Celebrities, Businessman ज्यांना कार अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले

कार अपघातामुळे जगातील कित्येक Celebrities, Businessman प्रसिद्ध कलाकारांना,उद्योजकांना, राजकीय नेत्यांना आणि सर्व सामान्यांना आपलें प्राण गमवावे लागले आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. 

आपली एक मानसिकता झालेली आहे की, आपण सर्व सामान्य व्यक्ती जर अपघातामध्ये मरण पावली तर आपल्या लक्षात राहत नाही. याउलट एखादी प्रसिद्ध व्यक्ती जर अपघातमध्ये मरण पावली तर आपली उत्सुकता शिगेला जाते. आपण त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो.

चला तर जाणुन घेऊया त्या जगभरातील प्रसिद्ध व्यक्तीबद्दल ज्यांना आपला प्राण कार अपघातमध्ये गमवावा लागला. 

सायरस मिस्त्री Cyrus Mistry death: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक:

आपणांस माहीतच आहे की, नुकतेच ४ सप्टेंबरला टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचे कार अपघातामुळे निधन झाले. सायरस मिस्त्री हे फक्त भारतासाठीच नाही तर जगभर त्यांनी आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने एक छाप सोडली होती.
सायरस मिस्त्री Cyrus mistry death एक कोट्याधीश व्यक्ती असूनसुद्धा आपला प्राण वाचवु नाही शकले. कारण काहीही असो शेवटी नुकसान स्वतः मिस्त्री परिवाराचे झाले.
उद्योग विश्वालाही खूप मोठी हानी झाली आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. सायरस मिस्त्रींचे उद्योग विश्वाला आधार देण्यासाठी एक मोठे योगदान आहे.

प्रिन्सेस डायना Princes Diena death, वेल्सची राजकुमारी आणि चार्ल्स प्रिन्सच्या पहिल्या पत्नी तसेच रॉयल ब्रिटिश घराण्यातील सदस्य:

Celebrities, Businessman
Celebrities, Businessman death
प्रिन्सेस डायना : इमेज क्रेडिट: विकिपीडिया
प्रिन्सेस डायना Princes Diena death एका कार अपघातात मरण पावल्या त्यावेळी त्यांचे वय अवघे ३६ वर्षे होते. त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. राजघराण्यातील सदस्य असूनही समाजकार्यासाठी आपले योगदान त्या देत राहिल्या.
एके दिवशी प्रवास करत असताना त्यांच्या कारला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. ऑगस्ट महिन्यातील ही घटना ब्रिटिश घराण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना एक हादरा देऊन गेली.

पॉल वाकर Paul Walker , अमेरिकन अभिनेता :

Celebrities, Businessman
Celebrities, Businessman death
पॉल वाकर, अमेरिकन अभिनेता, इमेज क्रेडिट: विकिपीडिया 
पॉल वाकरने एक बालकलाकारापासून आपल्या चित्रपटसृष्टी कारकीर्दीची सुरुवात केली. प्रसिद्ध चित्रपट “फास्ट अँड फ्युरियस” या चित्रपटातून आपली एक वेगळी छाप सोडली होती.
पॉलने टिन कॉमेडीतुन प्रेक्षकांची खुप प्रशंसा मिळवली होती. नोव्हेंबर महिन्यात एका कार अपघातात पॉलचे निधन झाले. त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीला एक मोठे नुकसान झाले. पॉलचे वय अवघे ४० वर्षे एवढे होते.
पॉलच्या  निधनवार्ताने Paul Walker death त्याच्या फॅन्सला खूप मोठा धक्काच बसला होता त्यांना विश्वास होत नव्हता की त्यांचा आवडता अभिनेता आज त्यांच्यात नाही.

नंदमुरी हरिकृष्णा, राजकीय नेता आणि अभिनेता: 

Celebrities, Businessman
Celebrities, Businessman death
नंदमुरी हरिकृष्णा, राजकीय नेता आणि अभिनेता, इमेज क्रेडिट: विकिपीडिया 
नंदमुरी हरिकृष्णा एक अभिनेता तसेच एक राजकीय नेते होते. ते आंध्रप्रदेशचे नेतृत्व करत होते. २००८ -२०१३ या साली त्यांनी राज्यसभेवर सदस्य म्हणुन कामकाज पहिले होते.
एक तेलगू अभिनेता म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. एक बालकलाकारापासून ते चित्रपट निर्माता म्हणून  हरिकृष्णा यांची एक चांगलीच ओळख बनलेली होती.
वयाच्या ६१व्या वर्षी एका कार अपघातात त्यांचे निधन झाले आणि संपुर्ण चित्रपटसृष्टीमध्ये आणि राजकीय क्षेत्रात मोठा धक्काच बसला. एक मोठे नेतृत्व आपल्यातून निघून गेले.

एनी हेश : अमेरिकन अभिनेत्री :

https://khadedipak.com
एनी हेश, इमेज क्रेडिट: विकिपीडिया 
एनी हेश ही एक प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री होती. एनी हेश हिने गाजवलेल्या भूमिकेतुन तिला बरिच प्रसिद्धी मिळाली होती. एनीने बऱ्याचदा चित्रपटासाठी पटकथाही लिहिल्या होत्या. याबरोबर तिला दिग्दर्शनाचीही आवड होती.
वयाच्या ५३व्या वर्षी एका कार अपघातामध्ये एनीचे दुर्दैवी निधन झाले. तिच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना एक धक्काच बसला होता. ऑगस्ट-२०२२ ला हा कार अपघात झाला होता.

जसपाल भट्टी : हास्यकलाकार, अभिनेता,आणि दिग्दर्शक :

भारतातील एक असा अभिनेता ज्याने विनोदी कलाकृती सादर करून आपल्या चाहत्यांचा हृदयावर राज्य केले. जसपाल भट्टी यांनी आपली एक आगळीवेगळी छाप निर्माण केली होती. त्यांनी बऱ्याच चित्रपटामध्ये काम केले होते.
https://khadedipak.com
जसपाल भट्टी , इमेज क्रेडिट: विकिपीडिया 

 

जसपाल भट्टी यांना मरणोत्तर २०१३ साली भारत सरकारने पदमभूषण या पुरस्काराने सम्मानित केले. २०१२ साली जसपाल भट्टी यांचे वयाच्या ५७व्या वर्षी एका कार अपघातामध्ये निधन झाले.
आपल्या विनोदाने हसवणारा अभिनेता त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू सोडून कायमचा निघून गेला होता.

सोनिका चौहान : टीव्ही होस्ट, टीव्ही अभिनेत्री, मॉडेल :  

https://khadedipak.com
सोनिका चौहान, इमेज क्रेडिट: विकिपीडिया 

 

सोनिका चौहान ही एक टीव्ही होस्ट,अभिनेत्री तसेच मॉडेल होती. सोनिकाने खूप कमी वयात या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी काळाने तिच्यावर एका कार अपघातामध्ये झडप घातली.
कार अपघातामुळे जगातील कित्येक Celebrities, Businessman, राजकीय नेत्यांना आणि सर्व सामान्यांना आपलें प्राण गमवावे लागले आहे. Princes Diena death, Paul वाल्केर death  हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.

Leave a Comment

Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. एका वर्षात पाच किंवा अधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांची नावे. कन्या दिवस 2023 साजरा करा आपल्या लाडक्या लेकी सोबत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडिया आणि खेळाडूंची आयसीसी क्रमवारी.
Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Suryakumar Yadav mr360 Biography Top 10 Indian CEO’s in the world इस्रोने चंद्रावर विक्रम, प्रज्ञान पुन्हा सक्रिय करण्याची योजना पुढे ढकलली.