नियम आकर्षणाचा – Law of attraction

आकर्षणाचा नियम खरच काम करतो का?  आकर्षणाचा नियम म्हणजे काय?,तो कसा वापरायचा असतो?,आकर्षणाचा नियम आमलात आणल्यास त्याचा फायदा होईल का?. असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो बरोबर आहे ना? हो बरोबरच आहे, आपला यावर विश्वास बसत नाही पण मित्रांनो हे खरं आहे. आकर्षणाचा नियम काम करतो अगदी १००%.  मला एका प्रश्नाचे उत्तर विचारपुर्वक आणि प्रामाणिकपणे द्या. तुमच्यासोबत असे कधी झाले आहे का की,एखादी घटना तुमच्याबरोबर वर्तमानात घटत आहे. परंतु तुम्हाला असे वाटू लागते की ती घटना जशीच्या तशी तुमच्याबरोबर भूतकाळात घडलेली होती. सर्व घटना तुम्ही कुठेतरी बघितल्याचा अनुभव कधी तुम्हाला आला का? विचार करा, आठवून बघा. नक्कीच, असं तुम्हालाही अनुभवायला मिळाले असेल. असल्यास आम्हाला आमच्या ईमेलवर  khadedipak@gmail.com जरूर लिहा.
https://www.khadedipak.com
LAW OF ATTRACTION

तुम्ही तुमच्या मनातच एखादा विचार सुरू करता, मग तो वस्तू ,पैसा,घर, नौकरी कशाबद्ददलही असू शकतो.  समजा तुम्ही नौकरीबद्दल विचार करत आहात. तुम्हाला हवी असलेली नौकरी तुम्ही तुमच्या कल्पनेत आणता. नौकरी कशी असेल?, पगार किती असेल? यासर्व गोष्टींचा विचार तुम्ही सतत करत असता. विचार करत असताना तुम्हाला असे वाटायला लागते की ती नोकरी मला मिळणारच आहे. विचार करताकरता तुम्हाला ती नौकरी मिळाल्याचा अनुभवही तुम्ही करू लागता. विचारात असताना मिळालेल्या नौकरीमुळे तुम्हाला किती आनंद होतो तेही तुम्ही अनुभवता. कल्पना करा की, तुम्ही दररोज सकाळी उठुन आपल्या कार्यालयात जाण्यासाठी तयारी करत आहात. एका हातामध्ये लंच बाॕक्स तर दुसऱ्या हातामध्ये आपली बॕग घेऊन आपल्या कार्यालयासाठी जायला तयार आहात. तुम्ही दररोज आपली कल्पना आपल्या सुप्त मनावर रुतवत असता.हे सर्व करत असताना वैश्विक शक्तींचे आभार जरूर माना. एखाद्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करने ही एक उत्तम सवय स्वताला लावुन घ्या. तुमचे सुप्त मन तुमचे विचार ब्रह्मांडमध्ये प्रस्थापित करण्यास सुरूवात करत असते. एकसमान विचार एकमेकांकडे आकर्षित होत असतात. ज्याप्रकारे एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे आकर्षित होतात तसेच समान विचारही एकमेकांकडे आकर्षित होतात.
https://www.khadedipak.com
DEMAND TO UNIVERSE
  या विचारातुनच तुम्हाला तुमचे विचार सत्यात अवतरताना दिसते. ज्यावेळेस तुम्हाला खरच नोकरी त्यावेळी तुम्हाला हे सर्व तुमच्याबरोबर घडलेले आहे असे जानवेल. तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा अनुभव कल्पना करताना घेतलेला असतो. काय, खरं सांगतो आहे ना मी?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://www.khadedipak.com
BELIEVE IN YOURSELF

गुरुत्वाकर्षणाचा नियम अचुकपणे काम करत असतो, हा नियम  जात-पात,गरीब-श्रीमंत, मणुष्य किंवा प्राणी या सर्वांसाठी एकसारखाच असतो. अगदी त्याचप्रमाणे आकर्षणाचा नियमसुद्धा काम करत असतो. या ब्रह्मांडमध्ये तुमच्यासाठी द्यायला भरपूर आहे.या ब्रह्मांडमध्ये खुप मोठा खजिना लपलेला आहे तो कधीच न संपणारा आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या मागण्याची. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मागा. तुमचे मागणं एवढे स्पष्ट असले पाहीजे की ते तुमच्या सुप्त मनाला कळलं पाहीजे. आपण मागितलेली गोष्टींवर विश्वास ठेवायला शिका. एखादा विचार तुम्ही तुमच्या सुप्तमनाकडे सुपुर्द करत असता त्यावेळेस तुमचा त्यावर तेवढाच विश्वास असायला हवा. जर तुमच्या मागण्यात विश्वासच नसेल तर तुमच्या सुप्त मनाला तुम्हाला काय हवं आहे हे स्पष्टच होणार नाही.
आपण आपले विचार आपल्या सुप्त मनाला नेहमीच देत असतो. आपल्या सुप्त मनाला चांगले-वाईट विचार कळत नसतात, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. आपल्या मनाला सकारात्मक विचारांचे खतपाणी घाला. आपण जे मागत असतो तेच आपल्याला मिळत असते. जर तुम्ही तुम्हाला कार्यालयाला जाण्यासाठी उशीर व्हायला नाही पाहीजे असे म्हणत असता. नेमके त्याच्या विपरीत होत असते कारण तुमच्या सुप्त मनाला नाही, नको असे शब्द कळत नसते. तुम्ही मागता ,कार्यालयाला जाण्यासाठी उशीर व्हायला पाहीजे आणि तेच घडत असते. सुप्त मन हे आपण दिलेले विचार एक आदेश म्हणून त्याचे पालन करत असतो. तुम्ही ज्या वेळेस झोपतात त्यावेळी तुमचे जागृत मनही काही वेळ निष्क्रिय होते. तुमचे सुप्त मन नेहमी सक्रीय असते अगदी तुम्ही झोपेत असता त्यावेळीसुद्धा. जागृत मन तुम्ही झोपतांना तुमचे विचार सुप्त मनाला देते. सुप्त मन ते विचार नोंद करून ठेवते. त्यासंबंधीत विचारांच्या शोध घेत असते.वैश्विक शक्ती आपल्या विचारांना आकर्षित करणारे विचार आपल्यापर्यंत परत घेऊन येते. जागृत मन सकाळी सक्रीय होत असताना सुप्त मन तेच विचार जागृत मनाला परत करतो.
Read more articles about Subconscious mind
Please like ,comment and share on social media.

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?