परिवर्तन निसर्गाचा नियम

वेळेनुसार , परिस्थितीनुसार स्वतामध्ये परिवर्तन करून घेणे, बदल करून घेणे हा एक सृष्टीचा जुना आणि महत्वाचा नियम आहे. या नियमाची तर आपणा सर्वांना माहीती आहेच. जी व्यक्ती परिवर्तन करण्यापासून स्वताला रोखतात, त्यांचे अस्तित्व जास्त काळ टिकूच शकत नाही. परिवर्तन हाच सृष्टीचा महत्त्वपुर्ण असा नियम आहे आणि आपण त्याला नाकारू शकत नाही.
https://www.khadedipak.com
CHANGE YOURSELF ACCORDING TO TIME
युगायुगापासून परिवर्तनचा नियम सुरू आहे. एका युगातून दुसऱ्या युगामध्ये रूपांतर होत असताना मोठ्या प्रमाणात मोठे परिवर्तनही होत असतात. सृष्टीलासुद्धा युगाप्रमाणे स्वतामध्ये बदल करून घ्यावे लागतात कारण सृष्टीसुद्धा परिवर्तनचा नियमाचे पालन करत असते. रूढी, जुन्या परंपरा या सर्वांमध्येसुद्धा वेळेनुसार बदल करायलाच हवा तरच त्या टीकून राहतील.
https://www.khadedipak.com

CHANGE IS THE LAW OF NATURE
ज्या रूढी, परंपरा अनेक वर्षापासून चालत असतात, ज्यामध्ये वेळेनुसार बदल केलेले नसतात. यामुळे व्यक्तीच्या मनात विद्रोह जन्म घेत असतो. आजच्या आधुनिक काळात जुन्या रूढी,परंपरा यांचा विचार करून जगणे अधिकच कठीण होत चालले आहे. आजच्या या वैज्ञानिक काळात या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष  होत चालले आहे. नविन पिढी या परंपराचे अवलंब करण्यास फारशी उत्सुक नाही असे दिसून येते.
https://www.khadedipak.com
PARIVARTAN WITH TIME
युगायुगापासून ह्या नियमाचे पालन होत आले आहे. ऋतूही वेळेनुसार स्वतामध्ये बदल करून घेतात. पिढीच्या वाढत चाललेल्या अंतरामुळे गैरसमज वाढत चाललेले आहे. जुन्या पिढीच्या लोकांनी स्वताला नव्या पिढीशी जुळून घेणे गरजेचे आहे. दोघा पिढीतील वैचारिक दृष्टिकोन आणि त्यातील मोठा फरक वाढत चाललेला आहे. नविन पिढीतील मुले त्या सर्व गोष्टी समजून घ्यायला तयार नसतात. ज्या रूढी,परपंरा, अनुशासन आणि  शैक्षणिकपद्धती त्यांच्या जन्माच्या कितीतरी वर्षापूर्वी समाजकल्याणासाठी बनवलेल्या असतात.  या रूढी,परंपराचा स्विकार आज आम्ही का करावा असा प्रश्न कदाचित नेहमी त्यांच्या डोक्यात तांडव करत असावा.
https://www.khadedipak.com
GO FOR CHANGE
जुन्या पिढीतील लोक आपल्या चालीरीती आणि जुन्या कल्पना सोडत नाही. याउलट आपल्या परपंरागत चालत आलेल्या चालीरीती आपल्या नव्या पिढीनेही पुढे सुरूच ठेवल्या पाहीजे असा हट्ट करत असतात. नव्या पिढीतील मुलांना वारंवार या गोष्टींसाठी ऐकत राहने आवडत नाही. मुद्दामच या चालीरीतींचा अपमान करण्यास नवी पिढी नेहमी तयारच असते. यामुळे घरात क्लेश वाढत जाते आणि भांडणं सुरू होतात.
https://www.khadedipak.com
LEARN NEW THINGS FOR CHANGE
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या दोन पिढीतील अंतर मिटवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. एकमेकांच्या भावनांचा आदर करायला शिकले पाहीजे. जर जुन्या पिढीतील लोकांनी नवीन पिढीच्या विचाराशी मिळवून घ्यायला सुरूवात केली तर नव्या पिढीतील लोकसुद्धा त्यांचा मान राखतील.
https://www.khadedipak.com
IRRITATION DUE TO  SAME THINGS 
नवीन पिढीशी जुळवून घेणे अवघड असेल मात्र अशक्य नाहीच. नवीन पिढीनेही काही गोष्टी ऐकण्याची सवय करून घ्यायलाच पाहीजे. या दोन पिढीतील नातं एका नाजूक काचेसारखं असत. जर काचेला तडा गेला तर त्यांना जोडता येणे जसे शक्य नाही अगदी त्याचप्रकारे मनामध्ये एकमेकांविषयी जर क्लेश निर्माण झाले तर त्याला औषध नाही. क्लेश,अविश्वास जर घट्ट होत गेले तर मनामध्ये एकमेकांविषयी तिरस्काराची भावना उत्पन्न होते.
स्वताचा मान ठेवण्यासाठी अगोदर दुसऱ्यांना मान देण्याचे आपण शिकले पाहीजे. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला पाहीजे. दुसऱ्यांचे अहीत किंवा तिरस्कार करने बंद केले पाहीजे. आपण दुसऱ्यांशी ज्यापद्धतीने वागू अगदी त्याचप्रकारची वागणूक आपल्या पदरात पडत असते. जे पेराल तेच उगवेल. तुम्ही असं कधी ऐकले आहे का बरं ? की गुलाबाच्या झाडावर चमेलीचे फूल उमलले आहे, नाहीना गुलाबाच्या झाडावर गुलाबाचे फूलच येणार हे जेवढे खरं आहे तेवढेच खरं आहे ते तुम्ही तुमच्यात केलेल्या सकारात्मक बदलामुळे दुसऱ्यांचे मनही सहज जिंकता येऊ शकते.
https://www.khadedipak.com
RESPECT TO EACH OTHER TO GET RESPECT
आयुष्याचं काय, ते तर काही दिवसासाठी मिळालेलं असतं. या आयुष्याचं सोनं ज्यावेळी करायला आपण शिकू त्यावेळी हे छोटसं  आयुष्यही खूप सुंदर असल्याचं आपल्याला कळेल. स्वतामध्ये परिस्थितीनुसार परिवर्तन, बदल करायला आपण ज्यावेळी शिकू त्यावेळी आयुयातील सर्व समस्यांचे समाधान होईल. कारण परिवर्तन हाच एकमेव नियम आहे जो तुम्हाला आनंदानं जगायला शिकवतो. 
तुम्ही आजच स्वतामध्ये वेळेनुसार अगदी छोटेशे बदल करायला सुरूवात करा तुम्हाला यामुळे झालेला बदल अनुभवता येईल. जर कार्यालयामध्ये तुमचे साहेब तुमच्याकडे तिरस्काराने बघत असेल तर तुम्ही रागाऊ नका. तुम्ही त्यांच्याकडे तिरस्काराने बघत बसू नका. शांत रहा आपण कुठे चुकत आहे याचे परीक्षण करा आणि त्यानुसार स्वतामध्ये बदल करा. तुमच्यात झालेल्या बदलामुळे तुमच्याविषयी असलेला तिरस्कार नाहीसा होईल.

https://www.khadedipak.com
HAPPY IN LIFE WITH CHANGE
भगवान श्रीकृष्ण यांनीही द्वापर युगात महाभारात महासंग्राम सुरू होण्याच्या अगोदर पितामा भीष्म यांना परिवर्तनबद्दल सांगितले होते. भगवान श्रीकृष्ण यांनी वेळेनुसार ऋतूसुद्धा स्वतामध्ये बदल करून घेतात आणि सृष्टीचे हे त्रिकालबाधित सत्य आहे असे सांगितले होते. पण महाबली भीष्म यांना परिवर्तनापेक्षाही आपणच मानलेला धर्म, वचन, परंपरा, अनुशासन आणि प्रतिज्ञाचं पालन श्रेयस्कर वाटले. परिवर्तनामुळे समाजाचा समतोल बिघडू शकतो असा त्यांचा विश्वास होता. परिस्थितीनुसार बदल केला नाही तर सर्वनाश निश्चित आहे. परंपरा, कर्तव्य आणि वचन यांच्यात वेळेनुसार धर्माच्या रक्षणासाठी बदल केलेच पाहीजे.
अंतिमक्षणी शंतनूसुत भीष्म यांना भगवंताचे बोल खरे होताना स्पष्ट दिसले. पितामा यांनीही मान्य केलं की परिवर्तन हा सृष्टीचा महत्त्वपुर्ण नियम आहे. जर तो आमलात आणला नाही तर सर्वनाश निश्चित आहे.

CLICK BELOW LINKS TO READ OTHER ARTICLES

https://www.khadedipak.com/2020/02/law-of-attraction-mind.html

https://www.khadedipak.com/2020/01/powers-of-subconscious-mind.html

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?