काॕपी करून उत्तीर्ण होणे म्हणजे स्वताला फसविणे का?


जर तुम्ही SSC & HSC परीक्षेत चांगले गुण मिळवणे आणि फक्त उत्तीर्ण होणे, एवढेच जर तुमच्या आयुष्याचं ध्येय असेल तर तुम्ही स्वताचे नुकसान करत आहात. काॕपी करून तुम्ही एक-दोन परीक्षेत उत्तीर्ण जरूर व्हाल पण आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागणार हे ही तेवढेच खरं आहे. 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://www.khadedipak.com
Copying 


खरंतर परीक्षा आणि परीणाम याविषयी तुमच्या मनात एक भिती दडुन बसलेली आहे. ही भिती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थ्यांना अपयश किंवा कमी गुण मिळण्याची भिती तर पालकांना आपल्या पाल्याला कमी गुण नाही मिळाले पाहीजे याची भिती.पालक व विद्यार्थी दोघेही परीणामाची व्यर्थ चिंता करत असतात.
https://www.khadedipak.com
काॕपी करून उत्तीर्ण होण्यापेक्षा अभ्यास करा

परीक्षेच्या परीणामाचा विचार करूनच आपण या भितीला खतपाणी घालत असतो. परीक्षा म्हटलं कि नानाप्रकारचे विचार आपल्या मनात येत असतात. परीक्षेच्या परीणामाविषयी तुमच्या मनात एक विशिष्ट प्रकारची भिती दडलेली आहे. या भितीला जोवर तुम्ही दूर करत नाही तोपर्यत तुमचे मन अधिकच चिंता करत जाईल.
https://www.khadedipak.com
पुस्तक ज्ञानाचे साधन

वेळच्या वेळी अभ्यास जर केला तर चांगले गुण मिळविणे सहज शक्य होईल. पण तुम्ही याच्या अगदी उलट करत असता. वर्षभर अभ्यासात लक्ष नसते, त्यामुळे परीक्षेची भिती तुम्हाला सतत सतावत असते. 

आज तुम्ही काॕपी करून नक्कीच चांगले गुण मिळवाल. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश देखील मिळवाल. कदाचित बारावीमध्ये देखील चांगले गुण मिळवाल, पण पुढे काय? आतापर्यत तुम्ही काॕपी करून चांगले गुण मिळवत आला आणि उत्तीर्ण होत गेलात. इथपर्यंत तुमचा प्रवास चांगला आणि यशस्वीपणे पार पडलेला असतो. यापुढे खरी परीक्षा असते ती तुमच्या ज्ञानाची. 

https://www.khadedipak.com
काॕपी करून स्वताला फसविणे होय

आता तुम्ही पुढील उच्चशिक्षणासाठी सज्ज झालेला असता. कुणी इंजिनियर,तर कुणी डाॕक्टर, तर कुणी मेडीकलसाठी, तर कुणी सी.ए.साठी प्रवेश घेणार असतो. इथे तुम्हाला काॕपी करून उत्तीर्ण होणे शक्य नसते. नविन विषय, इंग्रजी माध्यम, विषयाचा सखोल अभ्यास यासर्व गोष्टी महत्वाच्या असतात.

ज्या क्षेत्राची निवड तुम्ही केलेली असते, त्या क्षेत्रात तुम्हाला असलेले ज्ञान तुमचे मुल्यांकन करत असते. तुमच्याकडे पदवी आहे परंतु ज्ञान जर नसेल तर तुमच्या पदवीला काडीचीही किंमत नसते. “ज्ञानाविना शिक्षण हे व्यर्थच” म्हणजेच ज्ञानाशिवाय तुमच्या शिक्षण हे व्यर्थच असेल. त्यासाठी तुमच्यात ज्ञानाची भर घाला. ज्ञान जर असेल तर यश तुमच्याकडे आकर्षित होईल.

जिवनात यशाचा पाठलाग करत बसू नका. तुम्ही स्वताला एवढे सक्षम करा कि यश तुमचा पाठलाग करत तुमच्यापर्यंत येईल. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल हे पण तेवढेच खरे आहे. तुम्ही तुमचा शालेय ते महावीद्यालयीन प्रवासात भरपूर मेहनत घ्या. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करा. आज घेतलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला उद्या नक्कीच मिळेल.

आजपर्यंत काॕपी करून यश मिळवलेले असते पण आज प्रत्यक्ष जिवन जगात असताना यासर्वांचा काहीच फायदा होत नाही. जिवनात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुमच्याकडे पुरेसे ज्ञान असेल तर तुम्ही कोणत्याही संकटांना तोंड देऊ शकता. ज्ञानामुळेच मानवी जिवनाचा विकास होतो. त्यामुळे आज योग्य निर्णय घ्यायला हवा. तुम्ही आज घेतलेला निर्णय, तुमचे भविष्य ठरवित असतो. म्हणूनच सांगतो योग्यवेळी योग्य निर्णयाचीच निवड करा.

अर्धवट ज्ञान असणे नेहमीच धोकादायक ठरू शकते. कुठलेही ज्ञान घेत असताना त्याविषयी सखोल ज्ञान मिळवा. अभ्यास करत असताना आपली एकाग्रता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या विषयात आपली रूची आहे,आवड आहे त्या विषयाचा अभ्यास प्रथम करण्यास प्राधान्य द्यावा. आज वाचाल तरच उद्या वाचाल हे नेहमी लक्षात असू द्या.

आजच्या व्यस्त जिवनात पालकांना आपल्या पाल्यांकडे पुरेसा वेळ द्यायला वेळच नाही. त्याचाच परीणाम विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि नाही त्या सवयींना बळी पडतात. पालकांना आॕफीस आणि मोबाईल याशिवाय दुसरे काहीच नसते. पाल्यांना योग्य शिक्षण देणे एवढेच कर्तव्य पालकांचे नसून आपल्या पाल्यांना आणखी काय हवं आहे याचे भान ठेवायला हवे. आता बरेच पालक म्हणतीलही आम्ही आमच्या पाल्यांना चांगल्या शाळेत घातले आहे, त्यांना शिकवणीसुद्धा लावली आहे. पण मी सांगू इच्छितो की, फक्त फीस भरून किंवा चांगली शिकवणी देणे म्हणजेच सर्वकाही देणे असे नव्हे.

https://www.khadedipak.com
पाल्यांना पालकांचा सहवास पाहीजे असतो

पाल्यांना आज खरंतर तुमचा सहवास हवा असतो. तो भुकेला असतो तो तुमच्या प्रेमाचा, तो भुकेला असतो तो तुम्ही केलेल्या कौतुकाचा. आपल्या पाल्यांना वेळ द्या, प्रेम द्या आणि सहवास द्या. आपल्या पाल्याचे कौशल्य व आवड ओळखुन त्यास त्याप्रकारचे शिक्षण द्या. तुमच्या अपेक्षेचे ओझे त्यांच्यावर लादू नका. 

https://www.khadedipak.com
पाल्यांना वेळ द्या

विद्यार्थ्यांनीही थोडा विचार आज करायला हवा. आपले आई-वडील आपल्या शिक्षणासाठी किती परीश्रम करत आहे याची जाणीव ठेवा. त्यांच्या भावनांचा आदर राखा.

विद्यार्थ्यांनी आपल्या हृदयावर हात ठेऊन स्वताला विचारा की काॕपी करून मी स्वताला फसवत तर नाही ना? याचे उत्तर जर नाही असेल तर चांगलेच. कदाचित जर हो असेल तर मग एक मनाशी संकल्प करा, यापुढे कधीही स्वताला फसवणार नाही. एवढे करूनसुद्धा तुम्ही जरा चुकीच्या मार्गावर जात असाल तर थोडं थांबा.  आपले डोळे मिटुन परीश्रम करत असलेल्या आपल्या आई-वडीलांचा चेहरा डोळ्समोर आणा. त्यांनी पाहीलेले स्वप्न त्यांच्या डोळ्यांत बघा. तुमचे पाय चुकीच्या मार्गावर परत कधीच जाणार नाही.

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?