Scary Story of Oldest Palace in a Village ! गावातील सर्वात जुन्या राजवाड्याची भितीदायक कथा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Scary story of oldest palace in a village एक गाव जे वसलेले होते एका मोठ्या आणि घनदाट जंगलाच्या पलीकडे. जर त्या गावात जायचे असेल तर त्या जंगलातुनच प्रवास करत जावे लागत असे. प्रवास  कसला मृत्युलाच डोक्यावर घेऊन जाणे म्हटले तरी हरकत नाही. 

त्या गावात म्हणे एक खुप जुने राजमहल आहे. ते राजमहल आज विराण झालेले आहे कारण कित्येक वर्षापासून तिथे कुणीच वास्तव्यास नाही. जे लोक त्या गावात राहतात ते त्या haunted palace पासून खूप दूर राहतात.
त्या राजमहलाजवळुन जाणे तर खुप दूरची गोष्ट आहे, तेथील लोक त्या राजमहलाचे नाव देखील काढत नाही.
संध्याकाळ झाली की, या गावातील लोक घराबाहेर निघत नाही. आज या सुंदरशा गावात भयानक भिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक घरात या काळोखापासून स्वताचे रक्षण करण्यासाठी देवासमोर एक दिवा सतत प्रकाश देत असतो.
ही असुरीशक्ती या राजमहलाच्या बाहेर न येवो यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. गावामध्ये एक मोठा तांत्रिक आहे, लोकं असं सांगतात की या तांत्रिकने आपल्या मंत्राच्या शक्तीने त्या असुरीशक्तीला या राजमहलातच कैद करून ठेवलेले आहे.
एक मोठे त्रिशुल या राजमहलाच्या मुख्यद्वारावर मंत्रीत करून ठेवले आहे. असंही लोक म्हणतात की हे भगवान शिवचे त्रिशुलच आजपासुन या गावाचे रक्षण करील.
त्या राजमहलात काय दडलयं हे तर राजमहलात गेल्याशिवाय कळणारच नव्हते. राजमहलातुन विचित्र प्रकारचे आवाज येत असतात असं गावातील लोकांचं म्हणने आहे. जो कुणी या राजमहलात जाण्याचा प्रयत्न करतो,तो परत कधीच येत नाही.

Read More…Scary Story of Oldest Palace in a Village

Scary story of oldest palace in a village
Image Credit: Pinterest ! Scary story of oldest palace in a village
लांडगे, कुत्रे सतत रात्री ओरडत असतात, जणूकाही त्यांना त्या राजमहलात काहीतरी दिसतयं. दिवसभर येथे शांतता असते पण जसे सुर्यदेव पश्चिमेकडे अस्ताला जायला निघतात तसाच सुरू होतो या राजमहलाची काळी माया.
आज या राजमहलाची अवस्था खुप खराब झालेली आहे. येथील बागेतसुद्धा एवढे जाळे तयार झालेले आहे की, राजमहल व्यवस्थित आणि स्पष्टपणे सहज दिसत नाही.
या राजमहलातील असुरीशक्तीने या गावात मृत्युचे थैमान घातले होते. या गावातील लोकांना आपल्या इच्छेनुसार गावाच्या बाहेरही जाता येत नव्हते. ती दृष्ट आत्मा लोकांच्या मनात मृत्युचे भय उत्पन्न करीत होती. सायंकाळच्या वेळेला माणसं तर दूरच, जनावरेही बाहेर निघण्यास घाबरत होती.
विजेचा कडकडाट सुरू झाला होता, काळोख नेहमीपेक्षा जास्तच भयानक होता. कुत्रे ओरडता ओरडता रडत होती. गोंगाट वारा सुटला होता, झाडाची पाने आणि फांद्या एकमेकांवर घासून कर्कश आवाज येत होता. घराचे दरवाजे, खिडक्या आपोआपच उघडबंद होताना दिसत होते.
देवासामोर लावलेला दिव्याची वातही फडफडत होती. लोक भितीने घरातच बसलेले होते. सुसाट वारा,विजेच्या कडकडाट आणि भयंकर काळ्या अंधाराच्या व्यतिरिक्त जणू कुणीच या गावात राहत नाही. हलक्या हलक्या पावसाच्या सरी आकाशातून कोसळत होत्या. जणू देवांना या गावाचे आणि येथील लोकांचे भानच राहीलेले नव्हते.
हेच आपले भाग्य आहे असे समजुन लोक आपलं उर्वरीत आयुष्य जगत होते. एक दिवस संध्याकाळी मी आणि तीन-चार मित्र गावाच्या वेशीबाहेर फेरफटका मारण्यास गेलो होतो. बराच उशीर झाला, दिवस मावळण्याच्या आत आपल्याला गावात परत गेलं पाहीजे. सर्वजण घाबरलेले होते, कारण गावातील वृद्धांकडुन या राजमहलाच्या रहस्याच्या कथा ऐकतच आम्ही मोठे झालो होतो.
एकमेकांना मानसिक आधार देत, चेहऱ्यावर खोटे हास्य ठेवून, ऐकमेकांच्या हाथात हाथ देऊन आम्ही गावाकडे परत यायला निघालो. सुर्यास्त झालेला होता, आता गावात जाणाऱ्या वाटाही अस्पष्ट होत चालल्या होत्या. आम्ही घाबरत घाबरत पुढे पाऊल टाकतच होतो.
आता आम्ही आमच्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज स्पष्ट ऐकू शकत होतो. आमच्या चालण्याने होणारा आवाजही आता स्पष्ट ऐकू येत होता. मुठीत जीव घेऊन आम्ही पुढेपुढे चालतच होतो. रात्रकिड्यांचा तो किर्र करणारा कर्कश आवाज अजुनच आम्हाला घाबरवत होता.
Scary story of oldest palace in a village
Image Credit: Wallpaper Flare : Scary story of oldest palace in a village
काळोख्याच्या त्या अंधारात पाऊलवाटा आता दिसेनाश्या झाल्या. काय कराव, काही सुचत नव्हतं. कपाळावरचा घाम पुसत पुसत आम्ही तसेच पुढे चाललो होतो. आज प्रत्येक पावलाचे अंतर हे मैलाहून अधिक वाटत होते. मनातल्या मनात आज प्रत्येक देवांची आठवण होत होती.
आज कुठलाही मंत्र उच्चारण्याचा आम्ही विसरलेलो नव्हतो. पावले काय आज सर्वच शरीर थरथर कापत होतं. सुसाट सुटलेला वारा आमच्या अंगाला चांगलाच झोंबत होता. कुणीतरी आपला पाठलाग करत असल्याचा भास वारंवांर होत होता.
आज मागे वळून पाहण्याचीही हिंमत आमच्यात उरलेली नव्हती. सहज चालतांना आम्ही खात्री करायचो की, आपण पकडलेला हाथ आपल्या मित्राचाच आहे ना? खात्री पटली की समोर चालायला सुरूवात करी.
झाडांच्या पाठीमागे गवतामध्ये जोरदार हालचाल झालेली दिसत होती. असं वाटलं की, कुणीतरी झपझप सुसाट पळाले आहे.
मी हळूच माझ्या मित्रांना दबक्या आवाजात विचारले, अरे!अरे त्या झाडाच्या पाठीमागे काही दिसलं का तुम्हाला. माझे मित्रही घाबरत म्हणाले, नाही, आम्हालाही घाबरवू नकोस, चालत रहा. मग मलाही वाटले की आपल्या मनात असलेली भितीच याला कारणीभूत असेल.
माझे मित्र खोटे थोडेच बोलणार होते माझ्याबरोबर. मी सहज मागे वळून बघितले, पाहतो तर काय माझे मित्र डोळे मिटुन पुढे चालत होते. डोळे मिटल्यानंतर यांना काय दिसणार होते. मला आता अधिकच भिती वाटायला लागली होती.
पाय जड पडत होते, असं वाटत होतं की, कुणितरी आपला पाय धरसोड करत आहे. मऊ मऊ मातीच्या स्पर्शाने भितीच वाटत होती कारण जसा मी माझा पाय त्या मातीवर ठेवायचो तसं कुणीतरी आपल्या पायावरून आपली लांबलचक नखे फिरवत असल्याचा अनुभव होत होता.
एवढ्या वेळापासून आम्ही चालत आहे पण अजुन गाव कसे दिसत नाही म्हणून जीव अजुनच घाबरत चालला होता. मनात नाही नाही ते प्रश्न पुन्हा जोर देऊ लागले. त्या राजमहलातील त्या दृष्ट शक्तीने तर आपल्याला वेठीस धरले नाही ना? असा प्रश्न स्वताशीच करू लागलो.
मला आता असं का वाटू लागले की,आपण मगापासून येथेच गोल गोल घिरट्या घेत आहोत ते. छे!छे असं काही नाही, आपण बरोबर जातोय. उगाचच स्वताची खोटी समजुत मी काढत होतो. पण हे खरं होतं, आम्ही आता त्या राजमहलाभोवतीच फिरत होतो. सहा-सात वेळा या राजमहलाला आम्ही प्रदक्षिणा घातल्या होत्या.
हे फक्त मलाच कळालेले होते कारण माझ्या मित्रांचे डोळे अजुनही मिटलेलेच होते. आतातर काळोख एवढा जास्त होता की, पाऊलवाटा तर दूरच,आता आम्ही एकमेकांनाही स्पष्ट पाहू शकत नव्हतो.
काळोख अंधार, सुसाट सुटलेला वारा, विजेची ती कडकडाट, आणि ढगांचे ते मोठमोठ्याने होणारा गडगडाट काय कमी होता तोच जोरदार पावसाला सुरूवात झाली. आईने सकाळी करून दिलेली अमावस्येची आठवण आता होत होती. अंगावर शहारे येत होते,मनात प्रचंड भिती दडलेली होती.
अमावस्या म्हटलं की डोक्यात भूत,प्रेत,आत्मा यांच्याच कथा डोक्यात येत. मला घाम सुटलेला होता, माझे शर्ट घामानेच काय कमी भरलेले होते, की पावसानेही आपली उपस्थिती दाखवली. आज जे काय माझ्यासोबत घडत होतं, तो एक भयानक अनुभव होता.
मी कधी घरी जातो याचीच काळजी मला होती. पावसाच्या त्या जाड सरींपासून स्वताला वाचवण्यासाठी आम्ही त्या राजमहलाच्या बागेत कधी आणि कसे आलो हे कळतच नव्हते. जीव आता कासावीस झाला होता. जगण्याची उम्मीद हरवलेली होती.
राजमहलाच्या बागेत उभे राहून असं ही आपण आज मरणारच आहोत तर मग आत जाऊन मेलं तर काय बिघडलं. पावसाच्या सरींचा जोर अधिकच वाढला होता. आता त्या जाड सरींपासून स्वताला वाचवण्यासाठी राजमहलात शिरलेच पाहीजे.
हळूवार पाऊल उचलत राजमहलात जायला आम्ही निघालो. राजमहलाच्या आवारात वाळलेली पत्ते, पाचोळा, आणि कातिनीचे  विशाल दाट जाळे अडवे येत होते. त्या जाळ्यांना हाथांनी सावरत, पुढे पुढे चालतच होतो,तेवढ्यात एक रानटी कबूतर आमच्या अंगावर आले.
आम्ही घाबरून मोठ्यानी किंचाळायला सुरूवात केली. आता मी ही माझे डोळे मिटले होते. माझे मित्र तर माझा आवाज ऐकुणच ओरडत होते,त्यांना भानच राहीले नव्हते ते कुठे आहेत ते. मी हळूच एक डोळा उघडून पाहीला व चारीबाजुने नजर फिरवली.
मला एक रानटी कबूतर दिसले, मी लगेच दुसरा डोळा उघडला आणि मित्रांनाही शांत राहण्यास सांगितले.

Scary story of oldest palace in a village

अचानक एक काळी मांजर आडवी जाताना दिसली. एवढी काळीकुट्ट मांजर मी कधीही पाहीली नव्हती. तीचा तो काळजाच्या ठिकरया उडविणारा आवाज असहनीय होता. कुत्रे रडण्याचा आवाज, सुसाट वारा,पक्ष्यांच्या उडण्याचा पंखाचा आवाज. माझं काळीज अजुनही धडत होतं यावर माझा विश्वास नव्हता.
वर्षोनुवर्षापासून बंद असलेला दरवाजा हवेच्या वेगामुळे करकर आवाज करत होता. तो आवाज ऐकून कुणीतरी दार उघडून येतयं की काय असं वाटायला लागले. अंधारमय त्या राजवाड्यात फक्त काळोख होता. खिडक्यांची जोरजोरात आपोआपच उघडबंद होत होती.
वीज कडाडली, त्या विजेच्या मंदप्रकाशात आता कसलीतरी सावली मला दिसली. मी भितीने मुर्छित झालो, माझ्या अंगावर पावसाच्या सरी पडताहेत, माझ्या आईचा आवाज माझ्या कानावर पडतोय. आई इथे कशी येणार असा उलट प्रश्न मला पडला.
आता आईचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागला. डोळे उघडून पाहतो तर काय आई पाण्याचे शिपके मारून मला उठवत होती. मी आश्चर्याने इकडेतिकडे पाहू लागलो,अन आईला प्रश्न केला, आई तु इथं कशी? आईने जोरात एक कानशिलात लावली अन म्हणाली,मी आणि तु आपल्याच घरी आहे. मगापासून उठवत आहे, तोंडावर पाणी शिंपडत आहे.
तु काय स्वप्न पहात होता की काय? आईला मी अजुन एक प्रश्न केला,आई मी घरी कसा आलो. आई म्हणाली तु काल रात्री जेवल्यानंतर जे झोपला तर आता दुपार होत आली तरी तुला जाग नाही आली म्हणुन मीच घाबरले होते.
आईचं उत्तर ऐकूण आता विश्वास झाला होता की,आपण घरीच आहोत. माझ्या लक्षात आले की आपण सर्व स्वप्नातच बघितलं.
तेवढ्यात माझी ती मित्र माझ्याकडे आली. त्यातील एकाने आज आपण गावाच्या वेशीबाहेर जायचे का विचारले? माझा थरकाप उडाला, घाम येऊ लागला, जे स्वप्नात बघितले तेच आज प्रत्यक्षात  माझ्यासोबत घडतयं की काय असं वाटू लागले. मी चटकन नाही म्हणून गावाबाहेर जायचे टाळले आणि सुटकेचा श्वास घेत घरात जाऊन बसलो.
Scary Story of Oldest Palace in a Village  हा लेख आवडल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा.
Web-Stories

Leave a Comment

1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का? Best Speech For Students, Lal Bahadur Shastri Jayanti in Marathi
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का? Best Speech For Students, Lal Bahadur Shastri Jayanti in Marathi
२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?