ई-कॉमर्स :
” इंटरनेटचा वापर करून एखाद्या सेवेची किंवा वस्तूची केलेली खरेदी किंवा विक्री म्हणजेच ई-कॉमर्स होय” यावेळी वस्तूची अॉर्डर व त्याचे पैसे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून केली जाते. भारतामध्ये मात्र कॕश अॉन डिलीवरी ला जास्त मागणी असते.
अॉनलाईन शॉपींग :
स्मार्ट मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर होत असलेली खरेदी, आकर्षक अॉफर्स,जास्तीत जास्त सुट, आपल्या देशात मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने,सहजपणे या मार्केटप्लेसवर पोहचता येते. इलेक्ट्रॉनिक्स ,फर्निचर ,हेल्थकेअर, अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी अॉनलाईन होत आहे. धकाधकीच्या व गुंतागुंतीच्या जिवनामध्ये शॉपवर जायला वेळ वाचत असल्याने सहज घरपोच सेवा या सर्व गोष्टींना प्राधान्य देतो. आता तर जेवणही अॉनलाईन अॉर्डर करता येते, तसेच ड्रोनचा डिलीवरीसाठी वापर या तंत्रज्ञान विकसित करून एक नविन उदाहरण बनले आहे. याअगोदर ड्रोनचा वापर फक्त लग्नसमारंभात व्हिडिओ करण्यासाठी करता येत होता.
ई-कॉमर्सचा सोशल नेटवर्कचा वापर:
सोशल नेटवर्कवर करोडो लोक अॕक्टीव असल्याने ,आपले प्रोडक्टस युजरपर्यंत योग्य जाहिराती देऊन त्यांच्यापर्यंत सहज पोहचते. प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार त्यांच्यापर्यंत जाहिरात पोहचवली जाते. आपल्या देशात लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सोशल साईट वापरली जाते.आज प्रत्येकाचे ३-४ सोशल अकाउंट आहेतच,या कंपन्यांच्या जाहीराती कुठल्यातरी अकाउंटवर दिसतातच.जर एखादे आवश्यक वस्तू आकर्षक किंमतीमध्ये जर त्याला मिळत असेल तर कुठलाही वेळ न घालवता ती व्यक्ती त्या वस्तूची अॉर्डर देतो. यामध्ये तुमच्या प्रोफेशननुसार, आवश्यकतेनुसार जाहीरात दाखवली जाते.