अहंकार (EGO) एक मानसिक आजार : (EGO is a mental disease):

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनुष्य आणि अहंकार (Ego) यांचा फार पुर्वीपासून संबंध राहीलेला आहे.मनुष्याला थोडे काही यश संपादन झाले की, त्याच्या वागण्यात,बोलण्यात मोठ्याप्रमाणात बदल जाणवतो. बदललेल्या वागण्यात त्या व्यक्तीचा अहंकार (Ego) दिसुन येतो.त्याला असे वाटते की,त्याच्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही.त्याचा बदलत असलेला स्वभाव आपल्याला लगेचच दिसुन येतो.त्या व्यक्तीनुसार त्यांच्या सारखे कुणीही नसते. जे काम तो करू शकतो,तेच काम इतर लोकं करुच शकत नाही.

https://www.khadedipak.com

EGO IS A MENTAL DISEASEप्रत्येक मनुष्याला कसलातरी अहंकार असतोच. मी पणा सोडत नसल्यामुळे भरपूरदा तो स्वताचे नुकसान करत असतो. व्यवहारात यश मिळाले म्हणून व्यापारांना अहंकार,शिक्षणात उत्तम म्हणून विद्यार्थ्यांना असलेला अहंकार.नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचा अहंकार. आपण एका उदाहरणातून समजुन घेऊया अहंकार हा एक मानसिक आजार कसा असू शकतो.

एक अत्यंत हूशार व्यक्तीचा, स्वतावर विश्वास असेपर्यंत तो अहंकार सारख्या मानसिक आजारास बळी पडत नाही. जो पर्यंत तो व्यवसाय किंवा नोकरी जो पर्यंत करत नाही तोवर त्याचे मन स्थिर व समाधानी असते.ज्यावेळेस त्याला नोकरी मिळते किंवा व्यवसाय सुरू करतो तिथपासून त्याच्या वागण्यात आपल्याला बदल जाणवतो. कमी वेळेत जास्त पैसा व मर्यादेपेक्षा जास्त स्तुती त्या व्यक्तीला इतर व्यक्तींपासून,मित्रांपासून,नातेवाईकांपासून एवढेच नव्हे तर अगदी आपल्या घरच्या व्यक्तींपासून दूर करत असते.


https://www.khadedipak.com

EGO KILLS YOUR THOUGHTSआपल्या जवळच्या व्यक्तींपासून दुरावा वाढत जात असतो तरीही तो आपल्याच अहंकाराच्या धूंदीत असतो. अहंकाराच्या नशेत त्या व्यक्तींला चांगले-वाईट काहीच दिसत नाही. आपण जे संगतो ते सर्वांनी ऐकलं पाहिजे, मी जे बोलेल तेच खरं असं त्याच म्हणने असते. जो व्यक्ती त्याच्या मनाविरुद्ध वागतो, तो व्यक्तीं त्याला नकोसा वाटत असतो. यामुळे अहंकारी व्यक्ती इतर लोकांशी भांडत असतो.दुसऱ्यांना कमी आणि तुच्छ लेखत असतो.जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा अहंकारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींना त्रास देत असतो.

ज्या व्यक्ती, अहंकारी व्यक्तीच्या प्रत्येक विचाराला चांगले म्हणत असतात, त्याचप्रकारच्या व्यक्ती अहंकारी व्यक्तींना आवडत असतात. अहंकारी व्यक्तींला फक्त आपली स्तुती ऐकण्याची सवय लागलेली असते. जर आपण केलेल्या कामाची स्तुती कुणी केली नाही,तर त्या अहंकारी व्यक्तींची चिडचिड होते. ज्यावेळी तुमचा आत्मविश्वास, अभिमान अतिआत्मविश्वासामध्ये जाऊ लागतो त्यावेळेस तूमचा अहंकार  जागृत होत असतो. एका विशिष्ट सिमेपर्यंत अभिमान टिकून असतो. त्याचबरोबर आपली वर्तणूकही मर्यादित असते. आपल्या बोलण्यात, वागण्यात बदल झालेला नसतो. एकदा की तुम्ही अहंकाराच्या आहारी गेलात की मग तुमचाही तुमच्यावर ताबा नसतो. आपले मन आपल्या अहंकाराच्या इच्छेनुसार काम करायला भाग पाडत असते.

https://www.khadedipak.com
अहंकारतुमच्या मनावर अहंकाराचा एवढा प्रभाव पडलेला असतो की आपले मन अहंकाराने सर्व कामे करत असते. आपल्या मनाला त्याची सवय लागलेली असते. सततच्या अहंकारपणाने वागणे आपल्या मनावर बिंबवले जात असते.आपल्या मनावर जे काही बिंबवले जाते त्याचप्रमाणे आपले मन कार्य करण्यास तयार असते.एकप्रकारची सवय आपल्या मनाला लागलेली असते. आपले अवचेतन मन या सर्व घटनांची नोंद करून ठेवते. एक अहंकारी व्यक्ती मी , माझे,माझा,माझ्या अशा शब्दांचा वारंवार उपयोग करत असतो. वारंवार उच्चारलेले अहंकारी शब्द तुमचे अवचेतन मन तुम्ही दिलेली आज्ञा आहे असे समजत असते. तुमच्या शब्दाला तुमची आज्ञा आहे असे समजुन आपले काम सुरू करतो. तुमच्या सचेत मनाला ,तुम्हीच बिंबवलेल्या शब्दांची सतत आठवण करून देत असते.  अहंकाराच्या आहारी गेल्यामुळे आपणांस चांगले-वाईट, खरे-खोटे कशाचेही भान उरत नाही. आपण अहंकाराच्या होडीमध्ये एकटेच प्रवास करत असतो. आपल्या अशा वागण्याने आपल्या घरातील सदस्य , जवळचे मित्र,नातेवाईक आपल्यापासून दूरावतात. 


https://www.khadedipak.com
HOW TO CONTROL YOUR EGO घरातील सदस्यांशी उद्धट बोलने, सतत अपमान करने,कमी लेखने, मित्रांशी उर्मटपणे वागणे. त्यांचे विचार न ऐकणे, आपल्या कार्यालयातील सहकारी मित्रांना खालच्या दर्जाची वागणूक देणे. प्रत्येकवेळी आपण कसे बरोबर आहोत हे सांगत असणे. आपल्या अहंकारामुळे( Ego) आपल्या कनिष्ठ सहकारी मित्रांना जाणीवपूर्वक त्रास देणे हे एक महत्त्वपुर्ण भाग बनलेला असतो. मात्र ती अहंकारी व्यक्ती आपल्या मुख्य कामापासून भरकटलेली असते. अहंकार जिवंत ठेवण्यासाठी अहंकारी व्यक्ती इतर गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यावर विशेष भर देत असतो.इतर कामामध्ये जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याला बरयाचदा नुकसान सहन करावे लागते. स्वताच्या नजरेत आपली खोटी शान सांभाळून ठेवण्यात प्रयत्न करत असतो. अशा त्रासदायक वागण्याने सर्वजण त्या अहंकारी व्यक्तींपासून दूर राहण्यातच चांगले आहे असे म्हणतात. त्या अहंकारी व्यक्तींला शक्य होईल तेवढे टाळणेच पसंद करतात. अशाप्रकारे नकळत अहंकारी व्यक्ती आपल्याच जवळच्या लोकांना दूर लोटत असतो. कालांतराने एकवेळ अशी येते की त्याच्यासोबत कुणीच नसते. एकटा पडत असल्याने चिडचिड वाढतच असते.

https://www.khadedipak.com

EGO ENDS YOUR OPPORTUNITYअहंकाराच्या रूपात एक मानसिक आजाराची सुरुवात झालेली असते. तुम्ही कितीही चांगले वागण्याचे ठरवलेले असले तरिही तुमचे अवचेतन मन तुम्हांला अहंकाराने बोलावयास, वागावयास भाग पाडत असते.अहंकाराने ग्रासलेल्या व्यक्तींपासून सर्वजण दूरच राहतात. 

रावण एक बुद्धिमान ,चतुर आणि महादेवाचा सर्वात आवडता भक्त होता. आपल्या शक्तीच्या जोरावर अनेक वेळा विजयी झाला होता. त्याला आपल्या शक्तीचा एवढा गर्व होता की,तो स्वतालाच देव समजायला लागला.आपण अमर असल्याचे सांगत फिरू लागला. त्याच्या मनामध्ये अहंकाराने जागा निर्माण केली. अहंकाराने श्री नारायण अवतार प्रभू श्रीराम यांना युद्धासाठी आवाहन दिले. आपल्या प्रबळ अहंकारामुळे आपले प्राण गमवावे लागले. अशाप्रकारे कितीतरी अहंकारी गतप्राण झालेले होते. आपला अहंकार आपले किती नुकसान करू शकते हे दिसते. आपल्या अवचेतन मनाला चांगले विचारच पुरवले पाहिजे नाहीतर याची शिक्षाही मिळेल यात काही शंका नाही.

अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि शत्रू आपल्यातच वास करत असतो. आता वेळ आहे ती आपल्या शत्रूला कायमस्वरुपी बाहेर काढायची. तरच आपला हा मानसिक आजार पुर्णपणे बरा होईल.

आणखी वाचा..


आपल्याला वरील लेख आवडला असल्यास आपले मत कमेंटद्वारे नोंदवा. सोशल नेटवर्कवर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. पुढे अजून लेख वाचण्यासाठी आम्हाला फाॕलो करा.

1 thought on “अहंकार (EGO) एक मानसिक आजार : (EGO is a mental disease):”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?