आपले पाल्य दहावीमध्ये येताच सर्व पालकांना एकच प्रश्न सतावत असतो तो म्हणजे “आता पुढे काय?” माझा मुलगा,मुलगी इंजीनिअर,डॉक्टर,वकील,आएएस बनेल. पण निर्णय घेताना कधी आपल्या पाल्याचे मत काय आहे जाणुन घेण्याचा प्रयत्न आपण करतो का? नाहीना,
आपण फक्त आपल्या अपेक्षेचे ओझे त्यांच्यावर लादत असतो अगदी प्रेमाने नाहितर मग जबरदस्तीने , आपली इच्छा पुर्ण करण्यावर खरंतर आपला प्रयत्न करत असतो.
आपल्या पाल्याच्या आवडी-निवडीचा तर आपण कधी विचारच करत नाही कि त्याची आवड कशामध्ये आहे,त्याला काय बनायचे आहे,त्याची इच्छा काय आहे?
आपल्या आई-वडीलांनी अनपेक्षितपणे लादलेल्या अपेक्षेचे ओझे घेऊन बिचारे पाल्य चालत असतात,यापैकी काहीजण यशस्वी होतात तर काहीच्या पदरी अपयश पडते. यातुन मुलांच्या मनामध्ये एक आगळी-वेगळी भिती घर तयार करत असते व सतत विचारांचे चक्रीवादळ मनामध्ये थैमान घालत असते.
मित्र-मैत्रिणी आपल्यापुढे निघत असताना स्वतःला त्रास होत असतो हे त्यांच्याशिवाय कोण सांगू शकेल.
माझ्या मित्राच्या मुलाने MBBS ला प्रवेश घेतला म्हणून आपल्या पाल्यांनेसुद्धा MBBS ला प्रवेश घेऊन देण्यासाठी धडपडत असतो पण पाल्याची काय इच्छा आहे कधी जाणून घेण्याचा विचारदेखील मनामध्ये येत नाही. जे पालक आपल्या पाल्यांची आवडी-निवडीचा विचार करतात खरंतर तेच खुप यश संपादन करतात.
बहुतेक विद्यार्थी संगीत,क्रीडा,गायन इ. क्षेत्रांत उत्कृष्ट असतात,पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासाव्यतिरिक्त खेळण्यासाठीसुद्धा प्रवृत्त करावे जेणेकरुन त्यांच्या मनावरील दडपण कमी होईल व याचा फायदा त्यांना अभ्यासात होईल.
विद्यार्थ्यांनी परिक्षेच्याकाळात कुठल्याही प्रकारचे दडपण न बाळगता अभ्यासाची तयारी करावी. बहुतेकवेळा विद्यार्थी अभ्यास करताना परिक्षेच्या एक दिवस अगोदर रात्रभर जागतात व परिक्षेत वेळेवर आठवत नाही म्हणून चिडचिड करतात. अभ्यास झालेला असतानाही काहीच आठवत नाही.
माझ्या आजोबांनी सांगितलेला एक गुरूमंत्र आता मी तुम्हाला सांगू इच्छितो मी ही असाच परिक्षेच्या एक दिवस अगोदर रात्रभर अभ्यास करायचो व नेमके परिक्षेत पेपर सोडवताना आठवायचे नाही,
त्यावेळी माझ्या आजोबांनी मला एक सल्ला दिला कि “परिक्षेच्या एकदिवस अगोदर चांगली झोप घे,चांगली झोप झाल्यानंतर पेपर सोडवायच्या अगोदर दहा मिनिटे शांत बस कसलाही विचार यावेळी करु नकोस,फक्त शांत डोळे मिटुन राहा. प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर शांतपुर्वक प्रश्न वाचून ज्या प्रश्नांची अचूक उत्तरे माहिती आहे अशा प्रश्नांना अगोदर प्राधान्य दे.
Really helpful!!
Thank You
छान