Social Media is best Marketing Tool सोशल मिडिया एक महत्त्वपुर्ण मार्केटिंग टूल

जगातील सर्वात महत्त्वाचे व जास्तीत जास्त वापरण्यात येणारे मार्केटिंग टूल म्हणून आज social media. सोशल मिडियामुळे कंपनी आपले प्रोडक्टस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सहजपणे पोहचवू शकते. आज जगाची लोकसंख्या जानेवारी २०२० पर्यंत जवळजवळ ७.५ बिलियन आहे आणि त्यापैकी ३.५ बिलियन लोक इंटरनेटचा वापर करतात. ४०% लोकं इंटरनेट वापरतात. महत्त्वपुर्ण बाब म्हणजे जगात एकुण ३ बिलियन लोक मोबाईल व स्मार्ट फोन वापरतात,त्यापैकी अंदाजे २.६ बिलियन हे सोशल मिडिया वापरतात.
https://www.khadedipak.com
Social Media Marketing Tool

भारतातील सोशल मिडिया मार्केटिंगचा वापर :

भारताच्या १३०करोड लोकसंख्येपैकी ३२करोड लोक सोशल मिडियाचा वापर करतात, म्हणजेच भारत एक उत्पन्न देणारी आणि मोठी बाजारपेठ म्हणून येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसणार आहे यात काही शंका नाही. ई-कॉमर्सचा वाढता वापर, दर्जेदार प्रोडक्टस कमीतकमी किंमतीमध्ये,आकर्षक सूट,बँकेने दिलेली सूट, इक्सचेंज आॕफर्स,डिलीवरी आॕन टाईम अशा विविध सुविधा यामुळे ग्राहकांने आॕनलाईन शाॕपींगला जास्त महत्त्व दिले आहे.
https://www.khadedipak.com
Social Media Marketing Tool सोशल मिडिया एक महत्त्वपुर्ण मार्केटिंग टूल

सोशल मिडियामुळे कंपनी आपली जाहिराती या सोशल साईटवर दाखवतात, बहुतांश लोकं हे सोशल मिडियावर आॕनलाईन असतात त्यामुळे दाखवलेली जाहीराती ग्राहकापर्यंत लवकर पोहचते,आकर्षक आॕफर्स बघुन सोशल मिडिया युजर त्या जाहीरातला क्लिक करून बघणार हे निश्चित. एकदा कि तुम्ही त्या आॕनलाईन शाॕपींग साईटवर गेलात कि आपल्या आवश्यकतेनुसार  प्रोडक्टस बघायला सुरू करतो,आणि प्रोडक्टस आवडल्यास खरेदी करतो.त्यापैकी काही युजर सोशल मिडियावर  आपण खरेदी केलेल्या प्रोडक्टसबद्दल आपले मत मांडतात. भरपूर ग्राहक  अगोदरच्या ग्राहकांने मांडलेले विचारपण वाचून खरेदी करायचा निर्णय घेतात.
https://www.khadedipak.com
USE OF SOCIAL MEDIA TOOL
सोशल मिडियाचा वापर करून उत्कृष्ट दर्जाचे चित्र, फोटो,व्हिडिओ याचा उपयोग करून जाहिरात बनवली जाते. सोशल मिडिया हा एक उपयुक्त प्लॕटफाॕर्म तयार झाला असुन आपल्या कंपनीचे प्रोडक्टस युजरपर्यंत कमीतकमी वेळेत दाखवले जातात.कंपनीचा बहुतांश वेळ वाचत असल्याने सोशल मिडिया मार्केटिंगला जास्त प्राधान्य दिले जाते. कस्टमर आणि कंपनी यांच्यात संपर्क वाढतो आॕनलाईन ग्राहकांचे प्रश्न सोडवण्साठी कंपनी प्रयत्न करत असते. ग्राहक कंपनीच्या तत्पर सेवेमुळे अजुनच आकर्षित होतो. सर्व कंपन्यांनी आॕनलाईन प्रोडक्टस मार्केटिंग व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

सोशल मिडियामुळे कमी वेळेत जास्त काम:

सोशल मिडियामुळे कंपनीचा बराचसा फायदा झाला असे म्हणायला हरकत नाही कारण आॕफलाईन मार्केटिंगसाठी वेळ,खर्च ,मॕनपावर जास्त असत आणि त्या तुलनेत आऊटपुट मात्र कमी. जाहिरात सर्व लोकांपर्यंत पोहचविणेही तेवढेच अवघड बनलेले होते. मागील काही वर्षामध्ये झालेला बदल , लोकांचा सोशल मिडियाकडे वाढत असणारा कल,स्वस्त झालेली इंटरनेट सुविधा, कमी किंमतीमध्ये मिळत असलेले सर्वसुविधायुक्त स्मार्ट मोबाईल फोन ,आणि मोठ्या प्रमाणात सुरू झालेला वापर, आपल्या  निवडक जाहिराती लोकांपर्यंत सोशल मिडियाचा वापर करुन जास्तीत जास्त पोहचविणेही सोपे झाले. यासाठी कमी वेळात जास्त काम व्हायला मदत होत गेली. यामुळे अनेक कंपनीने आॕनलाईन मार्केटिंगवर भर दिलेला दिसुन येते.

अॕफिलेट प्रोग्राम :

https://www.khadedipak.com
AFFILIATE PROGRAMME 

अॕफिलेट प्रोग्राम म्हणजे एखाद्या कंपनीने आपल्या प्रोडक्टसची विक्री वाढविण्यासाठी  ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांच्यामार्फत विकल्या गेलेल्या प्रोडक्टसच्या विक्री केलेल्या किमतीवर ठरलेल्या अटीनुसार आपल्या ग्राहकांना घरी बसल्या ठिकाणी पैसे कमावण्याची संकल्पना सुरू केली.यामुळे अजुन खोलपर्यंत मार्केटिंग सुरू केली.

3 thoughts on “Social Media is best Marketing Tool सोशल मिडिया एक महत्त्वपुर्ण मार्केटिंग टूल”

Leave a Comment

नागा साधू कोण आहेत? Who is the Naga Sadhu? २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?