लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day celebration

लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother's day च्या शुभेच्छा mom's day.celebration
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day.celebration
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोनामुळे लाॕकडाऊन असताना मातृदिन कसा साजरा करता येईल? मातृदिन, Mothers day celebration, moms day celebration घरी राहून आईला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही काय करणार? लाॕकडाऊन असल्याने बाहेर जाणे शक्य नसल्याने यावेळी मातृदिन आपल्याला घरीच साजरा करावा लागणार आहे. आईला यावेळी मातृदिनानिमित्त काय भेटवस्तू द्यावी? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. राबराब राबत काम करणाऱ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस विशेष करूया. जी आई सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त आपल्या मुलांचा विचार आणि काळजी करत असते. मुले जेवल्याशिवाय ती स्वःत जेवण करत नाही. तुम्हाला माहीत आहे का, आपण मातृदिन कोणत्या महीन्यात आणि कोणत्या तारखेला साजरा करत असतो.जगभरात मातृदिन मे महीन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात त्यामुळे आपल्या भारत देशातही मातृदिन मे महीन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात. या २०२० वर्षी १० मे ला मातृदिन येत असल्याने आपण आईला न सांगता तिच्यासाठी काहीतरी विशेष केलेच पाहीजे.
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother's day च्या शुभेच्छा mom's day.celebration
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day.celebration
काही करण्याच्या अगोदर आपण आपली आई किती कष्ट करत असते ते बघूया. आपण मात्र आपल्याला जेवण मिळाले म्हणून शांत असतो. वेळ मिळाला तर कधी बघा त्या माऊलीने जेवण केले का नाही? आपल्या घरात सर्वात जास्त आपली काळजी आपली आई करत असते. आपल्या मुलांची भूक भागवल्याशिवाय ती स्वःत जेवण करत नाही. एकवेळ मुलांसाठी उपाशी राहील पण आपल्या मुलांना उपाशी कधीच ठेवणार नाही. घरातील प्रत्येक सदस्य फक्त आॕर्डर सोडत असतो. आपल्याला आपल्या सर्व वस्तू  हातामध्ये पाहीजे असतात. आई म्हणजे प्रेमाचा एक सागर आहे. जसे सागरातील पाणी कितीही घेतले तरी ते कधीही संपत नाही. आईच्या प्रेमाचंही असच काही आहे. तुम्ही आईला कितीही रागावलात, तरीसुद्धा आईचे तुमच्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही.
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother's day च्या शुभेच्छा mom's day.celebration
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day.celebration
तुम्ही नकळतपणे दोन-तीन दिवस, आपली आई किती काम करत असते याचे निरीक्षण करा. खबरदारी म्हणून काळजी घ्या की,तुम्ही निरीक्षण करत आहे हे तुमच्या आईला कळले नाही पाहीजे. तुम्हाला थोडा त्रास होईल, कारण तुम्हाला आता सकाळी लवकर उठावे लागेल. सकाळी उठल्यापासून ती माऊली काय काय काम करत असते हे तुम्हाला लक्षात येईलच. ती आई पहाटेच लवकर झोपेतून जागी झालेली असायची. घरामध्ये सकाळी देवपूजा ती करत असे. आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम असणाऱ्या मुलांना शाळेत जाण्यासाठी उठवत असते. मुलं उठण्यास कंटाळा करत असताना त्यांच्यावर न रागावता, मायेचा हात डोक्यावर ठेवत उठवण्याचा प्रयत्न करने. बाबा मुलांना रागवतील म्हणून आपल्या पिलांना मायेच्या पदराखाली लपवणे. 

लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother's day च्या शुभेच्छा mom's day.celebration
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day.celebration

 आपल्या घरातील सदस्य आणि आपल्या लाडक्या मुलांना जेवणाचा डबा न देता कधीच शाळेत किंवा आॕफीसमध्ये पाठवणार नाही. रात्री झोपत असतानासुद्धा सकाळी मुलांना डब्यामध्ये कोणती भाजी द्यावी याचाच विचार सुरू असतो. मुलांच्या आवडी-नावडीचं खास लक्ष ठेवणारी ती आपली जननी याच विचारात असते की, माझ्या लाडक्यांना जेवण आवडेल ना? मुलांचा आणि बाबांच्या जेवणांचा डबा करण्यासाठी तिची सकाळपासूनच तारामळ उडालेली असायची. मुलांनी शाळेचं अस्तव्यस्त केलेले दप्तर आवरून ठेवणे. मुलांना आग्रहाने विचारपूस करण्याची त्या मातेची सवय. कदाचित आजच्या पिढीतील मुलांना आईचे असं विचारणं आवडणार नाही. मुलांना त्रास झाला नाही पाहीजे म्हणून तुमच्या सर्व वस्तू अगोदरच तुम्हाला मिळतात. स्वयंपाकघरात सकाळची ती पळापळ, घाईघाईनं केलेला स्वयंपाक, सर्वांच्या आवडीचे लक्ष ठेवणे, किती अवघड आहे सर्व. धुणी-भांडी करून जेवण्यासाठी बसणार तोच, मुलांना आज भाजी आवडली असेल का नाही असा प्रश्न उभा असतो. 
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother's day च्या शुभेच्छा mom's day.celebration
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day.celebration

आजकालच्या मुलांना, मुलींना आई शब्दाचा विसर पडत चाललेला आपल्याला दिसत आहे. आजच्या मुलांनी आपल्याच आई-बाबांना आज एक नवीन नाव दिलयं, “म्हातारी अन म्हातारं”. आपल्या आईचा असा अपमान आणि दुसऱ्यांच्या आईंना आईसाहेब, आऊसाहेब म्हणून गौरव. आज थोडासा विचार करा त्या माऊलीला किती त्रास होत असेल. आज ते वयाने आणि शरीराने थकले आहेत. हीच वेळ आपल्या सर्वांवर येणारच आहे. आपल्या मुलांनी आपल्याला अशी वागणूक आपल्याला दिलीतर कसं वाटणार? थोडा विचार करा, या माऊलीला योग्य सन्मान द्या.राबराब राबणारया त्या माऊलीला तुमच्याकडून फक्त दोन प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते. कबाड कष्ट करून आपल्या मुलांना वाढवणारी ह्या माताने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वताचे जगणे सोडले. पंचवीस वर्ष ज्या मुलाला लाडाने वाढवले तो आता त्या माऊलीच्या त्यागाला कर्तव्याचं नाव देतोय.
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother's day च्या शुभेच्छा mom's day.celebration
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day.celebration

 कुठलीही स्त्रीसाठी आई झाल्यानंतर तिची पिल्लंच(मुले) तिच्यासाठी सर्वस्व असतात. आई  आपल्या मुलांचा सांभाळ करताना आपल्या मायेचं प्रतिक दर्शवते आणि तीच माऊली आपल्या मुलांच्या रक्षणासाठी सर्व जगाशी लढायलाही पूढे असते. तुम्ही आज मातृदिन आहे म्हणून एक दिवस तुमच्या आईला शुभेच्छा द्याल. शुभेच्छा देतानाही तुमच्यात स्वार्थ लपलेला असेल. यात स्वार्थ कसला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? फोटो काढुन लगेचच सोशल मिडीयावर पोस्ट करण्यासाठी तुमची धांदल होत असते. फोटो काढा, व्हिडिओ करा आणि शेअरही करा पण तुमच्यात आपल्या आईसाठी मनातून आदर असू द्या. चला तर मग हा मातृदिन,moms day ला सदैव स्मरणात राहील असा साजरा करूया.
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother's day च्या शुभेच्छा mom's day.celebration
लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day.celebration

आजपासून आपण स्वताशीच एक संकल्प करूया. आईला प्रत्येक घरकामात एक छोटीशी मदत दररोज करण्याचा संकल्प करूया. आईसाठी आपण मातृदिनानिमित्त घरी राहूनच काहीतरी भेट देऊ शकतो. आईला आवडणारा पदार्थ आपण बनवू शकतो. आईसाठी होममेड ग्रीटींग कार्ड बनवू शकतो. आईसाठी छान छान चारोळ्या बनवून तिला वाचून दाखवू शकतो. घरातल्या घरात आईवर निबंध स्पर्धा घेऊ शकतो. आईवर छानशी कविता लिहून सर्वांना ऐकवू शकतो. घरातील सर्व सदस्यांना एकत्र करून घरातल्या घरात आईला आवडणारा खेळ खेळू शकतो. आई सकाळी उठण्याच्या अगोदर तुम्ही सर्व तयारी करून ठेवू शकता. आजची परिस्थिती बघता तुम्ही फेसमास्क, सॕनीटायजर आईला देऊ शकता. कोरानाचा वाढता प्रादूर्भाव बघता आपण बाहेर हाॕटेल किंवा रेस्टाॕरंटमध्येही जाऊ शकत नाही. आईच्या आवडीचे जेवण तुम्ही स्वतः बनवा. तुमच्याकडे अजूनही दहा दिवस शिल्लक आहे. तुम्ही या दहा दिवसामध्ये तयारी करू शकता. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोनवर संपर्क करून त्यांची मदत घेऊ शकता.
तुम्ही वेगवेगळ्या रेसीपी बघू शकता. सर्व तयारी करून तुम्ही सहज आईचा आवडता पदार्थ बनवू शकता. आईचा सन्मान करायला शिका. तुम्हाला जगवण्यासाठी ती माऊली क्षणोक्षणी मरत असते. तीने तुमचे पालन-पोषन करण्यासाठी स्वताचे आयुष्य खर्च केलेले असते. तीच्या त्यागाला कर्तव्याची उपमा देऊ नका. “नाही कुठेच सुख आईशिवाय या जगात, किंमत काय या जगण्याला जिथे नाही महत्व आईला.” या जगात ज्यांनी आपल्या आईला गमावले त्यांना विचारा, ते खूश आहेत का? जगातील सर्व संपत्तीही आईची माया आणि प्रेम तुम्हाला देऊ शकत नाही. आपल्या आईला खूश ठेवा. तिच्या डोळ्यांत अश्रू जर असेल तर ते सुखाचे असतील याची काळजी घ्या. मातृदिनानिमित्त आईला शुभेच्छा द्या. आईचा आदर करा.
गगनही झाले ठेंगणे आज,आई या शब्दापूढे,
भल्याभल्यांच्याही झुकल्या माना, या माऊली पूढे.
आशिर्वादरूपी साथ तुझी, नेहमीच आम्हावर राहूदे ,
दमून गेलोय खूप आज, कूशीत तुझ्या जरा नीजू दे.


माते तुझ्या वात्सल्याचा, झरा नेहमी असाच वाहू दे,
मिळते मला शांती इथेचं, तुझ्या पदराखाली मला लपू दे.
झालो आज मोठा जरी मी, तुझ्यासाठी आजही मी लहान,
नदी बनून वाहते तू, भागवते आमची तहान,आई माझी महान.


आमचा लेख आवडल्यास लाईक,कमेंट करा आणि आपल्या मित्रांना,नातेवाईकांना शेअर करा.

Womens Day celebration click to read full article.

1 thought on “लाॕकडाऊन असताना असा साजरा करू मातृ दिवस आणि आईला देऊ Mother’s day च्या शुभेच्छा mom’s day celebration”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?