायचे आहे ते अगोदर ठरवून घ्या. शाळेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूवात करा.
शाळेतील सर्वच विषय या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपुर्ण आहे. पाठांतर करण्या ऐवजी basic concept  समजुन घेण्यावर जास्तीतजास्त भर द्या.
एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. – मुकेश नायक


एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यासाची तयारी करा. रिविजनसाठी थोडा वेळ नक्कीच शिल्लक असू द्या. स्वताच्या short notes बनवायला सुरू करा जेणेकरून त्याचा उपयोग रिविजनसाठी होईल.

६. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल?

youtube वरील मोफत शैक्षणिक चॕनल जाॕइन करुन स्वताचे ज्ञान वाढवण्यासाठी मदत करा. आज youtube वर भरपुर चॕनल उपलब्ध आहेत.

या चॕनलच्या मदतीने आपण स्वताला घडवण्यासाठी मदत करू शकतो. मी तुम्हाला काही चॕनलची नावे सांगतो, लगेचच या चॕनलवर जाऊन आपल्या विषयानुसार अभ्यासाला सुरूवात करा.

खालील काही चॕनल आहे ज्यांना विद्यार्थ्यांनी अवश्य भेट दिली पाहीजे.
१ Dinesh sir live study(math),
२ Padhai wallah channel(all subjects),
३  Shinde chemistry technic(Chemistry),
४  Mudhal institute of Biology MIB

७. परीक्षेच्या काळातील येणारा तणाव विद्यार्थ्यांनी कसा हाताळावा?

एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. - मुकेश नायक
एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. – मुकेश नायक


परीक्षा म्हटलं की, ताण तर येणारच. माझ्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा ताण जर तुम्हाला घालवायचा असेल तर वेळच्यावेळी अभ्यास करा.

परीक्षा डोक्यावर आली असताना अभ्यासाला सुरूवात करण्याची वाईट सवय सोडुन द्या. स्वताच्या भाषेत short notes बनवा. या नोट्साचा उपयोग नेहमीच करत जा तुमच्यावर कधीच दडपण येणार नाही.

८.  कोणत्याही परीक्षेसाठी पुर्वनियोजन कशाप्रकारे करावे?

कोणत्याही परीक्षेसाठी पुर्वनियोजन करण्याच्या अगोदर एक वेळापत्रक तयार केले पाहीजे. महत्वाचा विषय आणि अवघड वाटत असलेला विषयाला जास्त वेळ द्यायला हवा.

परीक्षेसाठी तयारी चार टप्प्यात करावी
१ अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे
२ Short notes तयार कराव्यात
३ रिविजनसाठी वेळ शिल्लक ठेवावा.
४ वेळच्यावेळी अभ्यास पुर्ण करणे 
यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि रिविजनसाठी  भरपूर वेळ मिळेल.

९. एक शिक्षक म्हणुन आपण पालकांना काय सल्ला द्याल?

एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. - मुकेश नायक
एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. – मुकेश नायक


पाल्यांची आवड बघुनच त्यांच्या भविष्याचा विचार करावा. स्वताची आवड त्यांच्यावर लादू नका. तुमच्या दबावामुळे कदाचित तुमचा पाल्य तुम्हाला पाहीजे असलेली नौकरी तर करेल पण खुश आणि आनंदी कधीच राहणार नाही.

असं झालं तर तुमचे पाल्य तुम्हाला आयुष्यभर कोसतील. तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी तुमच्या पाल्यांच्या इच्छाना दाबू नका.

पाल्यांच्या आवडी-नावडीचा विचार करूनच त्यांचे भविष्य उज्वल करण्यास सहकार्य करा. जर तुमचा पाल्य त्याच्या आवडीनुसार त्याला जे पाहीजे ते तो बनला तर आनंदी राहील.

धन्यवाद सर आपण आपला अमुल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर आपण आज एका यशस्वी शिक्षकाचे मार्गदर्शन बघितले. यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे हे समजून घेतले.

6 thoughts on “एका यशस्वी शिक्षकाने जमिनीवर राहून आकाशात उंच झेप घेण्यासाठी केलेली मेहनत. – मुकेश नायक”

  1. Nice interview sir👍❤️
    सर तुमचा व्हिडिओ सर्वात अगोदर जेव्हा बघितला होता तेव्हापासून मी फिजिक्स चे टेंशन सोडून दिले कारण सरांची शिकवण्याची पद्धत अगदी सरळ व सोपी आहे त्यामुळे मला व्हिडिओ समजण्यास मदत झाली
    Thanks sir🙏
    Sir i am also from aurangabad 😊

    Reply

Leave a Comment

फिफा वर्ल्ड कप कतार 2022 चे वेळापत्रक ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला. Suryakumar Yadav mr360 Biography केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण
Suryakumar Yadav mr360 Biography Top 10 Indian CEO’s in the world केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला.