जीवनात समस्यांना घाबरून आत्महत्या हा शेवटचा पर्याय कसा असू शकतो?

जीवन म्हटलं की समस्या, अडचणी तर येणारच. या समस्यांना उत्तर देण्याऐवजी आपण जीवनाचाच अंत करण्यात चांगलं समजतो. शेवटचा पर्याय हा आत्महत्या नसूच शकतो. जीवनात अडचण,समस्या आल्या म्हणून काय त्यासाठी आत्महत्या करायची? मुळीच नाही, अडचण आणि समस्या त्यांनाच मिळतात जे या समस्यांवर मात करत पूढे चालत असतात.

जीवनात समस्यांना घाबरून आत्महत्या हा शेवटचा पर्याय कसा असू शकतो?

 जीवनात समस्यांना घाबरून आत्महत्या हा शेवटचा पर्याय कसा असू शकतो?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माणूस आज आपले जीवन कसे जगायचे हे विसरून गेला आहे असे वाटते. जीवनाचे मूल्य समजून त्याचा आदर करा. जीवन हे अनमोल आहे त्यावर प्रेम करायला शिका. आज आपल्याला असंख्य बातम्या ऐकू येतात आज याने आत्महत्या केली. 
आत्महत्या करतांना नंतर आपल्या परीवाराला कोणत्या परिस्थितीतून जावे लागेल याचा विचार कधी केलायं का? परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी का नाही यावर विचार करत? आज सर्वांनाच अडचण आहे तर मग काय सर्वांनी आत्महत्याच करायला पाहीजे?
आज प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहेत, आलेली अडचण हाताळण्यात विश्वास ठेवा. अडचण आली म्हणून हतबल,निराश होऊ नका. कोणतीही अडचण ही कायमस्वरुपी नसते हे कायम लक्षात असू द्या.  
अडचणीचे समाधान शोधायला सुरूवात करा. प्रत्येक अडचणीला मात देण्यासाठी योग्य वेळ असते. तुमची एक चूक तुमच्या परीवाराचे आयुष्य उद्वस्त करण्यासाठी पुष्कळ आहे. 
आज आपण स्वतापासूनच स्वःताला दूर घेऊन जात आहोत.आज आपल्याला स्वताकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपण पैशामागे एवढा पळतोय की, आपलेच लोक आपल्यापासून दूर कधी गेलेत याचेही भान राहीले नाही. 
परीवाराला वेळ न देणे, मित्र-मंडळीमध्ये न जाणे, नातलगांपासून दूर पळने, एकटे राहने पसंद करने, पैसाच सर्वकाही आहे असा समज करून घेणे. इ. यासर्व गोष्टी घडत असताना माणूस एक मानसिक त्रासातून जात असतो. मनावर वाढणारा दाब हा प्रचंड जास्त असतो. याचा दुष्परिणाम आपल्या स्वभावातून दिसून येतो.
मनावरील वाढता दाबामुळे चिडचिड करने, डिप्रेशनमध्ये जाणे, स्वःतावर आत्मविश्वास नसने, कर्जबाजारी होणे, वाईट संगतीत स्वताला झोकून देणे,सतत नकारात्मक विचार करने, अपमानास्पद वागणूक मिळणे,भिती, लोक काय म्हणतील याची भिती यामुळे आत्महत्यासारखे विचार सुरू होतात. 
आपल्यातील भितीच आपला सर्वात मोठा शत्रू असते हे ध्यानात ठेवा. या भितीला स्वतापासून दूर ठेवा, काढुन फेका तरच या दबावातून आपण बाहेर येऊ शकतो.
रात्र झाली म्हणून काय आपण जगणे सोडतो का? नाही ना, आपण वेळ जाऊ देतो, सकाळ होण्याची वाट बघत असतो कारण प्रत्येक सकाळ एक नवी वाट दाखवते. तसेच काही आपल्या आयुष्याचं आहे, अडचण ही काही वेळेसाठी आपल्याकडे आलेली असते पण चूकीच्या वेळी आलेली असते. 
आपणही घाबरून न जाता ती वेळ जाऊ द्यावी. वेळेपेक्षा बलवान कोणीही नाही,तुम्ही जर ही वेळ जाऊ दिली तर तुमचे आयुष्य पुन्हा सुरळीत होईल.
आत्महत्याला कारणीभूत माणसाचा राग असतो. राग हा काही क्षणासाठी असतो, रागावर आणि त्या वेळेस आपले नियंत्रण असणे आवश्यक असते. वेळ जाऊ देणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे असतो, एकदा वेळ निघून गेली की आपला राग ही शांत होतो आणि असले विचारही आपल्या मनातून निघून जातात. 
आजही काही लोक आपल्या त्या क्षणिक रागावर नियंत्रण ठेऊ न शकल्याने पश्चाताप करताहेत. राग आल्यावर ध्यान करा, शांत बसा, पुस्तक वाचा किंवा भूतकाळात घडलेल्या मजेदार घटना आठवण्याचा प्रयत्न करा. तुमचा राग काही प्रमाणात का होईना कमी होईल.
आत्महत्यासारखे कृत्याची कल्पना मनात आली की लगेच डोळे मिटून आपल्या परीवारातील सदस्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा आणि स्वःतालाच विचारा, मी नसेल तर यांचे काय होणार? आपण आपल्याच माणसांचा विश्वास तोडत आहोत. 
तुमच्या याप्रकारच्या वागण्याने परीवाराला समाजात कायकाय ऐकावे लागेल याचा विचार करा. तुमच्या परीवारातील सदस्यांना तुमच्यावर जो विश्वास आहे त्याला तडा जाऊ देऊ नका. आज तुमच्या परीवाराला तुमची आवश्यकता सर्वात जास्त आहे. आपल्यांना सोडून जाण्यापेक्षा, आपल्यांसोबत जगायला शिका.
शेतकरी असो की विद्यार्थी , नेता असो की अभिनेता, गरीब असो की श्रीमंत सर्वांनाच जीवन हे एकदाच मिळते आणि ते अनमोल असते. विद्यार्थ्यांनी अपयश मिळाले म्हणून जीवन संपवायचे हे पूर्णपणे चूकीचे आहे. पालकांनो आपल्या पाल्यांना दबावात आणू नका. 
आपल्या पाल्याच्या आवडी-नावडीचं थोडं तरी लक्ष असू द्या. आपल्या पाल्याला वेळ द्या. त्यांना काय हवं ते समजून घ्या. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडेल असं नसतं. आपल्या पाल्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करा, वाढवण्यात नाही.
आपला पाल्य डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळच येऊ देऊ नका. वेळेवर पाल्यांना वेळ द्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या. “एकदा उडून गेलेला पक्षी, कधीच वापस येत नाही” हे ध्यानात ठेवा. आत्महत्यासारखे विचार मनात येऊ देऊ नका. आपल्या परीवाराला वेळ द्या. मनातील दडपण बोलून मोकळे व्हा. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी व्यक्त व्हा.
व्यक्त झाल्याने मनावरील दाब आणि ताण हलका होतो. आपल्या जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त झालात तरी चालेल,पण व्यक्त व्हा. मनात कोणतेही विचार साठवून ठेवू नका. मानसिक दबावामुळे आत्महत्यासारखे विचार सतत मनात घर करत असतात, आत्महत्यासाठी प्रवृत्त करत असतात. 
समस्यातर जीवनाचा एक महत्त्वपुर्ण भागच तर आहे. त्याशिवाय आयुष्याचे महत्वही कसे कळणार? समस्याला घाबरून न जाता त्याचा सामना करायला आपण शिकले पाहीजे. 
समस्याला घाबरून आत्महत्यासारखा पर्याय निवडणे चूकीचेच आहे. समस्या सुटत नाही म्हणून हार मानून घेणे कितपत योग्य आहे? उपाय शोधण्यासाठी आत्मचिंतन करा, आपण कुठे कमी पडत आहोत, कुठे चूक होत आहे यावर शांतपणे विचार करा. 
शक्य असल्यास परीवारातील सदस्यांशी या विषयावर बोला, मित्रांशी बोला. समाधान नक्कीच मिळेल, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
ही वेळ आपली नाही किंवा आपल्यासाठी नाही असं समजून ही वेळ जाऊ द्या. वेळ टळल्याने,मोठा अनर्थ टळू शकतो. आयुष्यही पहील्यासारखेच सुखदायी होऊ शकते. आत्महत्याचा विचार मनात येणार नाही. फक्त ती वेळ जाऊ द्या.

1 thought on “जीवनात समस्यांना घाबरून आत्महत्या हा शेवटचा पर्याय कसा असू शकतो?”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?