स्वताच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य ओळखा आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने जगायला शिका.

स्वताला ओळखायला आपण कमी पडत आहोत की काय असे वाटू लागले आहे. अजुनही आपण स्वताला ओळखत नाही. स्वताच्या अंगी असलेल्या गुणांची पारखच आपल्याला करता येत नाही. 
स्वताच्या कौशल्याची जाणीव राहीलेली नाही आणि आपणही जाणुन घेण्यास इच्छुक नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान एक नैसर्गिक गुण किंवा कौशल्य असतेच. आपल्यातच दडून बसलेल्या आपल्या कौशल्याबद्दलच स्वताला माहीती नसते.

https://www.khadedipak.com
छंद जोपासा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आवश्यक नाही की, ते कौशल्य किंवा गुण तुमच्या कामासंदर्भातच असतील. जोपर्यंत आपण त्याचा शोध घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला याची जाणीव होणार नाही. एवढ्या सहजतेनं या कौशल्याची ओळख आपल्याला होणार नाही. 
यासाठी आपल्याला कशात जास्त आवड आहे हे शोधावे लागेल. आपल्यातच एक मोठे कौशल्य लपून बसलेले आहे. आजच्या दगदगीच्या जीवनात आपल्याला आपल्या आवडी-नावडीच्या कामासाठी वेळचं मिळत नाही. असंही म्हणायला आपल्याकडे जागा आहे की, आपण मुद्दामच वेळ द्यायला टाळतो.

https://www.khadedipak.com
छंद जोपासा

विणाकारण आपला अमुल्य वेळ अशा कामासाठी कशासाठी द्यायचा, ज्यापासून आपल्याला काहीच आर्थिक फायदा नाही. आपण एकतर आराम करायला महत्व देत असतो किंवा आॕफीसमधील अर्धवट कामे पूर्ण करत असतो. 
आपण नेहमी प्रत्येक गोष्टींचा विचार हा आर्थिक स्वरूपात बघत असतो. आर्थिक फायदा असेल तरच आपण त्या गोष्टींकडे आपले मन वळवतो. जर आर्थिक फायदाच नसेल तर त्या गोष्टींकडे बघणे तर दूरच पण ऐकण्याचीही आपल्याला इच्छा नसते.

https://www.khadedipak.com
छंद जोपासा

आपल्यातील गुणांना ओळखायला सोडून आपण आज याकडे पाठ करून उभे आहोत. आपल्यातील गुणांना जर तुम्ही आज ओळखले तर तुम्ही उद्या, म्हणजेच भविष्यात निरोगी आणि सुखी जीवन जगू शकाल. 
वेळचे कारण, म्हणजे आपल्याकडे असलेले सर्वात समाधानकारक उत्तर. आज हे काम जास्त असल्यामुळे, मला माझा आवडता छंद जोपासायला वेळच नाही मिळाला. 
वेळ न मिळाल्याचे कारण सांगितले की आपण मोकळे. नाहीतरी मनुष्याला आपली चुक दुसऱ्यांवर थोपवण्यात पटाईत असतात. काहीही झाले तरी आपण, आपल्यातील असलेल्या गुणांकडे लक्षच देणार नाही.

https://www.khadedipak.com
छंद जोपासा आणि निरोगी रहा

खरंतर गुणांची पारख ही लहानांपासुनच व्हायला हवी. गुणांची पारख करण्याची जबाबदारी ही पालकांची आणि शिक्षकांचीच असते. आपल्या पाल्यांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आवडी-नावडी हे फक्त पालकांना आणि शिक्षकांनाच माहीत असते. 
पालक आपल्या भावनांचे अनपेक्षित ओझे या लहान बालकांवर लादत असतात. आपल्या पाल्यांची आवड त्या विषयात आहे की नाही याकडे लक्षच देत नाही. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांतील गुण आणि कौशल्य ओळखुन पालकांना तशा सुचना द्यायला पाहीजे. 
लहान कोवळ्या वयातच जर वेळेवर आपल्या गुणांकडे आणि कौशल्याकडे लक्ष दिल्या गेले तर आपल्याला एक जबाबदार नागरिक जरूर मिळेल.
https://www.khadedipak.com
निरोगी रहा

आपण नेहमीच आपल्यातील गुणांपासून दूर होत जातो. कधी वेळ मिळत नाही म्हणून, तर कधी योग्य मार्गदर्शक मिळत नाही म्हणून . लहानपणापासुन आपण आपल्या आवडी-नावडीबद्दल बोलत नाही. 
ज्या गोष्टींकडे आपले मन रमते, त्यापासून स्वताला दूर ठेवत असतो. लोक काय म्हणतील याविषयीची भिती सतत लागलेली असते. लोक आपल्याला हसतील का? लोक आपली चेष्टा तर करणार नाही ना? 
या मनातील भितीमुळे आपण आपले कौशल्याकडे पाठ फिरवून बसतो. गुण आणि कौशल्य म्हणजे नेमके काय? ते कसे ओळखायला पाहीजे?
गुण आणि कौशल्य हे जरूरी नाही की, आपल्या दैनंदिन कामाशी संबंधित असेल. ते तुमच्या दैनंदिन कामाव्यतिरीक्तही असू शकते. 
तुम्ही तुमचा काही वेळ तुमचे आवडते छंद पूर्ण करण्यासाठी द्या. तुम्हाला जास्त नाही, दिवसातुन कोणत्याही वेळी आपले एक-दोन तास आपले छंद जोपासण्यासाठी द्यायचे आहे. 
छंद कुठलेही असू शकतात जसे की, संगीत ऐकणे, गाणी लिहीणे व गाणे, चित्रपट,कथा.नाटक लिहीणे, रेखाचित्र, पेंटींग करणे, कविता, लेख,पुस्तक लिहीणे, म्युझिकल इंस्ट्रुमेंट वाजविणे, वेगवेगळे पुस्तक वाचणे, फोटोग्राफी करणे, दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी धडपड करणे इ. 
तुम्हाला जर तणावमुक्त, निरोगी जीवन जगण्याची इच्छा असेलच यात काहीच शंका माझ्या मनात नाही. यासाठी तुम्हाला काहीच करायचे नाही. तुमच्या दैनंदिन कामाव्यतिरीक्त फक्त स्वतासाठी तुम्ही दररोज एक-दोन तास काढा. 
या एक-दोन तासात तुमचा आवडता छंद जोपासा. तुमच्या आवडीनुसार ज्यावेळी तुम्ही एखादे काम करत असतात,त्यावेळी तुमचा ताण पुर्णपणे कमी होत जातो. तुमच्यावरील ताण कमी झाल्याने तुम्ही स्वताला तंदुरुस्त झाल्याचे अनुभवता. 
तुमची मानसिक आणि शारिरीक थकान दूर होण्यास मदत होते. यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्हीही ताजे-तवाने असते. कुठल्याही प्रकारचे रोग तुमच्या जवळपासही येत नाही. 
जे लोक छंद नाही जोपासत आणि जे लोक छंद जोपासतात यांच्या शारिरीक आणि मानसिक स्थिती एकमेकांपेक्षा खुप वेगळी असते. छंद न जोपासणारे लोक नेहमी तणावयुक्त जीवन जगत असतात. 
कामाचे ताण, परीवारातील ताण, आरोग्यविषयक समस्या यामुळे उद्भवणारे वेगवेगळे रोग जसे की, रक्तदाब कमी, जास्त होणे, मधूमेह, हृदयविकार. याप्रकारच्या लोकांनी स्वताचा ताण घालवण्यासाठी मद्याच्या आहारी जातात. 
दररोज परिवारात क्लेश वाढत जातात. या लोकांनी आपला ताण घालवण्यासाठी कधीच आपले छंद जोपासले नसतील.
जे लोक आपल्या छंदासाठी दररोज किमान एक-दोन तास देतातच. यामुळे त्यांची शारिरीक आणि मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते. नेहमीच स्वताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. छंद जोपासल्यामुळे स्वताचे मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यास मदत होते. 
रक्तदाब कमी, जास्त होणे, मधूमेह, हृदयविकार यासारखे आजार या व्यक्तींपासून दूरच असतात. या छंदातुनच तुमचे गुण आणि कौशल्याची ओळख तुम्हाला होऊ शकते.
म्हणुनच सांगतो आहे, आपले छंद जोपासायला शिका, त्यातून तुमचे गुण आणि कौशल्य तुमच्या समोर येईल व तुम्हाला निरोगी जीवन जगण्यासाठी मदत होईल.
आमचा लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर की करा, यामुळे आम्हाला नविननविन विषयावर आधारित लेख लिहिण्यास मदत होते.

1 thought on “स्वताच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य ओळखा आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने जगायला शिका.”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?