Why Freedom Fighter Veer Savarkar get insulted continuously ! वीर सावरकरांचा एवढा द्वेश का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Why Freedom फिघाटर Veer Savarkar get insulted स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढी चीड कशासाठी? एवढा द्वेश कशासाठी? या भारतमातेच्या पुत्राचा एवढा अपमान कशासाठी आणि केव्हापर्यंत?

अंदमानातील अत्यंत क्रुर व भयंकर सेल्युलर जेल (Cellular jail)  ज्या ठिकाणी आजही साधे पर्यटनासाठी जायचे म्हटले तरी अंगावर शहारे येतात.अशा ठिकाणी वीर सावरकरांनी, येथे देशाच्या स्वतंत्र्यासाठी तब्बल १३ वर्षे एका छोट्या काळकोठाडीत  काळ्या पाणी व रत्नागिरी येथे तुरुंगवास आणि स्थानबद्ध राहून शिक्षा भोगलेली असतांना 

Why Freedom Fighter Veer Savarkar get insulted
Veer Savarkar
 
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना जाऊन जवळजवळ ५४वर्षे उलटली तरी मात्र वीर सावरकरांचा दरारा आजही जाणवतो, यावरुन एक लक्षात येते की स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर वीर सावरकरांचा केवढा दरारा असेल. देशहितासाठी वाट्टेल ते करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असायचे. या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो असे ते म्हणत असत.
भारतभूमीसाठी, देशासाठी फक्त स्वतःलाच नाहीतर संपूर्ण परिवाराला देशाची सेवा करण्याचे सौभाग्य मिळाले असं वीर सावरकरांचे म्हणणे होते.
आपले म्हणणे निर्भीडपणे मांडणे, साहित्याचे मोठे धनी होते वीर सावरकर. आज आपल्याला छोटेसे भाषण पाठ करून बोलता येत नाही आणि वीर सावरकर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ;कमला’ महाकाव्य जसेच्या तसे लिहिले. यातून वीर सावरकर किती बुद्धिवान होते हे आपल्याला समजते.
अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये पाय ठेवल्याबरोबर जेलरने वीर सावरकरांचे मनोबल तोडण्यासाठी मुद्दाम ५०वर्षे शिक्षेची आठवण करुन दिली. पण यावेळीही वीर सावरकरांची Veer Savarkar चाणक्ष्य उत्तर जणू त्यांच्याकडे तयारच होते, यावर वीर सावरकर हसत उत्तर देत म्हणाले “अजून ५० वर्षे तुमचे राज्य तरी टिकेल का?
आत्ताच वीर सावरकर यांच्या चरित्रावर चिखल फेकण्याचे कृत्य  एका  व्यक्तीकडुन करण्यात आले, त्या व्यक्तीनुसार वीर सावरकर आणि नथूराम गोडसे यांचे समलैंगीक संबंध होते असा खळबळजनक आणि अविश्वसनीय व बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि यात काही नविन नाही,
हल्लीच्या काळात वीर सावरकरांवर अशाप्रकारचे अपमानजनक कृत्य सुरू करून त्यांना बदनाम करण्याची जणू प्रथाच बनली आहे. काही लोकांचे ध्येय फक्त अन फक्त वीर सावरकरबद्दल अपप्रचार करण्यासाठी आपण कमी तर पडत नाही ना? असे होऊन बसले,
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान तर आपण नाकारु शकत नाही हे ही तेवढेच अटळ सत्य आहे.

 

Why Freedom Fighter Veer Savarkar get insulted
Veer Savarkar

 

आपण कोण आहोत हो वीर सावरकर यांच्यावर टीका करणारे? यांनी दिलेल्या बलिदान,यांनी सोसलेल्या कठोर शिक्षा, वेदना यांच्या एवढे आपण  करु शकतो का बलिदान? वीर सावरकरांच्या जिवनचरित्रावर प्रश्नचिन्ह करण्याचा आपल्याला मुळीच हक्क नाही.
आपल्याला वीर सावरकर यांनी केलेल्या कार्याबद्दल काही कुशंका असतील पण याचा अर्थ असा नाही की “झोपेतून उठायचं आणि हातात पेपर घेऊन काहीही बोलायचं.” जर कुणाची प्रशंसा ऐकली वा केली जात नसेल तर कमीतकमी त्यांच्याविषयी वाईट किंवा अपमानकारक शब्दांचा वापर नाही करायला पाहीजे.  ज्यांना सावरकर माहित नाही त्यांनी सावरकरांना न समजून घेता आपले मत मांडणे बंद करावे.  निपक्ष होऊन एकदा सावरकरांचे कार्य वाचा, समजून घ्या.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टिका करणे म्हणजे आकाशाकडे पाहुन सुर्यावर थुंकणे होय.

 

Why Freedom Fighter Veer Savarkar get insulted
VINAYAK DAMODAR SAVARKAR

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपुर्ण जिवन जणूकाही सूर्यापासून मिळालेली उबदार ऊर्जा,आणि ती ऊर्जा वाऱ्याचा समवेत त्याच वेगाने वाहत वाहत स्वतःच्या मनाला व शरीराला राष्ट्रभक्तीसाठी  खडका सारखे कठोर करून राष्ट्राला स्वतंत्र्य मिळवुन दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेकदा आपल्या भाषणातून आपल्याला सत्यपरिस्थितीचा उलघडा करून दाखवला. त्यावेळीही  वीर सावरकर कुणाला समजले नाही आणि आजही कुणालाच समजत नाही.
वीर सावरकर यांना समजण्यासाठी स्वतः आधी देशाचा विचार करणे शिकावे लागेल. कारण ज्याला देश समजला त्याला वीर सावरकर veer savarkar हेही समजले.
साक्षात मृत्यूही स्वातंत्र्यवीर सावरकरांना गळ घालु शकण्यात असमर्थ ठरलेली होती. बॕरिस्टरची पदवी घेत असताना एक ब्रिटिश सहकारी मित्र सावरकरांना म्हणाले होते की “सावरकर तुमचा जन्म जर युरोप खंडामध्ये झाला असता तर कदाचित तुमच्या देशातील प्रत्येक घराच्या भिंतीवर तुमचा फोटो असता.
राष्ट्रभक्ती काय असते ते जर माहीत करून घेण्यासाठी सावरकर वाचावे लागतील, समजून घ्यावे लागतील पण आज आपल्याकडे सावरकर वाचायला वेळच कुठे?. सावरकरांना आपण आजही ओळखू शकलो नाही हेच एक सत्य आहे.
आपले भाग्य कि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या महान व्यक्तीचा जन्म आपल्या भारत देशात झाला. काबाड कष्ट, परिश्रम करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाचा वाटा आहे. असं असूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढी चीड कशासाठी? Why Freedom Fighter Veer Savarkar get insulted 
आपल्याला लेख आवडला असेल तर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पाठवा.
IF YOU LIKE OUR POST, PLEASE LIKE AND SHARE 

1 thought on “Why Freedom Fighter Veer Savarkar get insulted continuously ! वीर सावरकरांचा एवढा द्वेश का?”

Leave a Comment

नागा साधू कोण आहेत? Who is the Naga Sadhu? २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?