कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वताच करा असा उपाय

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे. आज आपल्याकडे सरकारला साथ देण्याची आवश्यकता आहे. सरकार वेळोवेळी योग्य निर्णय घेत आहे. आपण जर सरकारच्या निर्णयाला साथ दिली तर कोरोनापासून आपण सुरक्षित राहू शकतो. कोरोना काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही. कोरोनाबद्दल विविध माध्यमातून आपल्याला माहीती मिळतच आहे. कोरोनापासून सुरक्षितेसाठी सरकारनेही वेळोवेळी सांगितलेही आहे. 
https://www.khadedipak.com
कोरोनापासून सुरक्षितेसाठी उपाय 
आज कोरोनापासून आपल्याला खरच सुरक्षित करायचे असेल तर  घरीच थांबा.कोरोनापासुन सुरक्षित राहण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक असुन सरकार या पर्यायाबद्दल ओरडून ओरडून सांगत सांगत आहे. सरकारला अजुन कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका. पुढील किमान १५ दिवस तरी  स्वताला घरातच ठेवा. जगायची इच्छा शिल्लक असेल तर घरातच थांबा. जी चुक इतर देशाच्या लोकांनी केली ती तुम्ही करू नका. इतर देशातील आपले काही बांधव कळकळून तुमच्यापर्यंत तेथील स्थिती सांगत आहे. मृत्युला जवळून येताना ते क्षणोक्षणी बघत आहे.  सरकारच्या निर्णयाला तुमच्या साथीची आवश्यकता आहे. फक्त न फक्त तुमच्या वागण्यानेच आपण कोरोनावर मात करू शकतो. 
https://www.khadedipak.com
कोरोनापासून सुरक्षितेसाठी उपाय
घरी थांबून, संसर्गाची चैन खंडीत करा, नाहीतर महाभयंकर विनाश निश्चित आहे. ज्याला जबाबदार आपल्यातीलच बेजबाबदार लोक आहेत. आपली व परीवाराची घरी राहून काळजी करा. त्याच त्या सुचना मी तुम्हाला सांगणार नाही. घरी बसण्याखेरीज आपल्याकडे कुठलाच मार्ग नाही. प्रशासन, डाॕक्टर्स तुमच्यासाठी स्वताचा जीव धोक्यात घालत आहे. त्यांचा संम्मान करा, त्यांना तुम्ही घरी थांबून मदत करा. 
https://www.khadedipak.com
कोरोनापासून सुरक्षितेसाठी उपाय
तुम्ही स्वताला घरी थांबवुन स्वताचीच मदत करत आहात. सरकारलाही तुम्ही घरीच थांबावं असं वाटतयं. आज सरकारने लाॕकडाऊन घोषित केल्यानंतरही लोक घराबाहेर पडताहेत. लाॕकडाऊन चा अर्थ घरी बसा असा होतो. गाड्या घेऊन बाहेर फिरणे आता तरी बंद करा. आपल्यातील शिल्लक असलेली देशभावना जागी करा. सरकार सांगत असलेल्या नियंमांचे तंतोतंत  पालन करा. आपला नाहीतर देशातील लोकांच्या जीवाचा विचार करा. आज आरोग्य विभागात जगात अग्रस्थानी असलेल्या इटली देशातील काय स्थिती आहे ते बघा. सरकारच्या निर्णयाचे उलंघन केल्याचे दुष्परिणाम आज तेथील लोक भोगत आहेत. 
https://www.khadedipak.com
कोवीड१९
सद्यपरिस्थिती एवढी भयंकर आहे की बघताना आणि ऐकतांनाही अंगावर शहारे येत आहे. तेव्हा सरकारने सांगितलेल्या निर्णयाचे त्वरीत अम्मलबजावणी करा. ऐकले नाही तर नुकसान तुमचेच होईल एवढे ध्यानात घ्या. जर लोक असेच घराबाहेर पडत राहतील तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे एक उदाहरणातून स्पष्ट करतो. जर तुम्ही घराबाहेर जाणे थांबवले नाही तर मृत्युचा उघड नाच सुरू होईल. मृत्युचे भय, परीवारातील सदस्यांना भेटता न येणे, नातेवाईकांपासून अलिप्त अशाप्रकारचे जीवन जगण्याची वेळ येईल. कदाचित परिवारातील कुणाची कोरोनामुळे मृत्यु झाला तर अंत्यविधीतर सोडा साधे आपल्या त्या सदस्याला पहायचे ही आपल्या भाग्यात नसणार. तेव्हा स्वता सुधरा, काही काळासाठी घरातच थांबा. यातच आपल्या सर्वांचे हीत आहे.

घरामध्ये राहून या प्रकारे जगा आपले आयुष्य

या रोगाच्या दहशततीला घाबरूनही जाऊ नका. फक्त पुढील काही दिवस घरी थांबा. आपल्या परीवारातील सदस्यांसोबत वेळ घाला. त्यांच्याशी बोला, भविष्यातील काही योजनाचे नियोजन करा. आपल्या मुलांशी गप्पा मारा. त्यांना वेगवेगळ्या गोष्टीं सांगा. आपल्याकडे दिवस घालवण्साठी आज भरपूर व्यवस्था आहे. विचार करा तात्याराव सावरकरांनी त्या छोट्याशा काळकोठाडीत अकृरा वर्षाहून अधिक काळ कसा काढला असेल. तात्याराव म्हणजे एक सुर्याची किरणच. सुदैवाने आपल्याकडे सर्व सुविधा आहे शिवाय सोबत सर्व परीवारही आहे.
https://www.khadedipak.com
परिवाराची सुरक्षितेसाठी घरात राहूया
आज आपल्याकडे मनोरंजनासाठी टिव्ही, रेडिओ आणि मोबाईल उपलब्ध आहे. टिव्हीवर आपल्या आवडीचे चित्रपट, मालिका, नाटक सुरु असतात. ते बघा, त्यातून काही चांगल्या समाजापयोगी विचारांचा अवलंब करा. तुम्हाला जर एखादा छंद असेल तर यासारखा वेळ पुन्हा कधिच तुमच्याकडे नसेल. या वेळेचा भरपूर फायदा घ्यायला सुरूवात करा. नविननविन पुस्तके वाचा, गाणी ऐका. जर तुम्हाला लिहीण्याची आवड असेल तर पुस्तके लिहा, कविता लिहा, नाटकं लिहा, लेख लिहा, गोष्टी लिहा. नविन काहीतरी शिका व सतत शिकण्याचा प्रयत्न करा. 
https://www.khadedipak.com
कोरोनापासून सुरक्षितेसाठी घरातच राहू
जर तुम्हाला चित्र काढण्याची आवड असेल तर वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढण्याचा प्रयत्न करा. नविन कला शिकण्यासाठी नेहमी स्वताला तयार ठेवा. तुमच्या असं करण्याने तुम्ही न थकता, बोर न होता सहज घरामध्ये राहून स्वताला सुरक्षित कराल. शिवाय तुम्हाला एक किंवा त्यापेक्षा जास्त कला शिकण्याचा फायदाही होईल. अध्यात्मिक कला शिकण्याचा प्रयत्न करा. ध्यान करून एकाग्रता वाढवा. एकाग्रता वाढल्याने तुमच्यावरील मानसिक दबाव कमी होईल. 
सुप्त मनाच्या साहाय्याने कोरोनापासून दूर रहा.
तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या सुप्त मनात अविश्वसनीय शक्ती दडलेली आहे ती. सुप्त मन तुमचे विचार प्रत्यक्षात उतरावण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही जसा विचार करता, तसेच तुम्ही बनत असतात. हा आकर्षणाचा नियम आहे, हा सतत काम करत असतो. तुम्ही ज्यावेळी विचार करत असतात ,त्यावेळी तुम्ही त्याबद्दल तुमचे आकर्षण वाढवत असता. जर तुम्ही आजार न होण्याचा सतत विचार करत असतात, म्हणजेच तुम्ही आजाराला आकर्षित करत असतात. आपल्याला खरंतर सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार याचा फरकच कळत नाही.
https://www.khadedipak.com
सुप्त मनाची शक्ती आणि कोरोनावर मात
सुप्त मन याविषयी वाचण्यासाठी सुप्त मन यावर क्लिक करा. तुम्ही कोरोना विषयी विचार करायला सोडून द्या. घरी बसा , आपली व परीवाराची काळजी घ्या. तुम्हाला जास्त काहीच करायचे नाही. फक्त एवढेच दिवसातुन दोनदा-तिनदा आणि रात्री झोपतावेळी करा. मी व माझा परिवार सुरक्षित आहे. माझा माझ्या सुप्त मनावर पूर्ण विश्वास आहे. स्वताला आपल्या परिवाराच्या प्रत्येक सदस्यांशी हसताना,बोलताना, खुश असल्याचे बघा. तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी सुप्त मनाचे आभार माना. 
https://www.khadedipak.com
सुप्त मनाची शक्ती आणि कोरोनावर मात
ज्यांना कोरोनाची लागण झालेली असेल त्यांच्यासाठीही प्रार्थना करायला सुरूवात करा. यात खुप मोठी शक्ती आहे. डाॕक्टर त्यांचे काम करत आहे. आपण घरी राहून सगळ्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना तरा करूच शकतो. चला तरा मग करूया प्रार्थना देशासाठी.
जगातील सर्व मानव जाती आज सुरक्षित आहे. माझ्या देशातील देशबांधव सुरक्षित आहे. माझ्या राज्यातील सर्व बांधव सुरक्षित आहे. माझ्या शहरातील,नगरातील,गावातील बांधव सुरक्षित आहे. मी आणि माझा परिवार सुरक्षित आहे. प्रत्यक्षात हे सर्वजण सुरक्षित असल्याचे बघा. यापासुन आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी माझ्या सुप्त मनाला धन्यवाद. कुठल्याही रोगाचे नाव घेऊ नका. प्रत्येकाने ही प्रार्थना करायला सुरूवात करा. तुम्ही केलेली प्रार्थना जर तुमच्या अंतकरणातून असेल तर तुम्हाला याचा प्रभावही दिसेल. काही लोक यावर हसतील ,पण खरंतर हेच आहे की तुमच्या सुप्त मनातच अलौकिक शक्ती दडून बसलीय. 
सरकारने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करा. एकच म्हणेल, सुरक्षित रहा, सुरक्षित ठेवा. आज वाचाल तरच उद्या जगाल. आपल्यातील बेजबाबदारपणा झटकून जबाबदार व्यक्ती बना. आज देशाला तुमची आणि तुमची देशाला आवश्यकता आहे. घराबाहेर पडू नका. सरकारला सक्तीने वागायला भाग पाडू नका.
जर असेल तुमच्या सर्वांची साथ, घरात राहूनच घालू कोरोनाला लाथ.
आमचा लेख तुहाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. यामुळे आम्हाला नविननविन  विषयावर  लिहायला प्रोत्साहन  मिळते. ही पोस्ट आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. 

10 thoughts on “कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वताच करा असा उपाय”

 1. सुप्त मन खरं काम करतं. प्रार्थना मनातून असावी.

  Reply
 2. दोन वेळा करा बाथ
  वेळोवेळी स्वच्छ धुवा हाथ
  जर असेल तुमच्या सर्वांची साथ,
  घरात राहूनच घालू कोरोनाला लाथ
  ➰⛓️nice coment for your nice word

  Reply

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?