वेळेचे नियोजन – TIME MANAGEMENT

आजच्या दगदगीच्या जिवनात आपली सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे वेळ. होय वेळ, आपण नेहमी एकच तक्रार करत असतो. आज मला वेळच मिळाला नाही हे आवडते उत्तर लोकांच्या मनात चांगलेच घर करून बसलेले आहे. कुणी काही काम सांगितलं आणि ते जर अपुर्ण राहीलं किंवा सुरूच केलं नाही तरी नो टेंशन. उत्तर तर आपल्याकडे आहेच, “वेळ मिळाला नाही.” 
बरेच लोक या भ्रमात असतात की आपण वेळेला आपल्याला हवे तसे मॕनेज करू. खरंतर ते विसरून जातात वेळ कुणासाठीच थांबत नाही. कुणीच वेळेला मॕनेज करू शकत नाही. वेळेबरोबर फक्त चालता येऊ शकते.  
https://www.khadedipak.com
TIME MANAGEMENT 
वेळ सतत पूढे जात असते , वेळ कुणासाठीच थांबत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहीजे. तुमच्या आयुयातून निघून गेलेला क्षण कधीच परत येणार नसतो. त्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण अतिमहत्वाचा आहे त्याला असेच व्यर्थ दवडू नका. आयुष्याचा प्रत्येक क्षण जगायला शिका. त्या प्रत्येक क्षणाचे मर्म ओळखायला शिका.
https://www.khadedipak.com
SUCCESSFUL PEOPLES
आपले आयुष्य किती आहे हे तर कुणालाच ठाऊक नसते, बरोबर ना? हो अगदी बरोबरच, तर आयुष्याचा प्रत्येक एक क्षण आपल्यासाठी महत्वाचा असला पाहीजे. आज आपले आयुष्य एका कोऱ्या कागदासारखेच असते.  आपल्याला ठरवायचे असते की या कोऱ्या कागदावर काय लिहायचे. जगामध्ये कितीतरी शास्त्रज्ञ,व्यापारी,अभ्यासक,इतिहासकार होऊन गेलेत आणि अजून आहेतही. याच लोकांनी यश कसे मिळवले असेल बरं? वेळेचा सदुपयोग करून, होय अगदी बरोबर. 
https://www.khadedipak.com
IMPROPER TIME MANAGEMENT 
ज्या व्यक्तींनी अफाट यश संपादन केले आहे त्यांना वेळ म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा असतो हे त्यांना समजले. कदाचित वेळेविषयी त्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जाणले असेल. यश मिळवण्यासाठी यशाचा पाठलाग न करता स्वताला एवढे सक्षम केलेत की, यश,किर्ती यशस्वी लोकांचा पाठलाग करत असते.
https://www.khadedipak.com
 DIARY
गरीब असो वा श्रीमंत, बलवान असो वा दुबळा, राजा असो वा प्रजा वेळ सर्वांसाठी सारखीच असते. वेळ कधीच कुणाला जात-पात -कुळ विचारत नाही. या विश्वात सर्वात शक्तिशाली कोण असं जर विचारलं तर त्याच एकमेव उत्तर असेल वेळ. वेळेपेक्षा कुणीच बलवान नाही. वेळ कुणासाठीच थांबत नाही. सर्वांसाठी वर्षामध्ये ३६५ दिवस असतात. प्रत्येक दिवसामध्ये २४ तास असतात. जर असे असेल तर असं का, एका व्यक्तींला भरपूर वेळ मिळतो. तो त्याची सर्व कामे वेळेवर पुर्ण करतो. आपल्या परिवारास वेळ देतो, नेहमी खुश असतो तर दुसरी व्यक्ती नेहमीच वेळ न मिळाल्याचं कारण सांगत असते. आपली रोजची कामे अपुर्ण राहतात. आपल्या परिवारास पुरेसा वेळ देता येत नाही. नेहमी चिंताग्रस्त असतो. याचं एकच उत्तर असू शकते ते पहिल्या व्यक्तीने वेळेचे महत्व लक्षात घेऊन त्याचं नियोजन केले. दुसऱ्या व्यक्तीने अगदी याच्या उलट केलं. वेळेला जास्त महत्व न देता, वेळेचे नियोजन न करता आपल्या कामास सुरूवात केली.
https://www.khadedipak.com
PROPER TIME MANAGEMENT 
सर्वसामान्य लोक आणि यशस्वी लोकांमध्ये एकाच गोष्टीचा फरक असतो तो म्हणजे वेळेचे अचूक नियोजन. यशस्वी लोकं एक दिवस अगोदर म्हणजेच झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाचे नियोजन करतात. उद्या आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत. त्या सर्व कामाची नोंद एका डायरीमध्ये किंवा डिजीटल नोटबूकमध्ये करून ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना माहीत असते की आज आपल्याला काय काम करायचे आहे.
https://www.khadedipak.com
NOTEBOOK
नोंदवून ठेवलेल्या कामापैकी अशी कामे तो निवडतो की त्याने ती कामे दुसऱ्यांना सांगितले तरी पूर्ण होईल. ती कामे दुसऱ्यांना सोपवून ती व्यक्ती आपल्या दुसऱ्या कामाकडे लक्ष केंद्रित करते.जी कामे सहजपणे दुसऱ्यांच्या मदतीने पुर्ण होत असेल तर स्वताचा वेळ का उगाच खर्च करायचा. दुसऱ्यांना सोपवलेल्या कामामुळे त्यांचा भरपूर वेळेची बचत होते. त्या वेळेचा उपयोग दुसऱ्या कामासाठी करत असतात. नोटबूकमध्ये आजची कामे नोंदवून ठेवल्याने कोणतेही कामाचा विसर पडत नाही. जी कामे झालीत त्यांची नोंद करून घेतात. सर्वात जास्त ऊर्जा आपल्यात सकाळी असते आणि संध्याकाळी कमो कमी होत जाते. जास्त ऊर्जा असताना अवघड कामे करून घेतात जी की करायची आहेतच. याप्रकारे आपल्या वेळेचे नियोजन करून आपली सर्व कार्य पूर्ण करतात. यशस्वी लोकांना वेळ न मिळाल्याची तक्रार करताना ऐकलेत का कधी ? नाही ना, कारण ते वेळेच अचूक नियोजन करतात.
https://www.khadedipak.com
वेळेचे नियोजन 
सर्वसाधारण लोकं नेमके यांच्या उलट करत असतात. उद्या आपल्याला कोणती कामे करायची याबद्दल काहीच नोंदवून ठेवत नाही. सर्व कामे मनामध्ये ठेवतात. सकाळी उठल्यानंतर कोणते काम अगोदर करायचे हेच माहीत नसते. सगळी कामे स्वतःच पुर्ण करण्यावर अधिक भर असतो. असं ही म्हणता येईल, दुसऱ्यांच्या कामावर विश्वास नसतो. मनामध्ये असलेली काही कामे तो करतोही पण कामात असताना दुसऱ्या कामाचा विसर पडतो. जे काम हातामध्ये येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो. वेळेवर काम सुरू करण्यासाठी येणारा कंटाळा. प्रत्येक काम नियोजित वेळेवर न करता, नंतर करू असं मनाला पटवून देत असतो. ज्यावेळी कुणी सांगितलेल्या कामाविषयी विचारतो त्यावेळी त्याची धांदल उडालेली असते. साहेबांनी काम झाले का असा प्रश्न केला तर अपेक्षित असं उत्तर तयारच असते. आपण केलेल्या चुकीचे खापर वेळेवर फोडत बसतो. वेळ नाही मिळाला, वेळ नाही मिळाला अशी रट सुरू असते. 
https://www.khadedipak.com
यशप्राप्ती
यशस्वी लोक कमी मेहनत करून अधिक समृद्ध होतात आणि आरामदायी आयुष्य जगतात. सर्वसाधारण लोक जास्त मेहनत करूनसुद्धा कर्जबाजारी असतात. सर्वसामान्य आयुष्य जगत असतात. दोघांनाही एका दिवसात २४ तासच मिळतात. पण एका व्यक्तींला पूरेसा वेळ मिळतो कारण त्याने वेळेचं महत्व समजून घेतलेलं असतं. दुसरी व्यक्तीं नेहमीच वेळ न मिळाल्याची तक्रार करत असते.
https://www.khadedipak.com
वेळ आणि वेळेचे महत्व 

1 thought on “वेळेचे नियोजन – TIME MANAGEMENT”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?