२६ जानेवारी ,आपला प्रजासत्ताक दिन(Republic Day), प्रत्येकवर्षी उत्साहाने आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो नाही का? जानेवारी महिना सुरू होताच आपल्याला सर्वात अगोदर आठवतो “प्रजासत्ताक दिन, Republic Day,गणतंत्र दिवस”. तुमच्या मनात असा प्रश्न आला नसेल का, आपण २६ जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन साजरा करतो? काहींना याचे उत्तर नक्कीच माहीत असणार आणि काहींना नाही. आपल्या देशाचे संविधान,संविधान समितीने २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी, १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले ,म्हणूनच २६ जानेवारीलाच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. संपुर्ण भारतामध्ये या दिवशी भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.
REPUBLIC DAY |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी,सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा वापर करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वांना आवाहनही करतात. राजधानीमध्ये विविध कार्यक्रमाद्वारे भारतीय सेनातील प्रत्येक विभाग आपले आपले कौशल्य अति शिस्तबद्धतीने पार पाडतात.
प्रजासत्ताक दिन
|
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन,(Republic Day Celebration) आणि बालपणीच्या जुन्या आठवणी:
जानेवारी महिना सुरू होताच ,या महिन्यातील २६ तारीक आपल्याला आठवते.होय आठवण होते ती आपल्या प्रजासत्ताक दिनाची. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी धावपळ सुरू होते. शाळेत असतांना प्रजासत्ताक दिन जव आला की, आमची तर मजाच मजा व्हायची. नविन गणवेश, नविन शूज,मोजे या सर्वांची खरेदी व्हायची. आई-बाबाकडे नविन गणवेश,शूजसाठी आग्रह करायचो, बाबा चिडलेले असतील तर पटकन नाही म्हणून सांगायचे, मग आईला बाबांना सांगायला सांगायचे. एकदा का बाबांनी हो म्हटले की कधी दुकानात जाऊन खरेदी करतो असे होत असे.
गणतंत्र दिवस |
नविन घेतलेला गणवेश खराब होऊ नये म्हणून प्रजासत्ताक दिनापर्यंत जुना गणवेशच वापरावा लागत असे.शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त कवायतीचे आयोजन केलेले असायचे. राष्ट्रध्वजाचे आरोहण करण्यासाठी प्रमुख पाहुणे व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना विशेष निमंत्रण असत. कवायतीचे दररोज एक-दोन तास पूर्वतयारी केली जाई. ढोल आणि शिट्टीच्या आदेशानुसार कवायत सुरू होत होती, बरयाचदा स्टेप मागेपुढे होत असे. आपण चुकततर नाही ना म्हणून आजुबाजूला मित्रांकडे नजर फिरवायची आणि आपण चुकत नसल्याची खात्री करून घेत असे.
प्रमुख पाहुण्यांसमोर कवायत करणे हे एक आव्हानच होते कारण आपले काही चुकले तर आपल्याला कमी लेखतील का ? आपले हसू होईल का?असा सवाल आणि गोंधळ नेहमी मैदानात प्रॕक्टीस करताना मनामध्ये सुरू असायचा. कशीबशी हिम्मत करून कुणाकडेच लक्ष न देता आपल्या स्वतावर विश्वास ठेवून कवायत यशस्वीपणे पार पडत असे. एक दिवसाची सुट्टी असल्याने दोन -तिन तास कार्यक्रम चालणार हे माहीत होते आणि त्यानंतर सुट्टी. टिव्हीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम सुरू असत. भारतीय सेनेचे जवान आपले कौशल्य दाखवित असे, ते आम्ही खुप कुतुहलाने बघायचो मग एखादा देशभक्तीपर सिनेमा असायचा तो बघण्यासाठी सर्व कामे लवकर आटोपून सिनेमा सुरू होण्याच्या अगोदर आम्ही सर्व टिव्हीसमोर येऊन बसायचो. खुप धमाल केल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आपली नियमित शाळा असायची म्हणून रात्री लवकर झोपही यायची.

आणखी वाचा :
Nice