ऊन्हाळा आल्यावरच पाण्याची काटकसर करण्याची आठवणआपल्याला होते. आठ ते नऊ महीन्यापर्यंत आपण पाण्याची काळजी करत नाही. ऊन्हाळा आला की पाण्याची काळजी करतो. पाण्याविषयी एवढी काळजी करतो आणि इतरांनाही घ्यायला सांगतो.
माणसाची एक सवय सुरूवातीपासूनच राहीलेली आहे. कुठलेही काम करताना अगदी वेळेवरच करायचं, मग ते वैयक्तिक असो की पाण्याविषयी. पाण्याचे पुर्वनियोजन न करण्याची चूक आपण नेहमीच करत आलो आहे. ऊन्हाळा आला की सर्वचजण पाणी कसे वापरायचे याचाच सल्ला देत असतो summer and importance of water. स्वतः मात्र कधीच पाण्याची बचत कशी करायची याबद्दल विचार देखील करत नसतो.
आपल्याला प्रत्येकाला फुकटचे सल्ले द्यायला आवडते मात्र कुणाचे सल्ले ऐकण्याची आपली तयारीच नसते. ऊन्हाळ्यात पाण्याचा अभाव याला आपणच जबाबदार आहोत. ऋतू वेळेवर न येण्यालाही आपणच जबाबदार आहोत. आपण निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत.
वृक्षाच्या होणारी कत्तल, वृक्षाचे दिवसेंदिवस घटणारे प्रमाण, टेकड्या, पर्वतांचा नायनाट, मातीचा उपसा या सर्व निसर्गाचा समतोल बिघडवत आहे. पाणी संपुर्ण सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वपुर्ण आहे. पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पाण्याशिवाय जग ही कल्पना जरी मनात आली तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.
पाणी जपुन वापरा
पाणी साठवुन ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो rain harvesting. नेमके पाणी काटकसरीने कसे वापरायचे हे आपण जाणून घेत नाही. पाण्याचं महत्व माहीत असतानाही आपण पाण्याचा सर्रास वापर करत असतो. ऋतूच्या अनियमित बदलासाठी आपणच दोषी आहोत. आज पाऊस वेळेवर येत नाही, येणार तरी कसा? एकीकडे नियमित वृक्षाची कत्तल होताना दिसते. आपण याकडे दुर्लक्ष करत असतो. याचा थेट परीणाम पर्यावरणावर होत असतो. वेळेवर पाऊस न होणे, पर्याप्त आॕक्सिजन न मिळणे, अशुद्ध हवेचे प्रमाण वाढने सुरूच असते.
ऊन्हाळा आल्यावरच पाण्याची काटकसर करण्याची आठवण आपल्याला होते
पावसाळ्यात पाऊस जर चांगला झाला असेल तर ठिक आहे. यावर्षी ऊन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही असा समज आपण स्वताशीच करत असतो. ऊन्हाळ्यात पाण्याची येणारी अडचण माहीत असताना आपण पाण्याचा भरपूर उपयोग करतो. ऊन्हाळ्यात पाणी कमी उपलब्ध असल्याने त्याचा वापरही मर्यादित असतो summer and importance of water. मोटारी धुण्यासाठी साध्या बाधलीमध्ये पाणी घ्यावे लागते. ऊन्हाळ्यात पाणी सहजतेने उपलब्ध होत नाही. साधारणतः मार्च महीन्याच्या अखेरपर्यंत टँकरनेही पाणी सहज मिळते. एप्रिल-मे महीन्यात मात्र टँकरसुद्धा वेळेवर मिळत नाही.
पाण्याचा अतिरेक टाळा
ग्रामीण भागाकडे तर लोकांना मीलो दुरून डोक्यावर पाणी आणावे लागत असते. नळाला पाणी महीन्यापर्यंत येत नाही. विहीर जवळपास असेल तिथुन पाणी आणायचे व आपले काम भागायचे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी खुप संघर्ष करावा लागत असतो. दोन हजार लिटर पाण्यासाठी रू ४००-५०० एवढे देऊनसुद्धा वेळेवर पाणी मिळत नाही. एवढा प्रचंड त्रास आपल्याला पाण्याअभावी ऊन्हाळ्यात सहन करावा लागतो. म्हणुनच तर इतर ऋतूच्या तुलनेत आपण ऊन्हाळ्यात पाण्याच्या वापराविषयी जागरूक असतो.
ऊन्हाळा सुरू होण्याअगोदरच आपण पाणी साठवणे व जिरवणे यावर भर द्यायला पाहीजे. रेन वाटर हार्वेस्टिंग rain harvesting का करावे, याचा फायदा आपल्याला कशा प्रकारे होईल याबद्दल जनजागृती करायला हवी. जास्तीतजास्त लोकांपर्यंत याचे महत्व आणि आवश्यकता पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे.
प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये यासाठी विविध उपक्रम राबवायला पाहीजे. ऊन्हाळ्यात पाण्याच्या समस्या येऊ नयेत म्हणून काय खबरदारी घेणे आवश्यक आहे यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यक तेवढेच पाणी वापरणे गरजेचे आहे. असे केल्यावरच ऊन्हाळ्यात पाण्याची टंचाई होणार नाही.
हात धुताना वाश बेसीनचा नळ सुरू ठेवणे, यामुळे भरपूर पाणी वाया जात असते. नळीचा वापर करून कार धुणे. यासर्व सवयीमध्ये आपल्याला बदल करावाच लागणार आहे. भविष्यात होणाऱ्या त्रासाला टाळण्यासाठी आपल्याला वर्तमानातच उपाययोजना करावी लागणार आहे. पाण्याची गळती थांबवावी लागणार आहे. पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर्स पाणी वाया जाते. पाण्याच्या पाईपची पाहणी करून गळतीची खात्री करने आवश्यक आहे. पाणी आणि वापर याविषयी लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत जनजागृती करणेही तेवढेच आवश्यक आहे.
फक्त summer and importance of water ऊन्हाळ्यातच आपल्याला पाण्याअभावी खूप त्रास सहन करावा लागत असतो. पाण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत असतो. इतर ऋतूंच्या तुलनेत ऊन्हाळ्यातच पाणी सहजतेने उपलब्ध होत नाही. म्हणूनच तर आपण इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात पाण्याची काटकसर rain harvesting कशी करता येईल यावर भर देत असतो.
PANI ahe tar jivan ahe..
Save water
Save lifes