दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास शिका.दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल
दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल

दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल.आपल्याला जीवनात मानसिक  शांती पाहीजे असल्यास,जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. जीवनात जर सुख,शांती आणि समृद्धी पाहीजे असेल तर आपल्याला स्वतामध्ये बदल करावे लागतील. 

दुसऱ्यांकडुन जर आपल्याला आदर आणि सन्मानाची अपेक्षा असेल तर त्यांचा ही सन्मान, आदर करायला शिकावेच लागेल. जीवनात मणुष्य मान, संम्मान,आदर, स्तुती,प्रशंसा या सर्व गोष्टींचा भूकेला असतो. 

स्वताला दुसऱ्यांकडुन योग्य मान-संम्मान, आदर सत्कार मिळावा अशी अपेक्षा बाळगून असतो. अशी अपेक्षा बाळगणे चूकीचे नाहीच. एक गोष्ट नेहमीच लक्षात असू द्या की, दुसऱ्यांकडुन मान-संम्मानाची अपेक्षा ठेवण्या अगोदर दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास शिका.

दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल
दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेलएका विशाल राज्याची धूरा एक राजा आणि त्याचा सरसेनापती यांच्या खांद्यावर होती. या राज्यातील सर्व जनता सुखी-समृद्धी होते. जीवन जगताना त्यांना कोणत्याच गोष्टींची कमी पडत नसे. 
या राज्याचे सर्वच योद्धे महापराक्रमी,महाबलशाली होते, त्यांच्या सामर्थ्यशाली पराक्रमाच्या आधारावर या राज्यावर कुणीही आक्रमण करत नसे. आक्रमण केले जरी, जास्त काळ ते युद्ध चालत नसे. या राज्याचा सरसेनापती कुशल नितीकार होता. सरसेनापतीच्या रणनितीसमोर शत्रू जास्त वेळ युद्धभुमीत राहू शकत नव्हता.
राजा सरसेनापती सांगतील तेच करायचा. या सरसेनापतीने आपल्या कौशल्याने आजपर्यंत आपले राज्य सुरक्षित ठेवलेले होते.

दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल
दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल

राजा स्वतावर एवढा अभिमान करत होता की, बोलताना तो उच्च आणि उर्मट आवाजात बोलत असे. आपल्या राज्यावर कुणीही आक्रमण करू शकत नाही याचे श्रेय स्वताच घेत होता. जो राजाच्या सूचनेचं पालन करत नसे किंवा एका छोट्या चूकीसाठी त्या व्यक्तीला मृत्युदंड देत असे. 
राजाच्या अशाप्रकारच्या वागण्याने प्रजेमध्ये अशांतता आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रजा भितीने राजासमोर काहीच बोलत नसे. राजाला वाटे की, त्याची प्रजा, आपल्या राजाचा खूप आदर करते. राजाला त्याच्या पराक्रामाचा एवढा अभिमान होता की, त्या अभिमानाचे रूपांतर गर्वामध्ये होत चालले होते. 
मंत्रीमंडळ, प्रजा आणि सरसेनापती यांना राजाचा बदलत चाललेल्या स्वभावाची जाणीव होती. राजाला याबद्दल बोलायचं म्हणजे साक्षात मृत्युचे दार ठोठायचे असे होते. मृत्युच्या धाकाने कुणीही राजाला या विषयावर बोलत नसे. राजा जसे सांगेल, तसच करायचं हे जणू नित्यक्रमच बनले होते.
दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल
दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल

सरसेनापती मात्र आपल्या स्वभावाप्रमाणेच जनतेशी वागत असे. जनतेच्या सर्व आवश्यक बाबींवर सरसेनापती विचारपुर्वक निर्णय घेत असे. जनतेच्या भल्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना राबवत असत. आपल्या प्रजेचं पालन एक वडिल म्हणुनच करत असे. 
प्रजा आपल्या सरसेनापतीच्या कार्याबद्दल नेहमीच खूश असत. काहीही अडचण असल्यास प्रजा सरसेनापतीला न घाबरता सांगत असे. याचे कारण असे की, सरसेनापती सर्व अडचणी समजून घेत आणि त्यावर मार्ग काढत असे. प्रजावर चिडचिड करत नसत. सरसेनापती प्रजेशी एक सामान्य ग्रामस्थ म्हणुनच वावरत असे. 
अशा वागण्याने सरसेनापती आणि प्रजा यांच्यात एक विशेष नाते बनले होते. सरसेनापतीच्या प्रत्येक शब्दाला एक विशेष मान होता. सरसेनापतीने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उलंघन होणार नाही यासाठी प्रजा विशेष काळजी घेत. सरसेनापतीच्या कार्यामुळे या राज्यात सुख-समृद्धी आणि वैभव नांदत होते. 
राज्यात प्रगतीची जणू लाटच उठलेली होती. राजा राज्यात फेरफटका मारण्यासाठी आपल्या सैनिकांचा, मंत्रिमंडळाचा ताफा घेऊन जात असे. राजाच्या भव्य रथाला पांढरेशुभ्र सात अश्व जोडलेले होते. या भव्य रथातून जात असताना राजा एका वेगळ्याच तंद्रीत असायचा.

दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल
दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल

राज्यातील वैभव आणि प्रगती पाहून राजा खूश झाला होता. राज्याची प्रगती आपल्यामुळेच झालेली आहे असे राजाला वाटू लागले. प्रजाला अधिक उत्पन्न मिळू लागले. राजाने सभा बोलावली होती. या सभेत प्रजाकडून अधिक कर वसूल करण्याचा निर्णय राजाने घेतला. प्रजाजन राजाच्या या निर्णयावर नाराज होते. 
सरसेनापती ही राजाचा हा निर्णय ऐकून आश्चर्यचकित झाला होता. सरसेनापतीने राजाला हा निर्णय मागे घेण्याची नंम्र विनंती केली. आपल्या या निर्णयाने आपल्या प्रजेचे नुकसान होईल. राजाने एक हात उंचावत सरसेनापतीला गप्प बसण्यास सांगितले. राजाच्या आवाजात क्रूरपणा आणि गर्व दोन्हीही स्पष्ट दिसत होते.
राजा आपला उर्मठ आणि उच्च आवाजात म्हणाला की, सरसेनापती, तुम्ही राजाच्या आदेशाचे उलंघन करत आहात. तुमचे एकच कर्तव्य आहे, आपल्या राजाच्या आदेशाचे पालन करने होय. यानंतर आमच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींला कारागृहात टाकल्या जाईल. 
प्रजा राजाचा मनापासून तिरस्कार करायला लागली. शिक्षेच्या भितीने जनता राजाला तेवढ्या पुरताच मान देत होते. सरसेनापतीला आपल्या प्रजेच्या समोर जायला भिती वाटत होती. सरसेनापती आपल्या प्रजेला हात जोडून म्हणाला की, है जनता जनार्धन, मला माफ करा. 
मी तुमच्यासाठी राजदरबारामध्ये काहीच करू शाकलो नाही. राजाचा आदेश आहे की, तुमच्याकडून जास्त कर वसूल करण्यात यावा. जो आदेशाचे पालन करणार नाही त्याला कारागृहात उरलेले आयुष्य काढावे लागेल. 
प्रजातील एक ग्रामस्थ पूढे येऊन, आपल्या सरसेनापतीला म्हणाला की, सरसेनापती महोदय, यात आपली काहीच चूक नाही, आपल्याला माफी मागण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुमच्यासाठी अतिरिक्त कर देऊ. 
प्रजाच्या मनात आपल्याविषयी असलेला आदर पाहून सरसेनापतीचे डोळे पानावले होते. न थांबणाऱ्या अश्रूच्या धारा सतत वाहत जमिनीला मिळत होत्या. सरसेनापतीच्या मनाला हा निर्णय काही पटत नव्हता. 

दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल
दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास आपल्याला शिकायला लागेल

एके दिवशी सरसेनापतीने ठरवले की, उरलेले आयुष्य कारागृहात काढायला लागले तरी चालेल. आज राजाला दरबारात या निर्णयाला विरोध करायचाच. राजदरबारात सर्व मंत्रिमंडळ, प्रजा आणि सरसेनापती जमलेले होते. 
सरसेनापती राजाला म्हणाला की, हे राजा आपण अतिरिक्त कर वसूल करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्रजा अस्वस्थ आहे. प्रजेच्या मेहनतीचे फळ हे त्यांनाच मिळायला पाहीजे. प्रजा जर सुखी-समृद्धी असेल तर राज्याचेही वैभव आकाशाला भिडते. 
आपल्या निर्णयामुळे प्रजेत असंतोष निर्माण होऊ शकतो आणि असं घडणं यात राज्याचं हित नाही. सरसेनापतीचे बोलने ऐकून राजाचा चेहरा आणि डोळे रागाने लाल झाले होते. राजा जोरात ओरडून म्हणाला की, सरसेनापती, तुम्ही राजाच्या आदेशाचे उलंघन केले आहे. 
मी तुमचे सरसेनापती पद तुमच्याकडून काढून घेतो. राजाने सैनिकांना सरसेनापतीला बंदीगृहात बंदी करण्याचा आदेश दिला. सरसेनापती मात्र आपल्या निर्णयावर खूशच होता, आपण प्रजेसाठी शांत न राहून, राजाला विरोध केला होता.
सरसेनापतीला कारागृहात धाडण्यात आले होते. सरसेनापती कारागृहात जाऊन जवळजवळ दोन वर्षे उलटली होती. ही बातमी जवळच्या राज्यापर्यंत पोहचलेली होती. इतर राज्यातील राजांनी एखत्र येऊन या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. 
चारही बाजुंनी शत्रू राज्यांने आक्रमण करण्याचे ठरवले होते. शत्रू राज्याची सेना चारही बाजुंनी राज्याच्या सिमेपर्यंत येऊन पोहचली होती. आपल्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी शत्रू आपल्या सिमेवर येऊन उभे आहेत. संदेश राजाला मिळाला, राजा अस्वस्थ झाला होता.
मंत्रिमंडळांला युद्धासाठी काय रणनिती असावी असा प्रश्न राजाने केला? कुणाकडेच काहीही पर्याय नव्हता कारण युद्धात रणनीती अगोदर सरसेनापतीच करायचा. या संकटाला कसे सामोरे जायचे हा प्रश्न राजाला सतावत होता. 
मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजाला सरसेनापतीची मदत घेण्यासाठी सूचवले. सरसेनापतीमुळेच आपले राज्य अजय होते असं राजाला सांगितले. राजाला मंत्रीचे म्हणने पटले, राजाने मंत्रीला सरसेनापतीकडे आपला संदेश पाठवला.
मंत्रीने कारागृहात येऊन सर्व हकीकत सरसेनापतीला सांगितली. सरसेनापतीने राजाला मदत करण्याचे नाकारले. सरसेनापती म्हणाला,मंत्री महोदय, महाराजला माझा एक निरोप दे. राजा स्वःतहून जोपर्यंत माझ्याकडे येऊन मदत मागत नाही, तोपर्यंत मी कुठलीही मदत करणार नाही. 
मंत्रीने सरसेनापतीचा संदेश राजाला सुनावला. राजा क्षणाचा वेळ न घालवता, कारागृहाकडे निघाला. राजाने हात जोडून सरसेनापतीला म्हणाला,राज्याच्या रक्षणासाठी सरसेनापती तुमची आवश्यकता आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांसाठी मी लज्जीत आहे. कृपया राज्यासाठी आपण सरसेनापती पद परत भूषवा. 
सरसेनापती आपल्या कोमळ आवाजात म्हणाला, महाराज या राज्यासाठी, प्रजेसाठी मी सदैव आपले प्राणही देण्यासाठी तयार असतो, चला. 
सरसेनापतीने युद्धासाठी रणनिती अगोदरच आखुन ठेवलेली होती. सर्व सैन्य ठरलेल्या रणनितीनुसार रणभुमीत उतरले होते. सरसेनापतीने पुन्हा एकदा आपल्या कौशल्य आणि रणनितीच्या जोरावर राज्याची शत्रूपासून रक्षण केले होते. 
राजाला आपली चूक लक्षात आली होती. राजाला कळुन चूकले की राज्य राजामुळे नाही,तर सरसेनापतीच्या रणनीतीमुळेच सुरक्षित होते. राजाने अतिरिक्त करचा निर्णय रद्द केला. एवढेच नाही तर आपल्या प्रजेची आणि सरसेनापतीची माफीही मागितली. 
प्रजा आपल्या राजाच्या निर्णयावर खूश झालेली होती. प्रजा परत एकदा आपल्या राजाचा आदर करू लागली होती.
या राज्यात प्रजा पुन्हा सुख-समृद्धीने राहू लागली. राज्याने गमावलेले वैभव पुन्हा मिळवले. राजा प्रजेत जाऊन त्यांची विचारपूस करू लागला. अहंकाराच्या आहारी गेलेला राजा पलात एकदा निर्मळ झाला होता. 
तात्पर्यः “दुसऱ्यांकडुन मान-संम्मान, आदर मिळवायचा असेल तर अगोदर दुसऱ्यांना मान-संम्मान, आदर करायला शिका. स्वताला सिद्ध करण्यासाठी, दुसऱ्यांना कमी लेखू नका.”
आमचा लेख आवडल्यास लाईक,कमेंट आणि शेअर नक्की करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा.

3 thoughts on “दुसऱ्यांकडुन मान-संम्मान पाहीजे असल्यास,दुसऱ्यांना मान-संम्मान देण्यास शिका.”

Leave a Comment

Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. एका वर्षात पाच किंवा अधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांची नावे. कन्या दिवस 2023 साजरा करा आपल्या लाडक्या लेकी सोबत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडिया आणि खेळाडूंची आयसीसी क्रमवारी.
Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Suryakumar Yadav mr360 Biography Top 10 Indian CEO’s in the world इस्रोने चंद्रावर विक्रम, प्रज्ञान पुन्हा सक्रिय करण्याची योजना पुढे ढकलली.