एज्युकेशन सिस्टीम (Education System) and Importance of Education


एज्युकेशन सिस्टीम :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(एज्युकेशन सिस्टीम ) शिक्षण पद्धती हा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे. आपल्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, अध्यात्मिक शिक्षण ,मैदानी खेळ,योग पद्धती ,यासर्व शिक्षण पद्धतीमुळे आपल्याला आपली बुद्धी विकसित करता येते.


https://www.khadedipak.com
Education System


आजची शिक्षण पद्धती :

आज आपली शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसुन येतो. एकविसाव्या शतकात संगणकाचा जास्तीत जास्त उपयोग होत असुन आता तर स्मार्ट फोन, मोबाईल टॕब, इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस इत्यादींचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.


कुठेतरी याचा दुष्परिणाम आपल्याला होत असलेला दिसुन येईल. मी या शिक्षण पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अविश्वास दाखवत नाही पण मला जे सांगायचे आहे ते मी स्पष्ट करू इच्छितो. 

सतत संगणक वापरामुळे आपण नविन नविन तंत्रज्ञान विकसित करु शकतो यात मला तिळमात्रही शंका नाही पण यामुळे आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करत आहोत हे पण तेवढेच खरं आहे. 

बुद्धी बरोबर शरीरही सक्षम असायला पाहीजे. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये थोडासा बदल करायला हवा, आपल्या कमाईतील बहुतांश भाग हा शिक्षणावर होतो. अत्यंत वाईट आर्थिक  परिस्थितीमुळे पाल्य हुशार असुनसुद्धा त्याला शिकवू नाही शकत.

दिवसेंदिवस वाढती शैक्षणिक फीस, पुस्तकांचा खर्च ,शिकवणीचा खर्च,यासर्व कटकटीपासुन दूर राहण्यातच पालकांना सोयीस्कर वाटते. यामुळे एक हुशार विद्यार्थी शिक्षणापासुन कायमचा दूर ढकलला जातो व समाजाला एक चांगला व्यक्ती मिळत नाही. 

https://www.khadedipak.com
Education System


चांगला व्यक्ती घडवण्यासाठी चांगली शिक्षणपध्दत घडवायला पाहिजे.आता चांगली शिक्षणपध्दती म्हणजे नेमकी कशी? मी काही आताच्या शिक्षणपध्दतीला कमी लेखत नाही पण बदल नक्कीच करायला हवा. 

प्रत्येक गावात,एक सर्वसुविधायुक्त शाळा सुरू करायला पाहीजे, उत्तम दर्जाचे शिक्षण व आधुनिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण,उच्च व चांगल्या  गुणवत्ता असलेली इमारत बांधकाम, उच्चशिक्षित व अनुभव असलेले शिक्षक, विविध खेळ खेळण्यासाठी पर्याप्त मैदान. मैदानी खेळ जसे की कबड्डी,खो-खो,व्हॉलीबॉल,घोडेस्वारी,तलवारबाजी इत्यादी.

चालूघडामोडी या विषयावर चर्चा ,संस्कृत विषय पर्यायी न ठेवता तो कायमस्वरुपी व अनिवार्य असायला पाहीजे त्यामुळे आपली संस्कृती जोपासण्यातही मदतच होईल.

थेअरी बरोबर प्रात्यक्षिक माहितीचा आधारही आजच्या शिक्षणपध्दतीचा मुख्य हेतू असला पाहीजे.


  • उच्च व सर्वसुविधायुक्त शालेय इमारत.
  • उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक.
  • प्रॕक्टीकल शिक्षणपध्दतीचा वापर.
  • संस्कृत भाषा  अनिवार्य करण्यात यावी.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मैदानी खेळांचे प्रशिक्षण व अनुभवी प्रशिक्षक.
  • गॕझेट बनवण्याचे प्रशिक्षण. 
  • चालूघडामोडी सांगुन व चर्चासत्र.
  • नविननविन विषयांवर निबंध व वक्तृत्व स्पर्धा.
  • प्रत्येक क्षेत्रातील माहीती व भेट.
  • ई-कॉमर्स बद्दल नविन माहीती.
  • नविन विकसित झालेले तंत्रज्ञान व त्याच्याबद्दल माहीती.

3 thoughts on “एज्युकेशन सिस्टीम (Education System) and Importance of Education”

  1. WhatsApp Group Join Now
    Telegram Group Join Now

Leave a Comment

Top 10 Indian CEO’s in the world फिफा वर्ल्ड कप FIFA WORLD CUP Hosted Countries – Part 1 फिफा वर्ल्ड कप FIFA WORLD CUP Hosted Countries – Part 2 केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC