वेळेचा सदुपयोग करायला शिका, नाहीतर आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. होय हे खरं आहे. आज वेळेची किंमत आपल्याला समजली नाही तर वेळ आपलीही किंमत करणार नाही. वेळेचं चक्र हे सतत पूढे चालत असतं.
वेळ कुणासाठीच थांबत नाही आणि कधी थांबणारही नाही. घड्याळाप्रमाणे जर विचार कराल तर आची वेळ उद्या परत येईल पण तुमच्या आयुयातील तो क्षण कधिही परत येणार नाही.
ज्याअर्थी गेलेली वेळ परत येऊ शकत नाही, आपल्याला वेळेचा सदुपयोग करायला शिकले पाहीजे. वेळेचं महत्व आपण समजून घ्यायला शिकले पाहीजे. वेळेने तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर तुम्ही वेळेचं महत्व काय आहे समजून घ्या.
आज आपला,एक दिवस म्हणजेच २४ तास. हे २४ तास आपण कसा आपला वेळ घालवत असतो हे जाणून घेऊया. १०-१२ तास नोकरी किंवा व्यवसाय, ६-८ तास झोप. उर्वरीत ६-८ तास आपण काय करत असतो?
कुणाला यापेक्षाही जास्त वेळ मिळत असेल, मग आपण या वेळेचं काय करतो? तुमच्यापैकी काही लोकं या वेळेचा सदुपयोगही करत असतील तर काहीजण काहीच नाही.या वेळेचा उपयोग न करता या वेळेत फक्त आरामच करत असणार किंवा ज्या गोष्टींचा जीवनात काहीच उपयोग होणार नाही.
आपण वेळेचं आपल्या आयुष्यात काय महत्व आहे ते उदाहरणातून समजून घेऊया. दोन मनुष्य ज्यांची नावे अनुक्रमे राम आणि शाम असे मानूया.
राम आणि शाम हे दोघेही एकाच शाळेत,एकाच वर्गात शिकत असतात. दोघांचेही वेळे विषयी वेगवेगळे महत्व असते. आपण अगोदर शामबद्दल जाणून घेऊयात.
शाम अभ्यासात हुशार आहे पण त्याचे अभ्यासात मन लागत नाही. शाळेतुन घरी आल्यानंतर तो लगेचच बाहेर मित्रांबरोबर खेळण्यासाठी बाहेर पडायचा. शाम हा जास्त वेळ खेळण्यातच घालवत असत.
आई-बाबांचे म्हणने ऐकत नसत. संध्याकाळी घरी आल्यानंतर जेव्हा मनात येईल तेव्हा जेवण करत असे. रात्री उशीरा झोपण्याची सवय असल्याने सकाळी लवकर उठत नसे.
या सवयीमुळे शामला कित्येकदा शाळेत जाण्यासाठी उशीर होत असे. कधीकधी तर शाळेला बुट्टीही मारत असे. आई-बाबांनी सांगितलेली कोणतीच कामे वेळेवर करत नसे. सांगितलेली कामे आज-उद्या करत, विसरून जाई.
एकदा तर बाबांनी विजेचं बिल भरण्यासाठी शामला सांगितले होते कारण शामचे बाबा कामानिमित्त बाहेरगावी जाणार होते आणि रात्री यायला उशीर होणार होता. शाम शाळेतून घरी आल्यावर आपण थोड्यावेळ मित्रांबरोबर खेळूया आणि नंतर बाबांनी सांगितलेले काम करूया असं ठरवलं.
शाम खेळण्यासाठी बाहेर गेला, शाम खेळण्यात एवढा दंग झाला होता की, त्याला आता विजेचं बिल भरायचं आहे याचाही विसर पडला होता. संध्याकाळ झाल्याने अंधारून आले होते.
शाम खेळून झाल्यानंतर घरी यायला निघाला. घरी आल्यावर बघतो तर काय घरामध्ये सर्वत्र अंधार होता. आईने मेणबत्ती लावल्यामुळे थोडा प्रकाश दिसत होता. शामने जीभ दाताखाली दाबत मनाशीच पुटपुटला, बापरे! विजेचं बिल भरायला विसरलो, आता काही खैर नाही.
आईने रागात विचारले, विजेचे बिल भरले का नाही? काय झालं? मी विसरलो, उद्या भरून टाकेन असं सांगितले.
शामने कसतरी, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून एक नोकरी मिळाली होती. महीन्याकाठी पंधरा हजार रूपये शामला मिळत असे. आता जास्त वेळ हा नोकरी आणि मित्रांबरोबर गप्पा मारण्यातच जात होत. बचत करण्यासाठी शिल्लक राहत नसे.
नोकरी मिळाल्याच्या वर्षाच्या आतच संसारात गुंतला गेला. आता तर मित्रांबरोबर गप्पा मारायला वेळ मिळत नसे. असं करता करता चार -पाच वर्षे निघून गेली. एवढ्या वर्षात एक मोटारसायकल घेतली होती.
पगारातील शिल्लक राहत नसल्यामुळे अतिरिक्त काम करण्यास सुरूवात केली. यामुळे थोडे पैसे बचत करता येऊ लागले. अजुनही शामची सवय गेलेली नव्हती. आजही तो काम करताना आळसपणा दाखवत होता. आजचे काम उद्यावर ढकलतच होता.
शाम ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीमध्ये एक नवीन वरीष्ठ व्यवस्थापक नेमकाच रूजू झाला होता. त्या व्यवस्थापकाने शामला बोलावून घेतले. शाम घाबरत घाबरत साहेबांना भेटण्यासाठी चालला होता.
मनात असंख्य आणि न थांबणारे प्रश्न सुरू होते. साहेबांच्या कॕबिनमध्ये परवानगी घेऊन शाम आत आला. साहेबांकडे बघतो तर काय, लहानांपासुन सोबत राहीलेला माझा मित्र राम उभा होता.
शाम प्रचंड खुश झाला होता. रामही शामला पाहून खूश झाला होता. शामने विचारले, अरे राम, तू इथे कसा? तु आता मोठा माणूस झाला रे. हे सर्व कसं काय राम?
रामने शामला सांगण्यास सुरू केले. हे बघ शाम, मी माझी कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी भर दिला. त्याचे एक महत्त्वपुर्ण कारण म्हणजे, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो. हा गेलेला क्षण आपल्या आयुष्यात कधीच परत येत नसतो.
शाळेत असताना मी सर्व कामे वेळेवर करायचो. प्रत्येक कामासाठी एक वेळ निश्चित केलेली होती. मला आज काय कामे करायची आहे ,हे मी एक दिवस अगोदर म्हणजेच रात्री माझ्या नोंदवहीमध्ये लिहुन ठेवायचो. दुसऱ्यादिवशी मी ते काम ठरवलेल्या वेळेप्रमाणे करून घ्यायचो.
ठरवलेल्या वेळातच बाहेर खेळायला जायचो. त्यामुळे मला वेळच वेळ मिळायचा. या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घेतला. शामने विचारले, तो कसा?, रामने सांगितले, या वेळेत मी वाचन करायचो, दररोज वेगवेगळी पुस्तके वाचायचो, नविन क्लासेस लावले ठरवलेली सर्व कामे मी वेळेच्या आत करायचो.
या वेळेत मी जे काही नविन शिकलो,त्यामुळे माझा व्यक्तिगत विकास झाला आणि याचाच फायदा मला आज होतोय. एखादे काम करण्यासाठी मी असनेच हे गरजेचे नसते ते काम मी दुसऱ्यांना सांगत असे.
यामुळे माझा तो वेळ वाचत असे. जसे की विजेचं बिल भरने, कार सर्व्हिसिंगला घेऊन जाणे. आज माझ्याकडे सर्व आहे. घर,कार आणि चांगले जीवन जगण्यासाठी वेळही आहे. वेळेचा सदुपयोग करण्यास जर आपण शिकलो,तर आपल्याला जीवनात अडचणीत कसं जगायचं हे ही कळते.
तू अजूनही वेळेनुसार वागायला शिक. वेळ ही कधिही,कोणासाठीच थांबलेली नाही. आपण वेळेला आपल्या नियंत्रणात कधीच आणू शकत नाही. आपल्याला स्वताला वेळेनुसार चालावे लागेल. वेळेनुसार स्वतामध्ये बदल करून घ्यावे लागतील.
शाम तू एक नोंदवहीमध्ये तुला जे काम उद्या करायचे आहे ते एक दिवस अगोदर रात्री नोंदवहीमध्ये लिहून ठेव. लिहून ठेवलेले काम, आपण विसरलो जरी,नोंदवही बघताना ते लक्षात येते. पूर्ण केलेले कामावर नोंद कर.
शाम आता विचार करत घरी चालला होता. राम आणि स्वतामध्ये किती मोठा फरक आहे हे त्याला समजत होते. रामने वेळेचा कसा सदुपयोग करून घेतला हे शामला कळत होते.
आज शामच्या आयुष्यातील कित्येक वर्षे असेच वाया गेले होते. याचा एवढा मनस्ताप शामला होत होता की, बरयाचदा तो एकटाच तासनतास रडत बसायचा. शामला स्वताची चूक समजली होती,पण त्याने गमावलेले अनेक वर्षे त्याला परत मिळू शकत नव्हते.
शाम दुसऱ्या दिवसांपासून, रामने सांगितल्याप्रमाणे वेळेचे नियोजन करून कामे करत होता. शामला मनस्ताप तर होतच होता, कारण त्याने असे काही क्षण गमावले होते, ते परत कधीच येऊ शकणार नव्हते.
तात्पर्य : योग्यवेळी आपल्या जवळ असलेल्या वेळेचा जर का आपण सदुपयोग केला नाही तर आयुष्त आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. वेळ असताना वेळेबरोबर नाही चालले तर मनस्ताप होतो.
वरील घेतलेली नावे काल्पनिक आहे. याचा वास्तविक कुणाशी काहीही संबंध नाही.
आमचे लेख आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा.
Time management nakkich karu..Thanks for guiding.
Nice