महाभारतामध्ये श्रीकृष्णाने धर्माच्या रथावर बसुन छळ करून अनेक महारथींना यमसदनात धाडले होते. कौरवसेनेत सर्व बलशाली आणि महान योद्धे होते. या महारथींचा वध करने जवळजवळ अशक्यच होते. पांडवांचा या युद्धामध्ये विजय होणे अत्यावश्यक होते. भगवान श्रीकृष्ण यांना माहीत होते की या महारथींना छळ करूनच मारणे शक्य आहे.
महाबली पितामा भीष्म, आचार्य द्रोण, अंगराज कर्ण, दूर्योधन, जयद्रथ, यामहारथींचा वध करने पांडवांसाठी अशक्यच होते. हे सर्व महारथींकडे शस्त्र आणि अस्त्रांचा भांडार होता. विश्वातील सर्वात घातक अस्त्रे होती.
धर्म-अधर्माच्या या युद्धात जर धर्माचा विजय निश्चित करायचा असेल तर या महारथींचा वध हा छळ करूनच करावा लागेल हे श्रीकृष्णाला माहीत होते. श्रीकृष्णाने वेळोवेळी पांडवांचे या महारथींपासून रक्षण केलेले होते. पांडवांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्वःत श्रीकृष्णच कवच बनून उभे होते.
महाभारत युद्धाने वीर अभिमन्यूच्या मृत्युनंतर एक वेगळेच वळण घेतले होते. दूर्योधन यांच्या आदेशानुसार आचार्य द्रोण यांनी चक्रव्युह या व्यूची रचना केली होती. या कटात अभिमन्यूला अडकवून त्याचा वध दूर्योधनला करायचा होता.
अर्जुन आणि कृष्ण आपल्या मित्र पक्षाच्या मदतीसाठी युद्धभुमीपासून दूर गेले होते. अर्जुन आणि श्रीकृष्णाशिवाय पांडव शक्तीहीन झालेले होते. मामा शकूनीच्या कूटनितीमुळे अर्जुनला युद्धभुमीपासून दूर जावे लागले होते.
जयद्रथने महादेवला प्रसन्न करून,पांडवांकडून झालेल्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी पांडवांना हरवण्यासाठी वर मागितले होते. भोलेनाथ महादेवांनी अर्जुन व्यतिरिक्त कुठलेच पांडव तुला पराभूत करू शकणार नाही असं वरदान जयद्रथला दिले होते.
युवराज दूर्योधनच्या आदेशानुसार सेनापती आचार्य द्रोण यांना चक्रव्युहची रणनिती आखण्यास सांगितले होते. अर्जुन युद्धभुमीपासून दूर गेला होता. अभिमन्यूने साहस दाखवत ते चक्रव्युह भेदले आणि मधोमध महारथींच्या जाळ्यात सापडला होता.
जयद्रथ स्वःत चक्रव्युहच्या बाहेर पांडवांना रोखण्यासाठी थांबला होता. आज सर्व पांडव जयद्रथसमोर शक्तीहीन झालेले होते. दुसरीकडे चक्रव्युहच्या मध्यभागी सापडलेला अभिमन्यू या महारथींबरोबर एकटाच युद्ध करत होता.
दूर्योधनाने अभिमन्यूला तडपुन मारायचे होते. शेवटी अंगराज कर्णला हा अन्याय सहन न झाल्याने त्याने स्वःतहून अभिमन्यूचा वध केला आणि त्याला मुक्ती दिली.
जयद्रथच्या क्रूरपणाची अर्जुनला भयंकर चीड आली होती. अर्जुनने सर्वांसमोर जयद्रथला उद्या सुर्यास्तापूर्वी मारण्याची प्रतिज्ञा केली होती. जयद्रथला सुर्यास्ताच्यापुर्वी मारण्यास मी असमर्थ झालो तर मी स्वःतहून देहत्याग करील अशी प्रतिज्ञा अर्जुनने घेतली होती.
कौरवपक्षाला हा संदेश कळल्यानंतर जयद्रथला युद्धभुमीपासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. काही झालं तरी जयद्रथला सुर्यास्ताच्यापुर्वी युद्धभुमीत न येण्याचा आदेश मिळाला होता. युद्धाला सुरूवात झाली, अर्जुनचे डोळे फक्त जयद्रथला शोधत होते. जयद्रथ युद्धभुमीत कुठेच दिसत नसल्याने अर्जुनचा संताप वाढत चाललेला होता.
कौरवसेनेचे युवराज आणि मामा शकुनी सुर्यास्ताची वाट बघत होते. सुर्यास्त होण्याची वेळ झालेली होती. श्रीकृष्णानं पुन्हा एकदा धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या विजयासाठी छळ केला. आपल्या माया शक्तीने सुर्यास्त झाल्याची परिस्थिती निर्माण केली. दूर्योधन व मामा शकुनी खुश झाले होते आणि अर्जुनास आपल्या प्रतिज्ञाची आठवण करून देत होते.
अर्जुनला आपली प्रतिज्ञेनुसार आपला देहत्याग करणे भाग होते. अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण कशी करणार, हे दृश्य बघण्याचा मोह जयद्रथला आवरता आला नाही. जयद्रथ युद्धभुमीत येऊन पोहचला. जयद्रथला आपला मोह आवरता आला नाही आणि सर्वांच्या समोर येऊन जोरजोरात हसत उभा राहीला.
अर्जुनने स्वताला अग्नीच्या स्वाधीन करणार, तोच कृष्णाने अर्जुनला आवाज दिला. थांब कौतेंय अर्जुन, अजुन सुर्यास्त झालेला नाही आणि तुझे लक्ष तुझ्यासमोर आहे. आपला गांडीव उचल आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण कर. श्रीकृष्णाने आपल्या मायेचं आवरण बाजूला करताच, युद्धभुमीत पुन्हा उजेड झाला. अर्जुनने क्षणाचाही उशीर न करता आपला बाण जयद्रथच्या दिशेने सोडला आणि अशाप्रकारे जयद्रथचा वध केला.
महाबली गंगापुत्र पितामा भीष्म वधः
महाभारतातील एक महान आणि महत्त्वपुर्ण पात्र,ज्यांना हस्तिनापूरची सुरक्षा भिंत म्हणून ओळखले जाते. पितामा भीष्म जोपर्यंत कुरूक्षेत्रात शस्त्र घेऊन उभे होते तोपर्यंत कौरवसेनेचा पराभव अनिश्चित होता. गंगापुत्र पितामा भीष्म हे कौरवसेनेचे सरसेनापती होते. पितामा भीष्मचा वध करने अशक्य होते.
भीष्म यांना त्यांचे वडिल शंतनू महाराजांनी इच्छामृत्युचे वरदान दिलेले होते. पितामाच्या इच्छेशिवाय त्यांचा वध करने तर दूरच, त्यांना निशस्त्र करनेही अशक्य होते. पांडव प्रिय असले तरीही आपले वचन आणि धर्म यांच्याशी कधीच तडजोड केली नाही.
हस्तिनापूरच्या सिंहासनाप्रती स्वताला सेवक मानणारे पितामा भीष्मचा वध, छळ केल्याशिवाय शक्य नाही हे कृष्णाला माहीत होते. पांडव अजुनही पितामाला आपला शत्रू मानायला तयार नसल्याने कृष्णाने स्वताचे वचन तोडण्याचा निर्णय घेतला.
पितामा पांडवसेनेवर तुटुन पडलेले होते. पांडवसेना पितामाच्या या महाभयानक रूप पाहून भयभयीत झाली होती. आपले प्राण वाचवण्यासाठी पांडवांकडे विनंती करत होती. पांडवही पितामाला थांबवण्यात असक्षम होते. अर्जुनकडे पितामाला थांबवण्यासाठी सामर्थ्य, शक्ती आणि कृष्णाचे मार्दर्शन होते.
आपल्या पितामावर आपण वार कसा करू शकतो यामध्येच अर्जुन गुरफटलेला होता. अर्जुनच्या मनाची द्विधा मनस्थिती कृष्णाला कळून चूकली होती. अर्जुनला यातून बाहेर काढण्यासाठी स्वताला(कृष्णाला) शस्त्र न उचलण्याचे वचन मोडावेच लागेल. कृष्ण रागाने ओरडत म्हणाले, गंगापुत्र भीष्म थांबा, तुम्ही आता शस्त्राचा त्याग करा.
पितामाला आपल्या शक्तीचा आणि वचनाचा अहंकार झालेला होता. त्यांनी कृष्णाला सांगितले की, वासूदेव मी माझा धर्म पाळत आहे तेव्हा आपण माझ्या समोर येऊन मला तुमच्यावर वार करण्यास परावृत्त करू नका. मला माझ्या धर्म करण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही.
कृष्णाने रथातून खाली उतरून रथाचे चक्र आपल्या एका हातामध्ये पकडले. भीष्मला उद्देशून, कृष्ण म्हणाले की, महामाहीम मी तुमचा वध करू शकतो आणि असे करण्यासाठी मला कुठल्याही शस्राची आवश्यकता नाही, हे रथाचे चक्रच पूरेसे आहे.
रथाचे चक्र बघताबघता सुदर्शन चक्रामध्ये परावर्तित झाले. कृष्णाने पुन्हा पितामाला सांगितले. हे महाभारत माझ्या इच्छेनुसार आहे, तुम्ही आज युद्धभुमीत माझ्याच इच्छेने आहे, तुमचे जीवन माझ्याच इच्छेनुसार आहे आणि तुमची मृत्यूही माझीच इच्छा आहे.
असे कुठलेच वचन,आशिर्वाद आणि वरदान नाही की, मी त्याला खोटे ठरवू शकत नाही. तुम्ही नीयतीच्या कार्यामध्ये एक मोठा अडथळा बनलेला आहात. तुम्ही तुमच्या शस्त्राचा त्याग करून मृत्यूचा स्विकार करा यातच तुमचे कल्याण आहे.
पितामाला कृष्णाच्या देवअवताराची आठवण झाली आणि स्वताला कृष्णाला सोपवून या जीवनाचा अंत करा असे सांगितले.
भीष्मला वाटत होते की, आजपर्यंत त्यांनी अधर्म केला नाही. माधवने पितामाला त्यांच्या अधर्माचे ज्ञान दिले. महामाहीम जर तुम्ही तुमच्या शक्तीचा योग्य वापर केला असता तर आज हे महाभारत घडले नसते.
अर्जुनला कृष्णाने हे नाही करावं म्हणून कृष्णाला वचन दिले की मी युद्धभुमीत मी पितामाला मृत्यू देईल पण तुम्ही आपले वचन मोडू नका. पितामा शस्त्रांचा त्याग करायला तयार होते पण शिखंडणी ज्यावेळेस युद्धभुमीत माझ्यासमोर येईल त्याचवेळी मी माझ्या शस्त्रांचा त्याग करीन असे सांगितले.
शिखंडणी पितामासमोर येताच त्यांनी शस्त्र हातातून सोडले. शिखंडणीने पितामाकडे एक धारदार बाण सोडला जो पितामाच्या छातीत आरपार रूतला. पांडवांनी पितामावर एकत्रितपणे बाणांचा मारा केला. पितामा जखमी होऊन बाणांच्या शय्येवर पडले होते. उत्तरायाणपर्यंत पितामा बाणाच्या शय्येवरच होते. शेवटी कृष्णाची भेट घेऊन आपल्या देहाचा त्याग केला.
आचार्य गुरू द्रोणः
कौरव आणि पांडवांचे गुरू, आचार्य गुरूद्रोण ही महाभारतातील युद्धाचे एक महत्त्वपुर्ण पात्र होते. आपली शस्त्रविद्या हस्तिनापूरच्या सिंहासनाप्रती बांधलेली असेल असे वचन दूर्योधनला दिल्यामुळे अधर्माच्या बाजूने उभे होते.
ज्या गुरूकडून युद्धकौशल्याचे धडे घेतले होते त्याच गुरूच्या विरोधात त्याचा वापर करण्याची वेळ पांडवांवर आली होती. आचार्यच्या युद्धकौशल्यापुढे कुणाचाच टिकाव लागणार नव्हता. पांडव आचार्य द्रोणला काही क्षणासाठी रोकू शकृत होते पण त्यांचा वध कृरू शकत नव्हते.
आचार्य द्रोणचा वध करण्याची शपथ दृष्टद्यूमने घेतली होती. आचार्य द्रोणचा वध केल्याशिवाय धर्माचा विजय होणे अशक्य आहे कृष्णाला माहीत होते. आचार्य द्रोणची एक कमकुवतपणा कृष्णाला माहीत होता. पूत्रप्रेम हीच द्रोण यांची एकमात्र कमकुवत बाजू होती.
कृष्णाने एक रणनिती आखली, अश्वत्थामाचा भीमने वध केला असं युद्धभुमीत दिवंडी पेटवून द्यायची. युधीष्टीरने गुरू द्रोणला हे सर्व खरं आहे असं सांगायचे ठरलेले असते. भीम युद्धभुमीत अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध करतो आणि मी अश्वत्थामाला यमसदनी धाडले असं सांगत फिरतो.
अश्वत्थामाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर गुरू द्रोण अस्तव्यस्त होऊन जातात. भीमच्या बोलण्यावर आचार्य द्रोणला विश्वास नसतो. आचार्य द्रोण धर्मराज युधीष्टीरला विचारतात की हे खरं आहे का? युधीष्टीर यावर उत्तर देत म्हणतो की, होय भीमने अश्वत्थामाचा वध केला. ऐवढे ऐकताच आचार्य द्रोण पूढचे वाक्य न ऐकताच शस्त्रांचा त्याग करतात कारण त्यांना माहीत होते धर्मराज युधीष्टीर खोटे कधीच बोलणार नाही.
अर्धसत्य ऐकून आपल्या शस्त्रांचा त्याग करून ध्यानस्थ बसतात. युधीष्टीर आपले पुढील वाक्य हळू आवाजात पूर्ण करणार तोच कृष्ण शंखनाद करायला सुरूवात करतो. भीमने अश्वत्थामाचा वध केला पण तो एक हत्ती होता.
कृष्णाच्या सांगण्यावरून दृष्टद्यूम या संधीचा फायदा घेत आचार्य द्रोणचे शीष,धडापासून वेगळे करतो. याप्रकारे आचार्य द्रोणचा वध छळ करूनच संभव झाला होता.
अंगराज कर्ण वधः
महाभारतातील अतिशय महत्त्वपुर्ण पात्र जर कुणी असेल तर कर्णाच नाव ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजेच अंगराज कर्ण. प्रभू परशूरामशिष्य, सूर्यपुत्र कर्ण.
तोच कर्ण आज आपल्या मित्राला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी आपल्याच भावांशी रणांगणात उतरतो. विश्वातील अतिशय घातक शस्त्र आणि अस्त्रांचा धनी असणारा हाच राधेय कर्ण. द्युतसभेत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शांत उभा असलेला कर्ण आज रणांगणात इच्छा नसताना कृष्णाचा शत्रू म्हणून उभा होता.
कर्णाचा युद्धभुमीत पराजय करणे अशक्यच होते. कर्णासारखा धनूरधर या विश्वात दुसरा कुणीच नव्हता. या महाभारतमध्ये धर्माच्या विजयासाठी कर्णाचा वध करणे आवश्यक होते. देवराज इंद्राला आपल्या मुलाची(अर्जुनची) सुरक्षेची चिंता सतत लागलेली असत.
एके दिवशी सकाळी साधुचे वेश घेऊन कर्णाकडे त्याची कवच-कुंडल दान मागण्यासाठी गेले.
देवराज इंद्र साधुच्या वेशमध्ये दान मागण्यासाठी येणार हे माहीत असुनसुद्धा कर्ण नेहमीप्रमाणे सुर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी गेला. अर्घ्य देऊन झाल्यानंतर इंद्राला आपली कवच-कुंडल काढुन दान केली. इंद्रदेवने कर्णाला महादानवीर असे संबोधले व आपले एक अस्त्र देऊन आशिर्वाद दिला.
कवच-कुंडल दान केल्यानंतरही कर्णाला पराभूत करणे अशक्य होते. गुरूश्रेष्ठ परशूरामांनी आपल्या या लाडक्या शिष्याला शाप दिला होता. या शापचा प्रभाव कमी करण्यासाठी आपला विजय धनुष्य आशिर्वाद म्हणून दिला होता.
कर्णाच्या हातामध्ये जोपर्यंत विजय धनुष्य राहील,तोपर्यंत कुणीच कर्णाला पराभूत करू शकत नाही असा आशिर्वादही दिला होता. कृष्णाला हे सर्व माहीत होते, कर्णाला मिळालेले शाप आणि त्याच्याकडून झालेला अधर्म यामुळेच कर्णाचा शेवट करणे आवश्यक होते.
कर्णाला छळ केल्याशिवाय मारणे शक्य नाही हे कृष्णाला कळून चुकलेले होते.
कृष्ण कर्णाला युद्धभुमीपासून दूर घेऊन गेले. कर्णाचा रथाला दलदलमध्ये जाण्यास भाग पाडले. कर्णाचा रथाचे चक्र दलदलमध्ये धसले गेले हातातील विजय धनुष्य रथामध्येच पडला. रथाचे चक्र अचानक जमिनीत धसल्याने कर्ण रथापासून काही अंतरावर फेकला गेला.
कर्ण आता निशस्त्र होता,तोच संधीचा फायदा घेत कृष्णाने अर्जुनास, कर्णाला युद्धासाठी निमंत्रण देण्याचे सांगितले. कृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनने कर्णाला युद्धासाठी ललकारले. कृष्णाच्या या निर्णयामुळे कर्णाला धक्काच बसला होता.
धर्माच्या रथावर बसून माधव अधर्म करण्यासाठी कसं काय सांगू शकता? कृष्णाने अर्जुनला वार करण्यासाठी सुचवले. अर्जुनने आपल्या गांडीव धनुष्याची प्रत्यंचा खेचत दोन धारदार बाण कर्णाच्या दिशेने सोडले. कृष्णाने अंजलीक बाणाने कर्णाचा वध कर म्हणून अर्जुनला सांगितले.
अंजलीक बाण सरळ कर्णाच्या मानेतून आरपार घुसला. कर्णाने माधवला प्रश्न केला हा सर्व अधर्म कशासाठी श्रीकृष्णा? कृष्णाने उत्तर दिले, राधेया तुझ्या पापामुळे आणि शापामुळेच हे सर्व घडत आहे.
कर्ण म्हणाला, मी कोणते पाप केले गोविंदा? कृष्णाने गंभीर आवाजात उत्तर दिले, पांचालीसोबत होत असलेला अन्याय तू शांत राहून बघत होता ते पाप, दूर्योधनसारख्या अधर्मी आणि पापीचा साथ देत अधर्माच्या बाजूने रणांगणात उभा राहण्याचे पाप, आपल्या मुलासारख्या अभिमन्यूला त्रासदायक मृत्यु देत असताना शांत राहण्याचे पाप कौतेंया.
धर्माच्या विजयामध्ये तू अडथळा होत होता कर्णा. मी कित्येकदा तुला संकेत देण्याचा प्रयत्न केला पण वेळ कुणाचेच काही चालू देत नाही. मी भविष्य बदलण्याचा प्रयत्न करत होतो पण तुझे वचन, शाप आणि पाप यामुळे असं होऊ शकले नाही.
आता बस पर राधेया, मुक्त हो, तुझ्यासारखा वीर न कधी झाला, न कधी होईल. याप्राकारे अंगराज कर्णालाही कृष्णाने छळ करून यमसदनी धाडले आणि पांडवांचा विजय सुकर केला.
दूर्योधन वधः
महाभारतातील क्रूर आणि महाबलशाली दूर्योधन याच्या अहंकाराचाच परिणाम होते महाभारत. पांडवांच्याविषयी द्वेश दूर्योधनाने स्वताला वेगळे ठेवले होते. मामा शकुनीच्या सल्ल्यानुसार दूर्योधन अनेक शडयंत्र रचत गेला.
हस्तिनापूरच्या सिंहासनावर आपला अधीकार समजून शकुनीच्या चाणाष्क बुद्धीच्या जोरावर आणि आपल्या मित्र कर्णाच्या कौशल्याच्या बळावर या विनाशक महाभारत युद्धाला निमंत्रण दिले. सरसेनापती महाबली, महामाहीम पितामा भीष्म, गुरूश्रेष्ठ आचार्य द्रोण, कर्ण, अश्वत्थामा आणि नारायणीसेना यामुळे दूर्योधन स्वताला विजयी झाल्यासारखा वागत होता.
युद्धभुमीत आपले एक-एक आधारस्तंभ कोसळल्यानंतरही अहंकार कमी होत नव्हता. आपल्या भावंडांचा मृत्यु होत असताना,प्रतिशोध घेण्याची भावना मनामध्ये प्रखर होत चाललेली होती.
गांधारीने महादेवकडे दूर्योधनाच्या रक्षणासाठी मदत मागितली. भोलेनाथ महादेवांनी गांधारीला एक उपाय सांगितला की, तुझी दृष्टी दूर्योधनाच्या अंगावर जर पडली तर त्याच शरीर वज्र सारखं कठोर होईल त्याला कोणतेच शस्त्र भेदू शकणार नाही.
गांधारीने दूर्योधनाला निर्वस्त्र होऊन आपल्यासमोर उपस्थित होण्याचा आदेश दिला. दूर्योधन निर्वस्त्र होऊन गांधारीकडे जात असताना कृष्णाने अडथळे निर्माण करण्यास सुरूवात केली.
दूर्योधन कृष्णाने केलेल्या छळाचा बळी ठरला. कमरेखालील भाग वस्त्राने झाकवून गांधारीसमोर उभा राहीला. गांधारीची दृष्टी दूर्योधनावर पडताच त्याचे शरीर वज्रासारखे कठोर झाले पण झाकलेला भाग नाजूकच राहीला.
भीम आणि दूर्योधन यांच्यात जोरदार गदायुद्ध सुरू होते. भीमने केलेले वार निष्फळ ठरत होते, वज्रासारख्या शरीरावर याचा काहीच परीणाम होत नव्हता. भीमला काय करावे काही सुचत नव्हते.
भीमला माहीत होते कृष्णाशिवाय आपली मदत कुणीच करू शकत नाही. भीमने कृष्णाकडे बघितले, कृष्णाने आपल्या मांडीवर हात ठेवात इशारा केला. भीमला समजले की आता पूढे काय करायचे.
भीमने दूर्योधनाच्या मांडीवर जोरदार प्रहार केला आणि मांडी तोडून टाकली. असह्य वेदनामुळे दूर्योधन गतप्राण झाला.
याप्रकारे कृष्णाने छळ करून कौरवसेनेतील महारथींचा वध केला.
आमचा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.
खालील लिंकवर क्लिक करा
खूप छान माहिती nice