Respect to Womens नारी शक्तीचा आदर करायला शिका.
Respect to Womens : नारी म्हणजेच प्रकृती. नारी एक महान शक्ती आहे. नारी म्हणजेच शक्तीचाच एक अवतार आहे. नारीचा जन्म हा पृथ्वीवरच नाही तर संपुर्ण ब्रह्मांडमध्ये स्थिरता कायम ठेवण्यासाठी झालेला आहे. नारी ही वेगवेगळ्या भुमिकेतुन आपल्याला पहायला मिळते.
कधी आई म्हणून मायेच्या रूपात, तर कधी बहिणीच्या रूपात, तर कधी मुलीच्या रूपात , तर कधी आयुष्याच्या प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या पत्नीच्या रूपात.
युगायुगापासून स्त्रीचे एक महत्त्वपुर्ण योगदान राहीले आहे. नारीचा अपमान करणाऱ्या दृष्टांचा नेहमीच अंत होत आलेला आहे. याला इतिहास साक्ष आहे. म्हैसासूर असो, रावण असो की मग दुर्योधन असो. नारीचा अपमान करणाऱ्या पापींना त्यांच्या कर्मानेच दंड मिळते. फक्त एकटेच महादेव या सृष्टीला संतुलित ठेऊ शकत नव्हते. शक्ती शिवाय शिवही अपुर्णच होते.
त्रेता युगात दशानंद रावण सर्वात ज्ञानी आणि महादेव भोलेनाथचा मोठा भक्त होता. सितेमातेचं अपहरण करून त्यानी त्याच्या मृत्यूलाच आमंत्रण दिले होते. साक्षात नारायण अवतार प्रभु श्रीराम यांनी रावणाला यमलोक दाखवले.
एका स्त्रीचा अपमान केल्यामुळे रावनाला स्वताचा जीव गमवावा लागला. एका स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती असते. स्त्रीचा अपमान केल्यास तुम्हाला कुठलेच वरदान वाचवू शकत नाही. स्त्रीने जर ठरवले तर एका घराला स्वर्गही बनवू शकते. वेळप्रसंगी त्याच घराला जमीनदोस्तही करू शकते.
द्वापरमध्ये दुर्योधनाने केलेला दुर्व्यवहार आपणांस ठाऊक आहेच. यज्ञसेनीचा द्युतसभेत झालेला घोर अपमान. या अपमानामुळे यज्ञसेनीने कूरूकुलाला दिलेला श्राप महाभारत घडण्याचे कारण होते. एका नारीच्या मनातून निघालेला श्राप कधीच खोटा ठरत नसतो.
दुर्योधनालासुद्धा याची किंमत स्वताचा प्राण देऊन मोजावी लागली. फक्त दुर्योधनच नाहीतर त्याच्या क्रूरकर्मात ज्यांनी त्याला साथ दिली त्यांनाही शिक्षा मिळालीच. महापराक्रमी पितामा भीष्म, आचार्य गुरू द्रोण , महादानवीर अंगराज कर्णही अन्याय होत असताना शांत होते.
या महारथींनी द्युतसभेत शांत राहून अप्रत्यक्षपणे दुर्योधनाच्या कृत्याचं समर्थन केलं. या महारथींच शांत रहाणेच त्यांच्या मृत्युचं कारण बनलं. यावरून एकच सिद्ध होतं की, सक्षम आणि बलवान लोकांनी स्त्रीच्या सुरक्षितेसाठी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला हवा.
आज कलयुगात नारीने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे. इंजिनियरींग, डॉक्टर, वकील, कमर्शियल, बॅक, औद्योगिक, सोशल नेटवर्क, राजकीय, शास्त्रज्ञ, शैक्षणिक इ. असं कुठलेही क्षेत्र नाही की जिथे महीलांचा सहभाग नाही. माणूस स्त्रियांना नेहमीच कमकुवत समजत आलेला आहे.
कधीकाळी स्त्रियांना फक्त “चूल आणि मुल” हेच त्यांच मुळ कर्तव्य आहे असे सांगितले जात असत. स्त्रियांना घराच्या बाहेर जाण्यासही बंदी असायची. विशेषतः ग्रामीण भागाकडे या प्रथा मोठ्या प्रमाणात असत. मुलींना शिक्षणाचा अधिकारही नसत. जीवनात प्रत्येक पावलावर संघर्ष करत करत आपले मानाचे व हक्काचे स्थान मिळवले आहे.
आज परिस्थिती बदलत चाललेली आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातूनही मुलींना शिक्षणासाठी शहरात पाठवले जात आहे. काही वर्षापूर्वी मुलींना शिक्षणासाठी पाठवले जात नव्हते. आता मुली शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी करून दाखवत आहे.
महीलांचा सहभाग तो मग घरातील कामात असो वा कार्यालयात काम करत असताना असो नेहमीच निर्णायकच असतो. मुलीं, स्त्रीया आज मुलांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहे.
WOMENS DAY – FREEDOM FOR LIFE |
स्त्रियांनीही स्वताला सिद्ध करण्यासाठी “स्त्री – पुरूष समानता” आणि “मान-संम्मान” यासाठी आवाज उठवला. प्रत्येक क्षेत्रात सहभाग नोंदवून यश मिळवले आहे. आज महीला अनेक खाजगी कंपन्यामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. काही महीला सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
स्त्रियांनीही आपले समाजात असलेले महत्व वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेही आहे. महीला आज पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहे. अगोदर महीलांना पुरूषावर अवलंबून रहावे लागत असे. आज त्या एवढया सक्षम झालेल्या आहेत की, त्यांना आज कुणावरही अवलंबून रहावे लागत नाही.
WOMENS RIGHTS |
स्त्रीला कितीतरी भुमिकेतून जावे लागते. लग्नाअगोदर मुलगी म्हणून, बहीण म्हणून. लग्नानंतर पत्नी, सून, वहीनी, आई, सासू, आजी इ. नोकरी करत असताना घरसंसारही संभाळत असते. घरातील सर्व काम करून नोकरी करणे. दिवसभर काम करून इतरांच्या काळजीत सतत असते.
माहेर आणि सासर यांच्यात चांगले संबंध टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपुर्ण भूमिका पार बजावत असते. सर्व जबाबदारी पार पाडत असताना सर्वांच्या मनासारखे वागत असते. स्त्री ने जर ठरवले तर साध्या घराचे रुपांतर स्वर्गात करू शकते. ठरवले तर त्याच घराला संपुर्णपणे उध्वस्तही करू शकते.
स्त्रियांना मान संम्मान घराच्या आत मिळायला पाहीजे. चौकटीच्या आत स्त्रियांचा मान राखला गेला पाहीजे. घरातील स्त्रियांविषयी जो आदर,मान-संम्मान तुमच्यात असतो, तसाच आदरभाव इतर स्त्रियांच्याविषयीसुद्धा असायला पाहीजे. स्त्री ने वेळोवेळी स्वताला सिद्ध करून दाखवले आहे.
त्यांचा मान तर आपण राखायलाच हवा. अजुनही स्त्रीला हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागतो. शारिरीक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. काही लोक हुंड्यासाठी दुसऱ्यांच्या लेकीला त्रास देतात. जर कुणी दुसऱ्याने तुमच्या लेकीला हुंड्यासाठी त्रास दिला तर तुम्हाला त्रास होतो.
असा दुजाभाव कशासाठी? तुमच्या लेकीला त्रास झाला तर तो तुम्हाला खपत नाही मग दुसऱ्यांच्या लेकीला त्रास द्यायचा अधिकार तुम्हाला कसा? जसा तुम्हाला त्रास होतो अगदी तसाच दुसऱ्यांनाही होत असेल, बरोबर ना.
HAPPY WOMENS DAY |
जोपर्यंत तुम्ही स्त्रीचा मान राखणार नाही तोपर्यंत हे असच घडणार. सासरी आलेल्या नववधूंना वधू म्हणून नाहीतर मुलगी म्हणून बघायला हवे. हा एक बदल ज्यावेळी समाजात होईल त्यावेळी बहुतांश अडचणी संपतील. नववधूंनीही आपल्या सासरच्या लोकांना माहेरच्या लोकांसारखेच प्रेम द्यायला पाहीजे.
दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी आपले स्वताचे मन मारावे लागत असते. स्त्रीला उगाचच आपण त्यागाची मुर्ती म्हणत नाही. त्याग फक्त स्त्रीच करत असते. लग्न करून सासरी आल्यानंतर माहेरचा त्याग. दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी स्वताच्या स्वप्नाचा त्याग. पावलोपावली त्याग कुणी करत असेल तर ती एक स्त्रीच असते.
“राबराब राबणारया त्या आईला, सूनेला, पत्नीला,बहीणीला, माऊलीला सलाम.” Respect to Womens
स्त्रीचा सन्मान करा
Thanks Shakti
Nice sir..