Hardwork Perseverance And Goal Key To Succeed. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि ध्येय हे यशाची गुरुकिल्ली आहे.

Hardwork Perseverance And Goal Key To Succeed जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत (hardwork), जिद्द (perseverance) आणि ध्येय (Goal) असणे आवश्यक आहे हे मला आज कळले आहे. आज उंच आकाशातून खाली जमिनीकडे पाहताना ,मला कळत नाही की,आपण खरच स्वताच्या हेलीकाप्टरमधून जात आहोत. मी आज हे स्वप्न बघत आहे असच वाटत आहे.
पण नाही हे खरं होतं, कधीकधी स्वप्नेही खरी होतात, यावर माझाही विश्वास बसायला लागला. तुम्ही कधी स्वप्न बघितलं आहे का? होय स्वप्न, नसेल बघितलं तर बघायला सुरूवात करा. मीही एक सुंदर स्वप्न बघितलं होतं. तेच स्वप्न मी दररोज बघायचो.
माझे सूप्त मन मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार हा विश्वास मला होता. स्वप्न बघत असताना तुम्हाला माहीती असणंही तेवढेच आवश्यक आहे. स्वप्न बघत असताना तुमच्यात स्पष्टता असणं खूप आवश्यक आहे.
या जगातील श्रीमंत व्यक्तिपैकीच मीपण एक श्रीमंत व्यक्ति बनलो होतो. स्वताचं एक अलिशान राजमहल,नोकर-चाकर, स्वताचे जेट आणि हेलीकाॕप्टर.

मोठे स्वप्न बघायला शिकाः

Hardwork Perseverance And Goal Key To Succeed
कठोर परिश्रम आणि ध्येय यशाची गुरुकिल्ली 
जे स्वप्न मी मनाशी घेऊन निघालो होतो, त्या स्वप्नांनीच मला माझे ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन केले. फक्त स्वप्न बघूनच जर श्रीमंत होता आले असते तर, गरीब कुणीच नसते. स्वप्नपूर्ती करण्यासाठी कठोर परिश्रमही करावेच लागतात.
स्वप्न जेवढे मोठे असेल, तेवढेच कठोर परिश्रम आणि अडथळे  आपल्या वाटेला येतात, हे पण एक कटू सत्य आहे.
मी आजच्या तरुणांना एकच सांगेलकी, स्वप्ने बघायला सुरूवात करा. आपले स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक ती मेहनत करा. सुरूवात एका छोट्या स्वप्नापासून करून बघा. स्वप्न बघत असताना सकारात्मक विचार करण्याची सवय स्वताला लावून घ्या.
मी आज खूश आहे, जे मला आयुष्यात मिळवायचे होते, ते मी मिळवलं होतं. ध्येय गाठले म्हणून काय, मी आता थांबणार असं वाटलं का तुम्हाला? मुळीच नाही, यश मिळवत असताना आणि मिळाल्यानंतर मी कधीच थांबणार नाही.

स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम कराः

जर कदाचित मी यश मिळवल्यानंतर थांबलो तर मी यशस्वी कसा असू शकतो? थोडे यश मिळाले म्हणून त्याच जागेवर थांबने याला मी यशस्वी मानत नाही. जो थांबला,तो अयशस्वीच झाला आणि हेच माझं मतही आहे.
यशस्वी तोच असतो ज्याला एका यशानंतर दुसऱ्या यशाची भूक असते. माझी भूक तर खूपच मोठी आहे. एक-दोन यश मिळवल्यानंतर ती शांत होणार नाही हे मला माहीत आहे.
जास्तीत जास्त वाचन करा, आपला काही वेळ हा वाचन करण्यासाठी नक्की द्या. मी आजही वाचन करने सुरूच ठेवलेले आहे. नविननविन विषयाची पुस्तके वाचून काढा. आपले ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहा. ज्ञानामुळेच आपले अस्तित्व टिकून राहते, याला गंज लागू देऊ नका.

Hardwork Perseverance And Goal Key To Succeed

आपण मिळवत असलेले ज्ञान कधीच वाया जात नाही. चांगले शिक्षण घ्या, चांगले नागरिक बना. देशाला तुमची आवश्यकता आहे. आपला देश अजुन समृद्ध करण्यासाठी,स्वताला परिपक्व करा. आज मी जिथे आहे,ते माझं स्वप्न होतं. तुम्हीपण तुमचं स्वप्न आजच ठरवा आणि पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करा. तुमची जिद्दच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. 

यशस्वी झाल्यानंतर जमिनीवर राहण्याचे शिकाः

आज आपण बघतोच आहे कि कसे लोक थोडस यश मिळाल्यानंतर कशे वागायला सुरुवात करतात. त्यांच्या अंगी अहंकार स्पष्ट झळकत असतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, अहंकार हा नेहमीच आपल्याला खाली खेचण्यासाठी जबाबदार असतो.
याउलट खूप जास्त यश संपादन करणारे लोक कमी बोलतात, त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये नम्रता असते, आणि तीच नम्रता त्यांना यशाच्या प्रगतीपथावर नेण्यास मदत करत असते. नेहमीच इतरांशी चांगले वागतात. इतरांशी बोलताना  सौम्य भाषेचा वापर करतात.
सर्वात महत्त्वपुर्ण म्हणजे ते दुसऱ्यांचे ऐकुन घेतात. यश मिळाल्यानंतर अनेकदा मणुष्याला अहंकार येतो. अहंकारी लोक जास्त काळ कधीच यशस्वी राहू शकत नाही.

स्वप्नपूर्तीसाठी आवश्यकता आहे जिद्दीने काम करण्याचीः

Hardwork,perseverance and Goals key to succeed.
Hardwork,perseverance and Goals key to succeed.
एका छोट्या गोष्टीतुन आपण जाणून घेऊया कसा एक गावाकडील मुलगा त्याच्या कठोर परिश्रमाने, जिद्दीने आपल्या लक्षापर्यंत पोहचला.  जास्त काही न सांगता अगदी थोडक्यात मी तुम्हाला एका ग्रामीण भागातील मुलाची कथेचा सारांश सांगणार आहे. जर हि कथा आपण वाचली तर तुम्हाला हि तुमची कथा वाटेल.
एका छोट्याशा गावातील मी एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा  आहे. वडील शिक्षक आणि आई घरीच असायची.  सुरुवातीला मी एका खाजगी कारखान्यात काम करत असे. कारखाना गावापासून चौदा-पंधरा मैल अंतरावर होता. कच्ची सडक, जंगलातुनच सायकलवर कारखान्यात ये-जा करावी लागत.
आईचे शिक्षण चौथीपर्यंतच झालेले होते. घरची परिस्थिती नाजूक होती. आई-बाबांनी माझे आणि माझ्या भावंडांचे शिक्षण पुर्ण करुन आम्हाला स्वताच्या पायावर उभे राहण्याच्या लायक बनवले.
माझी जबाबदारी एकच होती की, जो विश्वास माझ्या आई-बाबांनी माझ्यावर दाखवला आहे तो सार्थक करण्याची. तुमचे स्वप्नपूर्तीसाठी तुमच्यात जिद्द, मेहनतीची आवश्यकता असते. तुमच्यातील जिद्द तुमचे ध्येय गाठण्यासाठी वापरा.
अपयश जणुकाही माझ्या जीवनाचा एक अटुट भागच बनला असं मला वाटत होतं. यश मिळवत असताना आजही माझे पाय मात्र जमिनीवरच आहे हे विशेष. आजही संध्याकाळचे जेवण मी माझ्या परीवारासोबतच करतो.
आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू, भाऊ-बहीणी, मामा-मामी, पत्नी आणि मुले, भाचे. तुम्हाला मी आज माझ्याविषयी सांगतो. मी काही लहानपणापासून श्रीमंत नव्हतो. माझीही घरची परिस्थिती सर्वसामान्यपेक्षाही वाईटच होती.
आज मी एका नामाकिंत कंपनीचा CEO झालो आहे, माझ्या मेहनतीचे फळ जणू मला आज मिळाले असे वाटत आहे. हे एक स्वप्नतर नाही ना? असा सवाल माझ्या मनाला पडतोय. डोळ्यातून आनंदचे अश्रू गालाचा सहारा घेत खाली जमिनीवर पडत आहे. मनाला समाधान तर आहेच पण इथेच मला थांबायचे नाही.
मी माझे ध्येय ठरवलेले होते आणि माझ्या ध्येयपुर्तीसाठी मी कठोर परिश्रम घेतले आहेत. आहे त्या परिस्थितीतून पुढे जाऊन  मी माझे अस्तित्व निर्माण केले आहे. स्वप्नपूर्तीसाठी निघालेल्या प्रत्येक मार्ग खडतर असतो. यातच तुमची परीक्षा आहे असं समजून घ्या हवं तर.

Hardwork Perseverance And Goal Key To Succeed

यशाचा मार्ग वाटतो तेवढा सोपा कधीच नसतो. तुमाचा संयम, तुमची जिद्द, तुमची यश मिळवण्यासाठी असलेली भूक यांची परीक्षाच असते.
यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी कितीतरी काटेरी मार्गावरुन चालावेच लागते. येणाऱ्या प्रत्येक समस्यांवर मात करत पुढे जावे लागते. अपयश मिळाले तरीदेखील आपले ध्येय गाठण्यासाठी,जिद्दीने पुढे जो जात असतो यश त्याच्याच पदरात येऊन पडत असते.
अपयशाला घाबरुन न जाता त्यातूनच यशाचा मार्ग आपल्याला दिसत असतो. अंधारून आल्यानंतर काळोख रात्र होते याचा अर्थ असा नाही की, उमेदीची नविन किरण पुन्हा येणार नाही. जर आपली वाटचाल योग्य दिशेने असेल तर यश जरूर मिळणार.
अपयश ही यशाची नेहमीच पहीली पायरी ठरलेली आहे. अपयशातुन आपण काहीतरी शिकलो पाहीजे. अपयश मिळाल्याचे दुःख न करता, निराश आणि हतबल न होता आपण कोठे कमी पडलो यावर संशोधन करायला पाहीजे. अपयशावर मात करण्यासाठी मी ही खुप मेहनत केली. अपयशाला न घाबरल्यामुळे आज मला यश मिळाले आहे.
यश मिळाले तरीही माझे काम मी सुरुच ठेवले आहे. माझी यश मिळवण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची भूक अजुनच वाढलेली आहे.
जन्म-मृत्यु जसे जिवनाचे एक कटू सत्य आहे, अगदी तसेच यश-अपयश हे ही जीवनाचे एक कटू सत्यच आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि ध्येय असणे आवश्यक आहे. स्वप्ने बघा, मोठी स्वप्ने बघा, या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्दीने कठोर परिश्रम करुन आपले ध्येय गाठा. Hardwork Perseverance And Goal Key To Succeed हा लेख आवडल्यास लाइक,शेअर करा.

1 thought on “Hardwork Perseverance And Goal Key To Succeed. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि ध्येय हे यशाची गुरुकिल्ली आहे.”

Leave a Comment

1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?
२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?