प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.light lamp of knowledge education and remove ignorance

आज गरज आहे ती, ज्ञानाचा दिवा प्रत्येक घरात प्रकाशमान करण्याची (light lamp of knowledge education and remove ignorance). जर आपल्याला प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करायचा असेल तर अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल. अज्ञानाचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे.
 ज्ञानी मनुष्यसुद्धा अज्ञानी सारखा वागू लागला आहे. ज्ञानी मनुष्यांनी अज्ञानाची पट्टी डोळ्यावर बांधून, समाजासाठी आपल्या कर्तव्यापासुन पाठ फिरवली आहे. या समाजाला अज्ञानी मनुष्यामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान ज्ञानी मनुष्यांच्या अज्ञानपणामुळे झाले आहे.
अज्ञान असल्यास त्या व्यक्तीला ज्ञान मिळवता येते पण ज्ञानी मनुष्य अज्ञानासारखं वागू लागल्यास त्याला कसं जागं करणार? आज शिक्षणाचं महत्व आपल्याला कळलचं आहे. आज आपण या आधुनिक जगात वावरत आहे. जीवन जगताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ज्ञानाविना तुमची किंमत तीच आहे जी शरीराची आत्म्याविना आहे. जसे आत्माशिवाय तुम्ही जगू शकत नाही, तसेच ज्ञानाशिवायही तुम्ही जगू शकत नाही.

 

प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.
light lamp of knowledge education and remove ignorance

ज्ञान आपल्याला जन्मताच लाभत नाही. ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि साधना करावी लागते. अज्ञान आपल्या जीवनात नेहमी अंधकार करत असते. अंधकारामुळे कित्येकांचे जीवन उध्वस्त झालेले आहे. 

वयानुसार ज्ञान मिळवण्याचे साधन बदलत असते. बालपणीचे शिक्षण, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, अनुभवातून मिळणारे शिक्षण, अध्यात्मिक शिक्षण, यासर्वांचा योग्य अभ्यासातून ज्ञानप्राप्ती होते.
शिक्षण घेत असताना एकाग्रता असली पाहीजे. फक्त उच्च शिक्षण घेतल्याने आपण ज्ञानी होत नाही. ज्ञानी होण्यासाठी आपल्याला कोणत्याही विषयाचे खोलवर ज्ञान असने आवश्यक आहे. संपूर्ण ज्ञान मिळवल्याशिवाय आपण ज्ञानी होऊ शकत नाही.
ज्ञानी होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्यातील अहंकार नष्ट करावा लागत असतो. जिथे अहंकार निवास करतो तिथे ज्ञान नसते. जिथे ज्ञान असते तिथे अहंकाराला मुळीच स्थान नसते. अहंकार हा ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.

light lamp of knowledge education and remove ignorance
light lamp of knowledge education and remove ignorance

ज्ञान घेत असताना मन स्वच्छ आणि निर्मळ असणेही गरजेचं आहे. जर मन स्वच्छ आणि निर्मळ नसेल तर ते ज्ञान आपल्या काहीच कामाचे नसते. वाईट कामासाठी मिळवलेले ज्ञान एक न एक दिवस आपल्याला नक्कीच सोडून जाणार. 

वाईट हेतूने मिळवलेले ज्ञान हे अज्ञानाच्याच बरोबर आहे,याचा परिणाम आपल्याला जीवनात कधीतरी भोगावाच लागतो. महाभारतमध्ये कर्णानेही शिक्षण घेण्यासाठी वाईट हेतू मनात ठेवून ज्ञान मिळवले होते.
 
कर्ण स्वताला सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी अर्जुनशी स्पर्धा करण्याच्या इच्छेने आपल्याच गुरूशी खोटे बोलून ज्ञान मिळवले होते. ब्रह्मांडमध्ये सर्वात घातक शस्त्र आणि अस्त्रे असूनही त्याचा उपयोग कर्णाला करता नाही आला.
ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्याही कुटनितीचा किंवा छळाचा वापर करू नका. ज्याप्रकारे धारदार शस्त्राचा वापर न केल्याने त्या शस्त्राला गंज लागत जातो आणि त्याची धार बोथट होत जाते. ज्ञानाचंही असच आहे, जर आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग केला गेला नाही तर त्यालाही अहंकाराचा गंज लागत जातो.
प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.
प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान  करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.

आज शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा होत असलेल्या प्रचारामुळे साक्षरतेचं प्रमाण वाढले आहे. काही लोकांना असं वाटत असते की, उच्चशिक्षित असल्यामुळे आपण ज्ञानी आहोत.बऱ्याचदा ज्ञानी असल्याचे दाखवत असताना ते आपल्यातील अज्ञानाचे प्रदर्शन करत असतात. 

प्रत्येक घरात प्रत्येकजण साक्षर असलाच पाहीजे. आज समाजात अज्ञानाचा अंधकारही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुशिक्षित लोकसुद्धा अशिक्षित असल्यासारखे वागत आहे.
ज्ञानी लोकही अंधश्रद्धेच्या अंधकारामध्ये स्वताला झोकावत आहेत. जर ज्ञानी लोकंच अंधश्रद्धेच्या वाटेला जायला निघाले असतील तर अज्ञानी आणि असाक्षर लोकांना दोष देऊन काय फायदा?
तुमच्यात श्रद्धा असेल तर काही हरकत नाही पण हीच श्रद्धा,अंधश्रद्धेच्या वाटेवर जायला नको. अंधश्रद्धा आपल्यातील ज्ञान संपवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.
प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान  करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.

 

प्रत्येकांने आपआपल्या घरातील प्रत्येक सदस्यांना ज्ञानाचे महत्व पटवून द्यायलाच हवे. फक्त ज्ञान मिळवणे याचा अर्थ आपण ज्ञानी झालोत असा होत नाही. आपल्याकडील असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आणि लोककल्याणासाठी केला पाहीजे.
आज लोकं आपले ज्ञान आपल्यापर्यंतच ठेवत आहे. दुसऱ्यांना या ज्ञानाचा फायदा होऊ नये म्हणून इतर लोकांपासून, समाजापासून अंतर ठेवतात. आपल्या ज्ञानाच्या जोरावर इतर लोकांना तुच्छ समजतात. आपल्याला इतरांपेक्षा जास्त ज्ञान आहे असे समजत समाजात वावरत असतात.
 या लोकांनी जर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर लोकांना ज्ञान देऊन केला तर समाजात ज्ञानी लोकं वाढतील आणि अज्ञानाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. एवढे सर्व करण्यासाठी स्वतातील अहंकार बाजूला ठेवावा लागेल. अहंकार नेहमी आपल्याला एका विनाशाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो.
प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.
प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान  करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.

अंधकार हा जर आपल्या हृदयात असेल तर आपले ज्ञान लोखंडावरील गंजाप्रमाणे असते. आपल्याजवळील असालेले ज्ञान आपण दुसऱ्यांनाही देऊ केलं पाहीजे. एखाद्या शस्त्राचा वापर न केल्याने जसे ते गंजते अगदी तसेच आपले ज्ञान दुसऱ्यांना देऊन आपण आपल्या ज्ञानाला अजून धारदार करत असतो. 

अज्ञान जर वाढत गेले तर त्याचा परीणामही भयंकरच असणार आहे. आज आपण घरोघरी ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी प्रयत्नशील असले पाहीजे. अज्ञान आपल्याला अध्यात्मिक आणि वैज्ञानिक विचार करण्यापासून अडवत असतो.
अध्यात्मिक आणि वैज्ञानिक  विचारसरणीमुळेच अज्ञानाला त्याच्या अंधकाराचे बीज लावता येत नाही. आपले मन वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होत असते. मनामध्ये इच्छा नसतांना आपण अज्ञानाच्या जाळ्यात अडकून जातो. एकदा की या अंधकाराच्या जगातत तुम्ही फसलात,तर मग  यातून बाहेर पडणेही कठीण आहे.

 

प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.
प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान  करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.

 

दिवसेंदिवस अज्ञानाचा अंधकार वाढताना आपल्याला दिसतच आहे. या अंधकारामुळे अंधश्रद्धा वाढण्याचाही धोका तितकाच जास्त असतो. अज्ञान आपल्याला ज्ञानाच्या मार्गाने सहज येऊ देत नाही सतत काहीना काही अडथळे निर्माण करत असते.
अज्ञानाच्या अंधकाराला जर संपवायचे असेल तर ज्ञानाचा प्रकाश आपल्याला घरोघरी लावावाच लागेल. ज्या व्यक्तींकडे ज्ञानाचा भांडार आहे, त्या व्यक्तींनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याण आणि मानव कल्याणासाठी करायला हवा. ज्ञान हे सागरातील पाण्यासारखंच आहे ते कधी संपतच नाही.
तुमचे ज्ञान हेच तुमची खरी संपत्ती आहे. या संपत्तीला आपण जपायला शिकलं पाहीजे. ज्यावेळी ज्ञानाचा दिवा घरोघरी लागेल त्याचवेळी अज्ञानाचा अंधकारही नष्ट होईल.

प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.

प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान  करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.

लेख आवडल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा.

4 thoughts on “प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.light lamp of knowledge education and remove ignorance”

Leave a Comment

फिफा वर्ल्ड कप कतार 2022 चे वेळापत्रक ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला. Suryakumar Yadav mr360 Biography केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण
Suryakumar Yadav mr360 Biography Top 10 Indian CEO’s in the world केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला.