महाभारत घडण्यामागचे काय कारण होते आणि याला कोण जबाबदार होते

महाभारत घडण्याचे मुख्य कारण हे स्त्री चा अपमान आणि अत्याचार हे तर होतेच.फक्त दूर्योधनाचे अत्याचार आणि मामा शकुनीचे षडयंत्रच महाभारत घडण्याला जबाबदार नव्हते. दूर्योधन, शकुनीमामापेक्षा जास्त जबाबदार तीन महारथी होते. गंगापुत्र भीष्म, आचार्य द्रोण आणि अंगराज कर्ण.
महाभारत घडण्यामागचे काय कारण होते आणि याला कोण जबाबदार होते
महाभारत घडण्यामागचे काय कारण होते आणि याला कोण जबाबदार होते 

लहानांपासुनच कौरव आणि पांडव यांच्यात काहीना काही कूरकूर चालूच असत. दूर्योधनाने स्वताला पांडवांचा भाऊ कधीच मानले नाही. दूर्योधनाच्या मनात पांडवांविषयी कटूता तर होतीच, पण शकुनी मामाने यात अजून विष घालून एकमेकांत वैर निर्माण केले.
शकुनी मामाने वेळ पाहूनआणि परिस्थितीचा फायदा घेत पितामा भीष्म आणि आचार्य द्रोण यांना त्यांच्याच धर्माच्या जाळ्यामध्ये गुंतवून त्यांची शस्त्रे आणि अस्त्रे यावर दूर्योधनाचा ताबा मिळवला.
स्त्रीशक्तीचा अपमान करने, स्त्रीवर अन्याय करने, स्त्रीवर अत्याचार करने केवळ एका अंताकडे घेऊन जात असते. आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी स्त्रीचा छळ करने आपल्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखेच असते. द्युतसभेचं आयोजन हे एक निमित्तमात्र होतं. 
पांचालीने दूर्योधनाचा केलेला अपमानाने, दूर्योधनाच्या मनात प्रतिशोधाची अग्नी पेटून उठली होती. स्वताच्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी दूर्योधन आतूर झालेला होता.
दूर्योधन आणि मामा शकुनी दोघे एक षडयंत्राला जन्म देतात. शकुनी मामाला युद्धापेक्षा युक्तीच्या शक्तीवर जास्त विश्वास असतो. मामा शकुनी छळ-कपट करून षडयंत्र करण्यात तरबेज असतात. 
दूर्योधनाने शकुनीच्या सांगण्यावरून,पांडवांना द्युतसभेत बोलावून त्यांचे सर्वस्व जिंकून, पांचालीचा अपमान करायचा आणि आपला प्रतिशोध पूर्ण करायचे ठरवले. कार्यकारी सम्राट महाराज धृतराष्ट्र यांच्या आज्ञेने सम्राट युधीष्टीरला परिवारासहीत हस्तिनापूरला येण्याचे निमंत्रण पाठवले जाते.
आपल्या काकांनी पाठवलेल्या निमंत्रण स्विकारून सम्राट युधीष्टीर हस्तिनापूरला जायचे ठरवतात. सम्राट युधीष्टीर धर्माचे पालन करणारा असल्याने मोठ्यांनी दिलेला आदेश हा त्यांच्यासाठी धर्मच असतो. 
अंगराज कर्ण आणि महामंत्री विदूर यांनी हे निमंत्रण अस्विकार करण्याचा सल्ला युधीष्टीरला देतात. पण युधीष्टीरसाठी धर्माचे पालन करने महत्वाचे असते.आपल्या भावांसहीत युधीष्टीर हस्तिनापूरला येतात.
द्युतसभेची पूर्ण तयारी झालेली असतांना पांडंव सभेत पोहचतात. सभेमध्ये महाराज धृतराष्ट्र, पितामा भीष्म, अंगराज कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदूर सर्व उपस्थित असतात. मामा शकुनीने यासर्वांसमोर द्युत खेळताना अधर्म होणार नाही असे सांगत या महारथींनी सांगितलेले नियम मानतो.
 शकुनी एक नियम सांगतो कि, कुणीही हा खेळ संपेपर्यंत या सभेचा त्याग करायचा नाही.
अंगराज कर्ण, भीष्म आणि द्रोणाचार्य यांचे शस्त्र आणि अस्त्र केवळ हस्तिनापूरच्या संरक्षणासाठी असते. द्युतक्रिडा सुरू झाल्यानंतर युधीष्टीर काही डाव जिंकत जातो. सर्वकाही मामा शकुनीच्या इच्छेप्रमाणे घडत असते. अलंकार ,सुवर्ण आणि राजपाट यांना युधीष्टीर द्युतक्रिडेत हरतो. मामा शकुनी लालच दाखवून युधीष्टीरला पुन्हा द्युत खेळण्यासाठी भाग पाडतो.
दाव लावण्यासाठी धर्मराज युधीष्टीरकडे काहीच शिल्लक नसते, यावर शकुनी उपाय काढत आपल्या भावांना दाववर लावण्याचा सल्ला देतो. हरलेले राज्य आणि वैभव मिळविण्यासाठी युधीष्टीर आपल्या भावांची स्विकृती घेऊन पुन्हा खेळतो आणि हरतो.
 राज्य तर गेलेच होते आता चार भाऊ दूर्योधनाचे दास झाले होते.शेवटी पांचालीला न विचारताच द्युतमध्ये दाववर लावतो आणि हा डावही युधीष्टीर हरतो. याप्रकारे सर्वचजण दूर्योधनाचे दासत्व स्विकारतात.
पांचाली याचा विरोध करते म्हणून दूर्योधन आपल्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी वस्त्रहरण करण्याची आज्ञा देतो. एवढा अनर्थ आणि अन्याय होत असताना सर्व महारथी शांत बसलेले असतात. 
शक्ती आणि सामर्थ्य असतानाही भीष्म,कर्ण आणि द्रोण शांत आणि लाचार होऊन बसलेले असतात. दूशासन वस्त्रहरण करण्यासाठी पूढे सरसावतो तोच सर्वत्र अंधकार होतो. श्रीकृष्ण पांचालीचे रक्षण करतो. दुखी झालेली पांचाली कुरूंच्या या पवित्र कुलाला शाप देते.
या द्युतसभेत उपस्थित सर्वांना मृत्युदंडचीच शिक्षा मिळणार असा शाप देऊन द्युतसभेतून निघून जाते. कुंती नारायणीसेना घेऊन हस्तिनापूरचा सर्वनाश करण्याचे सांगते. भीष्म,द्रोण आणि कर्ण हे महाराच धृतराष्ट्रला येणाऱ्या संकंटाबद्दल सांगतात. 
महाराज पांडवांना त्यांचे राज्य परत करण्याचा निर्णय घेतात पण दूर्योधनला हे मान्य नसते. शकुनी पुन्हा एक डाव खेळण्याचा प्रस्ताव धृतराष्ट्रसमोर ठेवतो. जो हरेल तो बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास करेल. अज्ञातवासमध्ये सापडल्यास पुन्हा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास.
धृतराष्ट्रला शकुनीवर पूर्ण विश्वास असतो, युधीष्टीरला पुन्हा एक संधी देण्यात येते. एक डाव पुन्हा सुरू होतो,पुन्हा पांडव हरतात आणि बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासला जाण्यासाठी तयार होतात.
जाण्याआधी परत येऊन आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही, आमच्याबरोबर केलेला छळ, पांचालीचा अपमानचा प्रतिशोध  युद्धभुमीत घेतला जाईल असे सांगून निघून जातात.
भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण है बलशाली महारथी असताना अधर्म घडलेला असतो. शक्ती आणि सामर्थ्य असूनही हे महापराक्रमी योध्दे आपल्या वचनामुळे आणि प्रतिज्ञेमुळे हस्तिनापूरच्या सिंहासनाला बांधलेले असतात. जर या महारथींनी यावेळी शस्त्र उचलली असती तर महाभारत घडलेच नसते. 
या तीन महारथींना उत्तर देण्याचे साहस कुणातच नव्हते. स्वःतहून स्वःताला स्वयंघोषीत धर्माच्या बेडीत आयुष्यभर अडकवून ठेवले.
धृतराष्ट्र महाराजने पूत्रप्रेमापायी आपल्याच भावाच्या मुलांवर अन्याय केला. दूर्योधनला जर चांगले-वाईट याबद्दल सांगितले असते तर हे युद्ध झालेच नसते. एकामागून एक संधी मिळूनही महाराज धृतराष्ट्र यांनी संधीचे सोने केले नाही. 
दूर्योधनाच्या हट्ट पूरवण्यासाठी लाखो सैनिकांच्या जीव धोक्यात घालायला तयार होते. भगवान श्रीकृष्णाबद्दल ऐकूनसुध्दा आपल्या महारथींवर जास्त विश्वास होता.
पांडव वनवास आणि अज्ञातवास पूर्ण करून आल्यावर नियमानुसार त्यांचे राज्य त्यांना परत द्यायला हवे होते परंतु दूर्योधनाने राज्य परत न देता युध्द करण्यास प्राधान्य दिले. पांडवाकडून श्रीकृष्ण महाराज धृतराष्ट्रकडे पाच गावाची मागणी करतात. 
सर्वजण हा योग्य प्रस्ताव आहे म्हणून महाराज धृतराष्ट्र यांना सांगतात. दूर्योधनला हा प्रस्ताव अमान्य असतो कारण त्याला हवे असते महारणसंग्राम, एक महाभारत.

आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

गंगापुत्र भीष्म
अंगराज कर्ण

Leave a Comment

फिफा वर्ल्ड कप कतार 2022 चे वेळापत्रक ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला. Suryakumar Yadav mr360 Biography केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण
Suryakumar Yadav mr360 Biography Top 10 Indian CEO’s in the world केरॉन पोलार्डने निवृत्ती जाहीर केली….पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने धक्कादायक विश्वविक्रम केला.