कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका.

कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका. कोरोनामुळे मृत्युचा दर जरी कमी असला तरीसुद्धा आपले खुप नुकसान होऊ शकते. आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वासामध्ये फरक आहे हे ध्यानात ठेवायला पाहीजे. 
आपण ज्या आत्मविश्वासाने आज समाजात वावरत आहे त्यानंतर आपल्याला फक्त पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते हे ध्यानात ठेवले पाहीजे. तुम्ही मानत असलेल्या आत्मविश्वास कधी तुम्हाला बेजबाबदार व्यक्ती बनवेल हे कळणारसुध्दा नाही.
कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका.
कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका.
जबाबदार नागरिक बनून या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न आपण करायला पाहीजे. कोरोनाचे गांभीर्य अजुनही आपल्या नागरिकांना ओळखता आले नाही. साधारण ताप,खोकला आणि सर्दी आणि कोरोनाने संक्रमित झाल्यावर येणारा थकवा यामध्ये बरेच अंतर आहे. 
लोक आज सर्रास वावरत असुन सोशल डिस्टसिंगचे पालन करत नसताना दिसुन येते. होमक्वारंटाइन केल्यानंतरही लोक बिनधास्तपणे फिरत आहेत. आपण कोरोना या संसर्गजन्य आजाराकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? असा प्रश्न सतत मला सतावत असतो.
फेसमास्क, कॕप, हँडग्लोज वापरून आणि कोणतेही काढे पिऊन आपण कोरोनावर मात करू शकत नाही. कोरोनाला आवर घालण्यासाठी एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे सोशल डिस्टसिंग आणि होमक्वारंटाइन. 
बोलताना मास्क तर वापराच परंतु किमान दोन मीटर एवढे सुरक्षित अंतर ठेवा. कोणत्याही वस्तूला स्पर्श करने टाळा. कोरोनाबद्दल मनात भिती तर खूप आहे पण लोकांना दाखवण्यासाठी उगाचच कोरोनाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करु नका. 
गरम पाण्याने वाफ घेणे चांगलेच पण विनाकारण समाजात वावरणे हे धोकादायकच आहे.
कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका.
कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपल्यातील बरेच बंधु आणि भगिनी, ज्यांनी कोरोनाचा अनुभव सांगितला आहे. स्वतावर जे बेतले आहे,तेच आपल्यासमोर मांडणार आहेत. कोरोना म्हणजे एकटेपण, वाळीत टाकल्याची जाणीव, असह्य वेदना आणि परीवारापासून दूर. 
नशिब चांगले असेल तर वापस येऊ, पण नशिबाने साथ जर सोडली तर पार्थिव शरीरही मिळणे अवघड. हे तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नसुन या मागची गोष्टच तेवढी विचित्र आहे.
सुरुवात कुठुन होते हेच सांगता येत नाही. साधारण ताप,सर्दी आणि खोकला असेल तर आपणच दोन टॕबलेट घेऊन अंगावर काढतो. त्या टॕबलेटमुळे क्षणिक आराम मिळतोच पण आपण खरी चुक हीच करतो. साधारण ताप आहे, आपल्याला कोरोना तर होऊच शकत नाही. 
आपण काढा घेतो, वाफ घेतो, मास्क लावतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन स्वताची समजुत घालून वेळेला टाळत असतो. असं करताकरता तीन-चार दिवस निघुन जातात. ताप,सर्दी आणि खोकला मात्र वाढतच असतो.
यादरम्यान आपण किती सोशल डिस्टसिंगचा वापर केला भगवंतालाच माहीत. होमक्वारंटाइनचा तर प्रश्नच नसतो, आपण आॕफीस,घर, मित्र-मंडळीमध्ये तसच सर्वत्र फिरत असतो. एकवेळ अशी येते की, आपल्याला श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. कोरोनाची तपासणी केल्यानंतर कळते की, आपण तर कोरोनाने संक्रमित झालेलो आहोत.
कोरोना पाॕजीटीव आहे कळल्यानंतर सुरू होते अस्सल कहानी. रुग्णालयात भरती होण्याअगोदर किमान दोन तास जबरदस्त प्रश्न आपल्या मनात सुरू असतात ज्याची उत्तरे आपल्याकडे नसतात. आपल्या पाठोपाठ आपल्या परीवारातील सदस्यांनासुध्दा तपासणी करावीच लागते. 
आपण अगोदरच रुग्णालयात दाखल झाल्याने आपण आपल्या परीवारातील सदस्यांना भेटूही शकत नाही. अशावेळी आपण तर रुग्णालयात असतो पण आपले मन आपल्या परीवारातील सदस्यांकडे असते. काय झाल असेल? कोणकोण कोरोना पाॕजीटीव असेल? नाही ते विचार डोक्यात सुरू असतात.
रणांगणात ज्या पध्दतीने अनेक धारदार बाण शरीरात रुतत असतात, त्याचप्रकारे अनेक प्रश्न हृदयाला आणि मनाला भेदत असतात. पीपीई किट घालुन डाॕक्टर आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी आपला उपचार करत असतात. 
आपल्याला फक्त त्यांचा आवाज ऐकू येतो आणि डोळे दिसतात. इंजेक्शन,आयव्ही आणि खुप सारी टॕबलेटस काही दिवस यांचाच आधार घेऊन पुढे चालावे लागते. श्वास घ्यायला त्रास नसेल तर तेवढे बरे,नाहीतर वेंटिलेटरशिवाय दुसरा पर्याय नाही. 
रुग्णालयाचा दररोजचा खर्च, या सर्वांचा विचार करत अजुन मानसिक ताण वाढत जातो. वेळोवेळी आॕक्सिजन बरोबर आहे की नाही ते तपासले जाते.
कमीतकमी नऊ-दहा दिवस रुग्णालयात काढावेच लागतात. यादरम्यान तुम्हाला कुणालाही भेटता येत नाही किंवा प्रत्यक्ष दुसऱ्यांशी बोलताही येत नाही. शेवटी काय,तर एकटेपणा, होय एकटेपणा. तुमच्याशी बोलायला कुणीही नाही, तुमचे म्हणने ऐकायला कुणीही नाही. 
कोरोना झाल्यानंतर एकटेपणाची शिक्षाच भोगावी लागते. वेळ कसा घालवणार, झोप आणि मोबाईलचा वापर किती वेळेपर्यंत करणार? रुग्णालयातुन घरी परत आल्यानंतर तब्बल १४ दिवसापर्यंत होमक्वारंटाइन बनुन रहावे लागते. १४ दिवसापर्यंत एकाच खोलीत पडुन रहावे लागते. 
आपली दैनंदिन जिवनशैलीमध्ये आपल्याला खूप बदल करून घ्यावे लागतात. 
तोंडाची चव जाणे, जास्तीच्या टॕबलेटमुळे तोंड कडु पडू लागते. खाण्याची इच्छा नसतानाही जबरदस्तीने जेवण करावेच लागते. जर जेवण केले नाही तर अशक्तपणा वाढत जातो आणि तुम्हाला त्याचा त्रासही जाणवतो. 
कोरोनाची लागण झाल्याने कमालीचा अशक्तपणा जाणवतो. रुग्णालयातुन घरी आल्यानंतरसुध्दा अशक्तपणा वाढत जातो. आहार जास्तीतजास्त घ्यावा लागतो. घरात खोलीत असतानासुद्धा आपल्याला काही नियम पाळावेच लागतात.
कोरोनामुळे मृत्युचे प्रमाण जरी कमी असले,तरी यामुळे होणारे नुकसानही तेवढेच जास्त आहे. कोरोनाला साधारण फ्लू समजण्याची चूक करू नका. सावध रहा, सतर्क रहा आणि कोरोनापासून दूरच रहा.

2 thoughts on “कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका.”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?