सुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती


https://www.khadedipak.com
Subconscious mind power


आपल्याला काय करायचे, काय नाही करायचे, कुठे जायचे, काय खायचे, यासर्व हालचालीवर आपल्या मनाचे नियंत्रण असते. आपल्या सर्व शरीरावर , घडलेल्या आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर आपल्या मनाचे नियंत्रण असते. जसे रुपयाच्या दोन बाजु असतात, जसे परिणामाच्या दोन बाजु असतात, अगदी आपल्या मनाचेही दोन विभागलेले असतात. जागृत मन(काॕन्शियस) आणि सुप्त मन (सबकाॕन्शियस).


https://www.khadedipak.com
MIND POWER


आपले जागृत मन हे फक्त १०% कार्यरत असते तर ९०% भाग हे आपल्या सुप्त मनाच्या ताब्यात असते. जागृत मन हे आपल्या सुप्त मनावर नियंत्रण ठेवते. जर आपल्या १०% शक्ती असलेल्या जागृत मनाच्या साहाय्याने आपण एवढी प्रगती करू शकतो तर विचार करा सुप्त मनाची ९०% शक्ती जर आपल्या जागृत मनाला येऊन एकत्र झाली तर काय होईल?. आपले जागृत मन आपल्या सुप्त मनाला आदेश देत असतो. जो आदेश आपले जागृक मन आपल्या सुप्त मनाला देईल,त्याप्रमाणे सुप्त मन आपले काम करण्यास सुरूवात करते. ते काम चांगले आहे की वाईट याचा विचार ते करत नाही,त्याला फक्त एवढेच माहित असते की आपल्या मालकाने (जागृत मन) आपल्याला हे काम करण्याचे आदेश दिलेले अहेत आणि ते आपल्याला पुर्ण करायचे आहे. आपल्या सुप्त मनाला चांगले-वाईट, खरे-खोटे, मंद-विद्वान, गरीब-श्रीमंत, बलवान-कमकुवत, पाप-पुण्य, सुंदर-कुरूप, याबद्दल माहिती नसते. ते फक्त आपण वारंवार  सांगितलेल्या गोष्टींची पुर्तता करण्यासाठी धडपडत असते.

https://www.khadedipak.com
BRAIN POWER


आपल्या मनावर सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो.आपण ज्या पद्धतीने आपले विचार आपल्या मनाशी बाळगतो त्याचप्रकारचे ठसे आपल्या सुप्त मनावर पडत असतात. सकारात्मक आणि नकारात्मक याबद्दलचेही ज्ञान सुप्त मनाला नसते. तुम्ही कधी केळीच्या झाडाला फणस आलेला पाहिले आहे का?, तुम्ही कधी कडुलिंबाला डाळिंब लागलेले पाहिले का? नाहीना, अगदी तसेच तुमच्या मनाबद्दलही घडत असते, तुम्ही जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, सकारात्मक किंवा नकारात्मक विचार आपल्या मनात रुजवतात त्याचप्रमाणे तुमच्या पदरात यश, अपयश,परीणाम येत असते. 


https://www.khadedipak.com
BELIEVE IN YOU


 निर्णय घेणे, चुकीचे किंवा बरोबर ठरविणे, काय करायचे,काय नाही करायचे, कुणाशी बोलायचे,कामावर जायचे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे, शाळेत जायचे,अभ्यास करणे, फोनवर बोलने इत्यादी सर्वांवर आपल्या जागृत मनाचे नियंत्रण असते. आपले जागृत मन हे एक नियंत्रक म्हणून आपले काम करत असते. 

https://www.khadedipak.com
SECRETS OF MIND
आठवणी साठवुन ठेवणे, आवडी-नावडी लक्षात ठेवणे, प्रत्येक घटनेची नोंद ठेवणे, बॕकग्राउंडमध्ये राहून जागृत मनाच्या आदेशाची पूर्तता करणे व त्यासाठी विश्वाच्या प्रत्येक अटी लक्षात घेऊन काम करणे इत्यादी सुप्त मनाचे काम असते. आपले सुप्त मन हे एका डेटाबेस सारखे काम करत असते. जागृत मनाला एखादी गोष्ट हवी असल्यास,सुप्त मन आपल्या डेटाबेसमध्ये शोधून जागृत मनाला सादर करतो. आपल्यातच विश्वातील सर्वोत्तम शक्ती राहत असते पण आपल्याला त्याबद्दल माहितीच नसते किंवा बहुतांशवेळी आपण त्याकडे लक्षच घालत नाही. आणि माहितती असल्यावरही त्याचा वापर कसा करायचा हेच आपल्याला माहित नसते. एखादा व्यक्ती खुप दुःखी, गरीब,आणि हताश असतो तर दुसरा व्यक्ती जिवनाच्या प्रत्येक वाटेवर खुश, श्रीमंत आणि समृद्ध असतो असे का? आपल्याला कधी असा प्रश्न पडला असेल नाही का? आपल्या नकारात्मक विचारामुळेच आपण आपले भाग्य लिहीत असतो. आपण कुठलेही काम सुरू करण्याच्याअगोदर नकारात्मक विचार सुरू करतो त्यामुळे आपले सुप्त मन ह्या सर्व विचार आपल्यात नोंद करून ठेवते व आपल्याला पावलोपावली आठवण करून देत असते की नाही हे काम आपण करू नाही शकणार. आपण जे विचार रूजवतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याचे परिणामही मिळतात.


https://www.khadedipak.com
FEEL HAPPY


जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या सुप्त मनाच्या शक्तीचा पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे. त्यांनी यामागचे रहस्य जाणले आहे, व त्यापद्धतीने ते काम ही करत आहे.जसे तुम्ही विचार करतात, तेच तुम्हाला मिळते. समान विचार एकमेकांना आकर्षित करत असतात, एखाद्या वस्तूचे आकर्षण असणे  एक महत्त्वपुर्ण साधन आहे. ठराविक लोकंच हे रहस्य वापरून यशस्वी झालेले आहेत आणि त्यांनी वारंवार हे सांगितलेही आहे. या रहस्याचे वापराच्या काही विशिष्ट पद्धत आहे ,चला तर मग बघूयात.


https://www.khadedipak.com
POWERS OF SUBCONSCIOUS MIND


आपल्याला जे काही हवं आहे ते अगदी प्रामाणिकपणे मागा.जगामध्ये तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे.सुप्त मनाकडे मागताना मनात कुठल्याही प्रकारची अस्पष्टता,शंका ठेऊ नका, त्याने तुम्हाला काय हवे आहे ते सुप्त मनाला कळत नाही.तुम्ही मागितलेली वस्तू जर तुम्ही स्पष्टपणे मागितली असेल तर तुमचे सुप्त मन ब्रह्मांडमध्ये लहरी पोहचवते व तुम्हाला हवी असलेली वस्तू तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी काम करत असते.तुम्हाला हवी असलेल्या वस्तूंसाठी आवश्यक ते सर्व घटक तुमच्यापर्यंत पोहचवते. यासाठी कुठल्याही डिग्रीची,शिक्षणाची वा अनुभवाची गरज नसते.गरज असते ती फक्त तुमच्या प्रामाणिक असण्याची.तुम्हाला हवी असलेली प्रत्येक वस्तू या ब्रह्मांडमध्ये उपलब्ध आहे.आवश्यकता आहे ती फक्त मोठी कल्पनाशक्तीची, कल्पनाशक्तीशिवाय तुमच्या मागणीलाही काहीच अर्थ नाही.


सुप्त मनावर विश्वास :

 आपण केलेल्या मागणीवर आपला पुर्ण विश्वास असायला हवा,या विश्वासामुळेच नकारात्मक विचारांचा नाश होतो व तुमच्यात आणि तुमच्या स्वप्नांत अडथळा येत नाही. विश्वास करा की जे तुम्ही मागितले आहे ते तुम्हाला मिळालेले आहे. मागितलेलं स्वप्न अनुभवायला शिका,तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशी कल्पना करा आणि त्याचा अनुभव घ्या, स्वताला त्या स्वप्नात बघा. 

https://www.khadedipak.com
POWERS OF SUBCONSCIOUS MIND


अनुभव करायला लागा:

आपण मागितलेलं स्वप्नपूर्ती झाल्यानंतर जो आनंद मिळतो,त्याप्रमाणे त्याचा अनुभव घ्या. ज्या वेळेस तुम्ही असा अनुभव करतात त्यावेळी तुमच्या सुप्त मनाला विश्वास बसतो की तुम्ही जे काही मागत आहात त्याबद्दल तुमच्या मनात अस्पष्टता किंवा शंका नाही. सुप्त मन तुमचे स्वप्नपूर्तीसाठी ब्रह्मांडमध्ये लहरी पसरवते, त्याला योग्य असणाऱ्या लहरी परत तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी धडपडत असते.

भरपूर लोक याचा वापर करतात पण त्यांच्या विचारात अस्पष्टता असते, जे आपल्या सुप्त मनाला कळत नाही. आपण आपल्या सुप्तमनामधील नकारात्मक विचार काढुन त्यात नविन सकारात्मक विचारांचे बीज रूजवले पाहिजे.आपल्या सुप्तमनाकडे मागताना स्पष्टता असली पाहिजे.आपण एका उदाहरणातून हे सर्व बघूयात.

सर्वप्रथम,मी जे काय सांगतो आहे ते करा, समजा तुम्हाला एक ४ चाकी कार घ्यायची आहे अशी मागणी आपल्या सुप्त मनाकडे करा,आता असं अनुभव करा की तुम्हाला ती चार चाकी कार मिळालेली आहे.तुमचा एक हात स्टेअरींगवर आहे अन दुसरा गिअरवर,तुम्ही आता एक लॉंगड्राईवसाठी निघाले आहात. तुम्ही लाँगड्राईवचा मनसोक्त आनंद घेत आहात.मला माझी कार मिळालेली आहे आणि मी खुश आहे असं आपल्या मनाला सांगा.दररोज आपल्या चारचाकी कारबद्दल आपल्या सुप्त मनाला सांगा.काही दिवसानंतर शोरूमला भेट द्या आणि त्या चारचाकी कारची टेस्ट ड्राईव घ्या. 

तुमचे सुप्त मनांस निश्चित होईल की तुम्ही मागितलेली वस्तूंसाठी तुम्ही शाश्वत आहात मग सुप्त मन तुमच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असेल.काही दिवसांत स्वप्न प्रत्यक्षात खरे होईल.

If you like our article on Powers of Subconscious mind , please like , comment and share to your friends and family, also share on social network. Also subscribe to our blog to get notification of new article.

आणखी वाचा..


3 thoughts on “सुप्त मन (Powers of Subconscious Mind) आणि अविश्वसनीय शक्ती”

Leave a Comment

Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. एका वर्षात पाच किंवा अधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांची नावे. कन्या दिवस 2023 साजरा करा आपल्या लाडक्या लेकी सोबत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडिया आणि खेळाडूंची आयसीसी क्रमवारी.
Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Suryakumar Yadav mr360 Biography Top 10 Indian CEO’s in the world इस्रोने चंद्रावर विक्रम, प्रज्ञान पुन्हा सक्रिय करण्याची योजना पुढे ढकलली.