India is a biggest market for e-commerce ई-कॉमर्ससाठी(इलेक्ट्रॉनिक वाणिज्य) भारत एक मोठी बाजारपेठ


ई-कॉमर्ससाठी(इलेक्ट्रॉनिक वाणिज्य) भारत एक मोठी बाजारपेठ! 

https://www.khadedipak.com
E-commerce ( इलेक्ट्रॉनिक वाणिज्य )
होय, निश्चित होयच आहे. आपल्या देशाची अंदाजे १३५ कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या तुलनेत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जगाच्या लोकसंख्येपैकी अंदाजे १७% लोकसंख्या ही भारताने व्यापलेली आहे.साधारण ५०-५५ दशलक्ष लोकं हे इंटरनेट वापरत आहेत.मोठी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अलिकडच्या काळात आॕनलाईन खरदी-विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसुन येते. एखाद्या वस्तूची किंवा सेवेची संगणकाद्वारे किंवा मोबाईलचा वापर करून, इंटरनेटच्या साहाय्याने खरेदी-विक्री केली जाते, व त्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैशे दिले जाते यालाच ई-कॉमर्स (इलेक्ट्रॉनिक वाणिज्य ) म्हणतात.

https://www.khadedipak.com
Online shopping  with Electronic payment

भारतीय इलेक्ट्रॉनिक वाणिज्य बाजारपेठ २०२६ पर्यंत $२०० बिलियन पर्यंत मजल मारेल असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. इंटरनेटचा व स्मार्ट फोनचा वाढत चाललेल्या वापरामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक वाणिज्य बाजारपेठमध्ये कमालीची तेजी दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक वाणिज्याचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले गेले आहे. स्मार्ट फोनची आॕनलाईन विक्री,दररोज एक नविन स्मार्ट फोन बाजारात येत आहे. नविन फिचर्स, मोठी स्क्रीन साईज यामुळे तरूण आकर्षित होत आहे. आकर्षक  इक्सचेंज आॕफर आणि विविध बँकाचे कार्ड वापरून चांगली सूट, यामुळे मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

https://www.khadedipak.com
ONLINE SHOPPING USING E COMMERCE
१.०     बिझनेस टू बिझनेस (B2B),
२.०     बिझनेस टू ग्राहक(B2C),
३.०     ग्राहक टू ग्राहक (C2C),
४.०     ग्राहक टू बिझनेस (C2B).
५.०     ग्राहक टू ॲडमिनीस्ट्रेशन (C2A)
६.०     बिझनेस टू ॲडमिनीस्ट्रेशन (B2A)

एक मोठी बाजारपेठ:

भारतातील बहुतांश लोक आॕनलाईन खरदी-विक्री करत असतात.तरुणवर्गामध्ये स्मार्ट फोन,मोबाईल,टॕबलेट वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. अगदी लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत मोबाईलचा सर्रास वापर होत आहे. वेबसाईट, मोबाईल ॲप, डिजीटल पेमेंट सुविधा ,आकर्षक सूट ,कॕशबॕक आॕफर्स आणि विविध आॕफर्स यासारख्या असंख्य आकर्षक  आॕफर्स देऊन ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी प्रत्येक कंपनीचे प्रयत्न सुरू आहे. ग्राहकाच्या तक्रार निवारण करण्यासाठी कंपनीने आॕनलाईन २४ तास अत्यावश्यक सेवा सुरू केलेल्या आहेत. जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत आपले सर्व प्रोडक्टस कशाप्रकारे पाठवता येईल यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असतो.

https://www.khadedipak.com
E-COMMERCE WITH SMART PHONE

हे २१ वे शतक भारतासाठी खुपच खास असणार आहे यात काही शंका नाही. इलेक्ट्रॉनिक वाणिज्याचे भारतामध्ये प्रमाण वाढत चाललेले  आहे.नागरिक बाहेर दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ,आॕनलाईन खरेदी करत आहे.वेबसाईटच्या आणि अॕपच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्याला हवे असलेल्या वस्तू व सेवा मिळत आहे. यामुळे त्यांचा वेळ वाचत आहे आणि हाच वेळ आपल्या दुसऱ्या कामासाठी  उपयोग करुन घेत आहे. मोठमोठया कंपन्यांची भारतीय बाजारपेठेत यायला अति उत्सुकता दिसत आहे. असणार का नाही,एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात, एवढी मोठी बाजारपेठ जी उपलब्ध आहे.या बाजारपेठेत स्पर्धेचे प्रमाणही तेवढेच कमी आहे. कमी प्रमाणात असलेल्या  स्पर्धा यामुळे कंपन्यांची होत असलेली भरघोस कमाई यावरुनच स्पष्ट होते की भारत इलेक्ट्रॉनिक वाणिज्यसाठी किती मोठी बाजारपेठ आहे.

https://www.khadedipak.com
E-COMMERCE USING COMPUTER, SMART PHONE AND LAPTOP

हाय स्पीड इंटरनेट सेवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्यसाठी वरदान:

४ जी सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक कंपनी चांगली आॕफर्स देत आहे. कमी खर्चामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी तत्पर आहे. काही वर्षापूर्वी २जी सेवा एका महिन्यासाठी एक जीबी इंटरनेट डेटा वापरावयास मिळत असे. एक जीबी इंटरनेट डेटासाठी तब्बल रू २५० पर्यंत मोजावे लागत असे. आज परिस्थिती खुपच जलद गतीने बदललेली आहे हे तर आपल्याला दिसतच आहे. आज ४जी सेवा मिळविण्यासाठी एवढा त्रास होत नाही. आज आपल्याला फक्त रू३००-४०० मध्ये दररोज दीड ते दोन जीबी डेटा मिळत आहे आणि तो ही हाय स्पीड. एका सेकंदात आपल्याला हवी असलेली आॕनलाईन शाॕपींग साइट व मोबाईलवर ॲप मिळत आहे. ग्राहकांना कमी खर्चामध्ये जास्तीतजास्त इंटरनेट डेटा मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वाणिज्यसाठी हाय स्पीड इंटरनेट सेवा जणूकाही वरदानच सिद्ध झालेले आपल्याला दिसून येते. मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत चालल्याने इलेक्ट्रॉनिक वाणिज्य हा व्यवसायाला आपले पाय भारतातील बाजारपेठमध्ये चांगलेच स्थिर करण्यात यश आलेले आहे.

https://www.khadedipak.com
E-COMMERCE SALE

व्यापारांचा इलेक्ट्रॉनिक वाणिज्यसाठी प्रतिसाद :

इलेक्ट्रॉनिक वाणिज्यसाठी व्यापारांचा चांगला प्रतिसाद मिळणेही तेवढेच महत्त्वाचे होते. भारतातील भरपूर व्यापारांनी या व्यवसायाला साथ देत स्वतालाही इलेक्ट्रॉनिक वाणिज्यचा एक महत्त्वपुर्ण भाग समजून घेतले आहे. या कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आॕनलाईन विक्रेता नोंदणी विभागात एक व्यापाऱ्याला आपल्या दुकानाची नोंदणी करता येते. असंख्य व्यापारी या कंपनीशी जोडले जातात. कंपनी व्यापाऱ्यांनी भरून दिलेली माहीतीची पडताळणी करते व त्यानंतरच आपल्या आॕनलाईन शाॕपींग वेबसाईटवर त्यांचे प्रोडक्टस विक्री करण्यासाठी परवानगी व अधिकार देते. एका चांगल्या संधीचा काही व्यापारी निश्चितच लाभ घेतात.

https://www.khadedipak.com
E-COMMERCE MARKETING
आपले प्रोडक्टस विक्री करण्यासाठी अजुन एक नविन पर्याय मिळालेला असतो. कंपनीने दिलेल्या पॕनलचा उपयोग करून आपल्या प्रोडक्टसबद्दल व प्रोडक्टसचे चित्र दाखवून ग्राहकांना आकर्षित करू शकतात. ग्राहक आवडलेले प्रोडक्टस निवडक व्यापाराकडून खरेदी करतो, तीच आॕर्डर कंपनी त्या व्यापाराला पाठवते. व्यापारी ती आॕर्डर घेऊन ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी तयार असा संदेश कंपनीला पाठवतो. प्रोडक्टस शिपिंगसाठी कंपनी व व्यापारी मध्ये, व्यापारांनी निवडलेल्या पर्यायाला अनुसरून पुढची प्रक्रिया सुरू होते. अशाप्रकारे ग्राहकांनी निवडलेले प्रोडक्टस ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात. कंपनी यातून  व्यापाऱ्यांनीकडून ठरवलेला आपला नफा काढुन घेते. व्यापारांना आयते ग्राहक मिळविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे.

https://www.khadedipak.com
E-COMMERCE AND SOCIAL MEDIA

सोशल मिडियाचा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य व्यवसायावर प्रभाव:

इलेक्ट्रॉनिक वाणिज्य व्यवसायचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यामागे सोशल मिडियाचा मोठा वाटा आहे. सोशल मिडियाचा वापर भारतामध्ये मोठ्याप्रमाणात केला जातो. एका व्यक्तीचे कमीतकमी तीन-चार अकाउंट वेगवेगळ्या सोशल मिडियावर आहेतच. एक झाले की दुसरे सोशल ॲप सतत वापरत असतो. कंपनी सर्व बाबींचा विचार करत असते. जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी अगोदर वर्तमानपत्रे,रेडिओ,टेलीव्हीजन,पँपलेट,डूअर टू डूअर सेल इत्यादींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे. हे माध्यम जास्त खर्चिकही होतेच पण त्याचा पाहीजे तसा मोबदलाही मिळत नसे. सोशल मिडियाचा वापर बघता सर्व कंपन्यांनी सोशल मिडियाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. कमी खर्चामध्ये जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहचवता येते. तरुणवर्ग जास्त वेळ सोशल मिडियाचा वापर करत असल्यामुळे जाहिरात अगदी सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहचवता येते.
सोशल मिडियाद्वारे कंपनी आपल्याला पाहिजे ते लोकेशन ठरवून आपली जाहिरात प्रसिद्ध करतात. प्रसिद्ध केलेली जाहिरात सोशल मिडिया वापरकर्त्यापर्यंत पोहचल्याने वापरकर्त्याला जर जाहिरात आकर्षक वाटल्यास तो कंपनीच्या वेबसाईटवर किंवा ॲपवर जातो. यामाध्यमातून कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहचता येते व कंपन्यांना भरपूर फायदाही होतो. इलेक्ट्रॉनिक वाणिज्य या व्यवसायाला सोशल मिडियाचा खुप मोठा आधार असल्याचे आपल्याला दिसून येते. सोशल मिडियामुळे इलेक्ट्रॉनिक वाणिज्यसाठी फायदाच फायदा होत आहे.
प्रत्येक कंपनीने आपल्या ग्राहकांसाठीही घरी बसल्या बसल्या मिळकतीचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. याला ॲफिलेट प्रोग्राम असे म्हणतात. ग्राहकांना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता थेट नफा मिळतो. यासाठी एक नोंदणी ग्राहकांने करायची असते, कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात आपल्या सोशल मिडियावर लावुन त्यामाध्मातून कुठलेही प्रोडक्ट खरेदी केल्यास.कंपनीने त्या विशिष्ट प्रोडक्टसवर ठरवलेला मोबदला हा आपल्याला मिळवता येतो.
भारत म्हणूनच इलेक्ट्रॉनिक वाणिज्यसाठी एक खुप मोठी बाजारपेठ आहे असे मानायला जागा आहे आणि नक्कीच इलेक्ट्रॉनिक वाणिज्य हे भारतात कमालीची वाढ होत आहे.
आणखी वाचा:
आमची पोस्ट आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवावे तसेच आपल्या मित्र परिवार नातेवाईकांना शेअर नक्की करा.

2 thoughts on “India is a biggest market for e-commerce ई-कॉमर्ससाठी(इलेक्ट्रॉनिक वाणिज्य) भारत एक मोठी बाजारपेठ”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?