लाॕकडाऊन उठवल्यानंतर कशी असेल आपली जीवनशैलीत, हा प्रश्न आज भारतातीलच नाहीतर, जगातील प्रत्येक व्यक्तीला पडला असेल. आज कोरोनामुळे आपल्यावर काही बंधने आहेत. लाॕकडाऊन चे नियम पाळताना आता आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून घ्यावा लागणार आहे.
कोरोना एक वैश्विक महामारी म्हणून घोषित झालेली आहे. या महामारीचे संक्रमण खूपच झपाट्याने वाढत जाते, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. लाॕकडाऊन आहे तोपर्यंत सर्वजण नियमांचे पालन करणार हे नक्कीच.
आज प्रत्येक व्यक्ती लाॕकडाऊन लवकरात लवकर उठावे म्हणून प्रार्थना करत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जगातील जवळजवळ सर्वच देशांनी लाॕकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागला हे खरे आहे. एक विचार तुम्ही स्वःत करून बघा, लाॕकडाऊनशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय होता का? सरकारने लाॕकडाऊन केले नसते तर आपण स्वःतहून हे निर्णयाचे, नियमाचे पालन केले असते का?
लाॕकडाऊन हे आपल्या जनतेच्या रक्षणासाठी घेतलेला एक निर्णय आहे. आपल्याला जीवनदान देण्यासाठी घेतलेला एक निर्णय आहे. कदाचित आपण या निर्णयाचे स्वागत करून, काटेकोरपणे सुरूवातीला २१ दिवस घरात राहून सरकारला मदत केली असती तर ही साखळी खंडीतही झाली असती.
अदृश्यरूपी शत्रू तुमच्याकडून एका चूकीची अपेक्षा करत होता आणि तुम्ही ती केलीही. ही संधी साधून कोरोनाने आपल्यावर कधी हल्ला केला हे पण आपल्याला कळणार नाही.
आपणही या संसर्गजन्य आजारास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सोबत घेऊन मिरवत होतो.
लाॕकडाऊनमुळे आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान झालेत,पण काय हे नुकसान तुमच्या जीवनापेक्षा जास्त होते? आपले जीवन हे अमुल्य आहे, देशासाठी प्रत्येक नागरिक एक महत्वाचा भाग आहे.
आज देशात या महासंकटामुळे संपुर्ण परिस्थिती बदलून गेली आहे. शाळा,कार्यालये, धार्मिक स्थळे,महाविद्यालय सर्वच बंद झालेले आहे. कोरोनाचे संकट आपल्यावर तर आहेच,पण अजुन एक मोठे संकट या जगाच्या डोक्यावर तांडव करताना मला दिसत आहे.
जागतिक आर्थिक संकट, होय कोरोनानंतर आपल्याला जागतिक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
लाॕकडाऊन उठवल्यानंतर काय? याचा विचार कधी आपल्या मनात आलाय का? आतापर्यंत आपण जसं आपल जीवन जगत आलो आहे, आता मात्र तसं ते जगता येणार नाही. आपल्याला स्वःतहून स्वःताच्या जीवनशैलीत आवश्यकतेनुसार बदल करून घ्यावा लागणार आहे.
लाॕकडाऊननंतरही आपल्याला काही सवयी जास्त काळासाठी सुरूच ठेवाव्या लागणार आहेत. आपल्या जीवनशैलीत जसे मोबाईल आणि गाडी अत्यावश्यक साधने आहेत, तसेच आपल्याला आता साबण,हँडसॕनीटायजर, लिक्विडसोप, फेसमास्क, सामाजिक अंतर यांचाही आपल्या जीवनशैलीत सामावून घ्यावे लागणार आहे.
लाॕकडाऊन उठल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवावी लागणार आहे की,कोरोना एक संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढतो आणि अजुनतरी यावर कुठलीही लस किंवा औषध नाही.
आपल्याला आपले आयुष्य जगायचे असल्यास काही नियमांचे पालन करावेच लागणार आहे. स्वताच्या सवयींमध्ये आपल्याला परिस्थितीनुसार बदल करून घ्यावा लागणार आहे. आपली एक छोटीशी चूक आपल्यालाच नाहीतर आपल्या परीवाराला आणि समाजाला धोक्यात आणू शकते.
चला तर मग लाॕकडाऊन नंतर आपली वास्तविक जीवनशैली कशी असेल आणि काय बदल आपल्याला करावा लागणार आहे हे जाणून घेऊया. लाॕकडाऊननंतर आपल्याला स्वःतहून काही बंधने घालावी लागणार आहेत.
वारंवार साबणाने किंवा लिक्विड सोपने हात धूणे, वेळोवेळी सॕनीटायजर वापरणे, तोंडावर फेसमास्क लावूनच घराबाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सामाजिक अंतर पाळणे हे सर्व आपण लाॕकडाऊन असताना करत आलो आहोत. लाॕकडाऊननंतरही आपल्याला या सवयींना सोबत घेऊनच जावे लागणार आहे.
लाॕकडाऊन उठवले याचा अर्थ कोरोनावर आपण विजय मिळवला असा होत नाही. याआधीच आपल्या सर्वांनाच सरकारने काय काळजी घ्यायची आहे हे वारंवार सांगितलेही आहे. बरेच लोक विचारतात कि, लाॕकडाऊन उठवल्यानंतर काय?
लाॕकडाऊन उठवल्यानंतरही कोरोना असणार आहे, थोडक्यात काय तर, आपल्यालाच आपली काळजी घ्यायची आहे. तुम्हाला आता कुणीही सांगणार नाही की, ही काळजी घ्या,असं करू नका. आपल्याला ठरवायचं आहे की, आपल्यात अजून जगण्याची इच्छा शिल्लक आहे की नाही.
घराबाहेर निघताना पुढील काही महीने तरी आपल्याला फेसमास्क वापरावेच लागणार आहे. फेसमास्क किंवा रूमाल तोंडाला बांधूनच आपल्याला आपल्या कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि शाॕपींग माॕलमध्ये जावे लागणार आहे.
बाहेरून आल्यानंतर दररोज फेसमास्क व रुमाल धुवावे लागणार आहे. आपल्याला किंवा आपल्यापासून दुसऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
हँड सॕनीटायजर आणि साबण वापरणेः
आजपर्यंत आपण साबणाने हात धुतच होतो, तेही जेवणापुर्वी. आज परिस्थिती वेगळी आहे, आता आपल्याला दिवसातून किमान चार-पाच वेळा साबण लावून हात धूणे आवश्यक आहे. एवढेच नाहीतर सोबत एक छोटीशी हँड सॕनीटायजरची बाॕटल ठेवणेही आवश्यक आहे. आपले हात कुठेही ठेवण्याची सवय बदलावी लागणार आहे.
सामाजिक अंतरः
जे नियम आपण लाॕकडाऊन असताना तंतोतंत पाळलेत,तेच नियम आपल्याला लाॕकडाऊन नंतरही पाळावेच लागणार आहे. शाॕपींग माॕल, किराना दूकान, औषधीचे दूकान, कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बस, भांजीमंडी येथे वावरताना सामाजिक अंतर ठेवावे लागणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर या नियमाचे पालन स्वःतहून करावे लागणार आहे. सामाजिक अंतर ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती कमी असेल.
बाहेरच नाहीतर, बाहेरून आलेल्या व्यक्तिने घरातल्या सदस्यांशी अंतर ठेवावे. लाॕकडाऊन नंतरही गरज असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा घरीच थांबावे. लाॕकडाऊन उठवल्यानंतर लोकांची झुंबड उडालेली असेल.
दोन महीन्यापासुन घरीच बसून असल्याने, मोकळीक मिळाल्यामुळे घराबाहेर पडतील. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढणार आहे. सामाजिक अंतर ठेवल्याने आपण स्वःत व दुसऱ्यांना सुरक्षित ठेऊ शकता.
विलगीकरणः
लाॕकडाऊन उठल्यानंतर आपल्याला स्वताची व इतरांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. कुणाला सर्दी,खोकला,ताप किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल तर आपल्या जवळच्या रूग्णालयात दाखवा.
ही लक्षणे जर आपल्याला आढळून आल्यास स्वताला इतरांपासून दूरच ठेवा. थोडक्यात विलगीकरण करून घ्या. आपल्या टेस्टची पडताळणी पूर्णतः ठिकृ असेल तर मग काही हरकत नाही.
विलगीकरण हा एक चांगला पर्याय आहे जो या संसर्गजन्य आजाराची साखळी तोडायला मदत करते.
कोरोनाला आपल्यावर पुन्हा वर्चस्व मिळवू द्यायचे नसेल तर आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावेच लागेल. कोरोनाशी दोन हात करायचे असल्यास, कोरोनापासून दोन हात दूर राहीलेलेच बरे. दूर राहूनच या कोरोनाशी आपण लढू शकतो.
आपल्या जीवनशैलीत बदल करूनच आपण लाॕकडाऊननंतर बाहेर फिरू शकतो.
आमचा लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. आमचे लेख वाचण्यासाठी आम्हाला फाॕलो करा.