Best inspiring stories of faith, miracles and hard work true stories in Marathi ! विश्वासाची प्रेरणादायक कथा, चमत्कारी आणि कठोर परिश्रमांची खरी कथा मराठीत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजवर आपण अनेक प्रेरणादायी कथा (inspiring stories) वाचल्या असतील. कथेतून आपल्याला नेहमी एक संदेश मिळत असतो, एक शिकवण मिळत असते. प्रत्येक कथा आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते. काही कथा आपल्याला आपल्याशीच जुळलेल्या भासतात. कथा वाचताना भरपूरदा आपल्याला ही कथा जणू आपल्याचविषयी सांगत आहे असे वाटते.
कथा वाचत असताना त्यातून नेहमीच शिकले पाहीजे. Inspiring stories प्रेरणादायी कथा आपले भाग्य बदलण्यात मदत करू शकतात. कठोर परिश्रम करून आपले नशीब आपण  कसे बदलू शकतो? आज आपण अशीच एक कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
जी वाचत असताना, तुमच्यातील बहुतांश लोकांना ती आपलीच कथा वाटणार आहे. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्र तुम्हीच आहात असे समजून वाचायला सुरूवात करा.
Inspiring stories of faith, miracles and hard work true stories in marathi
Inspiring stories of faith, miracles, and hard work true stories in Marathi 

एका तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होते. त्यांच्या परिवारात एक मुलगा होता. तो मुलगा अत्यंत तेजस्वी आणि हुशार होता. गरीबीमुळे शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असे. 
शाळेची फिस भरणे, पुस्तके ,वही यासाठीच खूप खर्च होऊन जात असे. त्या मुलाचे नाव राम होते. शिक्षणाबरोबरच रामला पोहण्याची (Swimming) आवड होती. रामला swimming मध्ये स्वताचे नाव करायचे होते. 
रामला पाण्याची भितीही वाटत होती. रामच्या वडिलांना पोहणे येत होते हे रामला माहीत होते. रामने एक दिवस हिम्मत करत आपल्या वडिलांना आपल्या इच्छेबद्दल सांगितले. वडिलांना आनंद होताच पण रामच्या भविष्याची काळजीही होती. 
रामच्या वडिलांनी रामला सांगितले की, राम swimming एका छंदापर्यंत ठिक आहे. जीवन जगण्यासाठी एक व्यवसाय किंवा नोकरीच योग्य पर्याय असतो.

Inspiring stories of faith, miracles and hard work true stories in marathi
Inspiring stories of faith, miracles, and hard work true stories in Marathi 
राम हुशार होता पण त्याला swimming ची आवड होती. त्याला स्वःताला सिद्ध करायचं होतं. स्वःताच करीयर त्याला swimming मध्येच दिसत होतं. वडिलांसोबत राम नदीवर जात असत. पाण्यात उतरून बघितल्याशिवाय आपली भिती जाणार नाही हे रामला माहीत होतं.
 रामने हिम्मत दाखवत वडिलांचा हात पकडून नदीत उतरला. वडिलांनी रामला पकडले आणि पोहायचे धडे देऊ लागले.
रामला हळूहळू पाण्याची भिती वाटणे कमी झाले. राम आता एकटाच नदीत उतरला, पोहायला सुरूवात केली. रामच्या मनात पाण्याविषयी भिती उरलेली नव्हती. रामला swimming  मध्ये गोल्ड मेडल मिळवायचे होते. राम दिवसातून तीन-चार तास पोहण्याचा सराव करत असत. 
एक दिवस शहरामध्ये swimming competition पोहण्याची स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा सर्वांसाठीच खुली होती. आपले नाव नोंदवण्यासाठी कुठल्याही प्रकारची फिस द्यायची नव्हती. रामच्या मित्राला रामचे पोहण्याबद्दलचे प्रेम माहीत होते. त्याने रामला न विचारताच रामचे नाव नोंदवले.

Inspiring stories of faith, miracles and hard work true stories in marathi
Inspiring stories of faith, miracles, and hard work true stories in Marathi 

रामचा मित्र गावाकडे येऊन रामला या सर्व प्रकाराबद्दल सांगितले. राम जाण्यास तयार झाला होता. आता राम नदीवर जाऊन अधिक पोहण्याचा सराव करू लागला. स्पर्धेचा दिवस उजाडला होता. पोहण्यासाठी swimming costume ची व्यवस्था रामच्या मित्राने अगोदरच करून ठेवली होती.
शहरातील वेगवेगळ्या शाळेतील, महाविद्यालयातील मुले आपआपल्या प्रशिक्षकाबरोबर आलेली होती. प्रत्येक प्रशिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कानात काहीतरी सांगत होते.
 मी यावेळी डोळे मिटून माझे गुरू, माझे वडिल यांचं स्मरण केलं, आणि नमस्कार घातला. थोड्याच वेळात स्पर्धा सुरू झाली, सर्व स्पर्धकांनी पाण्यात उड्या मारल्या. सर्वजण जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरले होते,मलाही जिंकण्याची ओढ लागली होती.
 नदीच्या पाण्यात घालवलेला अनुभव आज मला कामी येणार होता. आपलं लक्ष मी वेळेच्या आत आणि सर्वांच्या अगोदर पूर्ण केले. याआधी एवढ्या कमी वेळेत हे लक्ष कुणीच पूर्ण केले नव्हते. स्पर्धा संपली, बक्षिस मिळाले आणि आम्ही घरी आलो.

Inspiring stories of faith, miracles and hard work true stories in marathi
Inspiring stories of faith, miracles, and hard work true stories in Marathi 

चार-पाच दिवस निघुन गेले होते. मी परत माझ्या सरावासाठी नदीच्या तीरावर आलो होतो. माझा मित्र एका गृहस्थाला माझ्या भेटीसाठी घेऊन आला होता. ते गृहस्थ खास मलाच भेटण्यासाठी आले आहेत असे माझ्या मित्राने सांगितले. 
मी हळूच पुटपुटलो, मला भेटण्यासाठी , ते कशासाठी? ते गृहस्थ किंचीत गालातल्या गालात हसत म्हणाले, होय राम, मी इथे तुलाच भेटण्यासाठी आलो आहे. माझ्याबरोबर शहरात चल, मी तिथे तुला योग्य ते मार्गदर्शन करील. तुझ्यातील टॕलेंट असे व्यर्थ घालवू नकोस, तुझ्यात असलेले कौशल्य ओळख आणि माझ्याबरोबर चल.
तुझे भाग्य स्वःतच तुझ्याकडे चालून आलेले आहे. मिळालेल्या संधीचं सोनं कर आणि आपल्या कर्तृत्वाचा परिचय दे या जगाला. तुला आज स्वताला सिद्ध करून दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. 
मला खात्रीच नाहीतर पूर्ण विश्वास आहे की,तू एक दिवस स्वःताचे आणि देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये करशील. तुझ्यातील कौशल्याच्या जोरावर तू सुवर्ण पदक मिळवशील. 
Inspiring stories of faith, miracles and hard work true stories in marathi
Inspiring stories of faith, miracles, and hard work true stories in Marathi 
रामला स्वताच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी पहीली पायरी मिळाली होती. रामने क्षणाचाही विचार न करता त्या भल्या गृहस्थाबरोबर शहरात आपली दुसरी इनिंग सुरू करण्यासाठी गेला. 
रामला त्या गृहस्थाच्या रूपात एक उत्तम गुरू आणि मार्गदर्शक मिळाला होता. ते गृहस्थ रामकडून चांगली कसरत करून घेत होते. राम त्यांच्या इतर शिष्यापेक्षा थोडा वेगळा होता.
राम पाच-सहा तास दररोज पाण्यात राहून कसरत करत होता. रामने आतापर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रामची तयारी सुरू झालेली होती. हे सर्व सुरू असताना एक दुर्घटना घडली होती. 
रामचा घरी येत असताना एक अपघात झाला होता. एक हात आणि एका पायाला गंभीर स्वरूपात दुखापत झालेली होती.डाॕक्टरकडे रामला किमान सहा महीने आराम करण्याचा सल्ला दिला होता. एवढेच नाहीतर यापूढे रामला swimming न करण्याचाही सल्ला डाॕक्टरने दिला होता. 
तीन महीन्यावर आंतरराष्ट्रीय स्पर्धा आलेली होती आणि त्यात सहा महीने आराम आणि swimming न करण्याचा डाॕक्टरचा सल्ला. राम अस्वस्थ झाला होता. त्याला काय करावे हे सुचत नव्हते.
Inspiring stories of faith, miracles and hard work true stories in marathi
Inspiring stories of faith, miracles, and hard work true stories in Marathi 

या अपघाताने रामचं आयुष्य बदलून टाकले होते. राम दोन-तीन महीने फक्त विचार करत होता. राम स्वताशीच पुटपुटला, नाही माझं भाग्य मलाच बदलावं लागणार. सर्च देवाच्या भरवशावर सोडून कसे चालणार? 
मला माझं नशीब बदलावच लागणार. यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल. आता रामकडे दोनच पर्याय शिल्लक होते. एक तर घरी बसून आराम करायचा अन दुसरा सर्व वेदना, त्रास बाजूला ठेवून आपले लक्ष गाठायचे. रामने दुसरा पर्याय निवडत सरावास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला.
रामने स्वताला इतरापासुन दूर केलं. जाताना फक्त आपल्या गुरूची भेट आणि आशिर्वाद घेत राम गुरूला म्हणाला की, मी काही दिवस एकांतात जाण्याचा निर्णय घेतला आहे. परत येऊन मला माझ लक्ष साध्य करायचे आहे. 
गुरूला आपल्या शिष्याच्या विश्वासावर विश्वास होता. राम जवळजवळ एक वर्ष कुठे गेला होता हे कुणालाच माहीत नव्हते. रामला फक्त समोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळणारं सुवर्ण पदक दिसत होतं. राम दिवसातून बारा-चौदा तास सराव करत होता. 
Inspiring stories of faith, miracles and hard work true stories in marathi
Inspiring stories of faith, miracles, and hard work true stories in Marathi 

या एक वर्षामध्ये रामचा जवळचा मित्र जर कुणी असेल तर ते  पाणी होते. पाण्यातच कितीतरी तास तो सराव करत असे. राम सरावात एवढा गुंगला की त्याला आपल्या वेदनाही जाणवत नव्हत्या. 
अपघात आणि त्यातून मिळालेली दुखापत यामुळे पहील्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहीलं होतं. यावर्षी नियतीने आपल्याकडे पाठ फिरवल्याने, आपल्याला या स्पर्धेपासून दूर रहावे लागले असे रामला वाटत होते. यातही माझं काहीतरी भलंच असणार असं ही तो स्वताला पटवून देत.
अपघात झाल्यानंतर आणि डाॕक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर राम डगमगला होता पण त्यातून स्वताला सावरण्यासाठी त्याने खूप मेहनतही घेतली होती. रामला एकतर असंच स्वताच्या नशीबावर रडत बसत उरलेलं आयुष्य काढायचं होतं. 
नाहीतर सर्व दुःख बाजूला ठेऊन नव्याने आयुष्याची सुरूवात करत आपले भाग्य स्वःतच ठरवायचे होते. रामने नव्याने पुन्हा एकदा आयुष्याची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला. नव्याने आयुष्याची सुरूवात करण्यासाठी जिद्द,चिकाटी आणि एकाग्रता यावर रामने आपले लक्ष केंद्रित केले.
आपल्याला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन सुवर्ण पदक मिळवायचे होते. अपघात झाल्यावर ज्या जखमामुळे होणाऱ्या वेदना, मानसिक त्रासामुळे होणाऱ्या वेदनेपेक्षा कमीच होत्या. 
सराव करताना रामला फक्त सुवर्ण पदक दिसत होते. रामने आता सराव जास्त कठोर केला होता. कसरत करून आपले हात आणि पाय जे अपघातामुळे कमजोर झाले होते त्यांना परत सशक्त करण्यास भर दिला होता.
रामला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्वःताला शारिरीक चाचणीत पास व्हावे लागणार होते. एक वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर रामला शारिरीक चाचणीचा सामना करायचा होता. शारिरीक चाचणी झाल्यानंतर रामचे नाव यावर्षीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आले नव्हते.
रामला पुन्हा एकृदा अपयशाचा सामना करावा लागला. अपयश मिळाले म्हणुन खचून न जाता रामने स्वताचे आत्मचिंतन करण्याचे ठरवले. आपण कुठे कमी पडलो? आपले कुठे चुकले? यावर जास्त भर दिला. 
विश्वासाची प्रेरणादायक कथा, चमत्कारी आणि कठोर परिश्रमांची खरी कथा मराठीत
विश्वासाची प्रेरणादायक कथा, चमत्कारी आणि कठोर परिश्रमांची खरी कथा मराठीत

आपल्यातील असलेल्या दोषाचा संपूर्णपणे नाश करण्याचा निर्धार रामने केला. स्वताला तंदुरुस्त करण्यासाठी रामला अजुन दोन वर्षाचा वेळ मिळाला होता. रामने पुन्हा सरावासाठी सुरूवात केली होती. रामने स्वःताला कधीच खचू नाही दिले. 
चांगले फळ मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागते. येणाऱ्या स्पर्धेसाठी अनेक स्पर्धक भाग घेतील. सर्व स्पर्धक तंदुरुस्त आणि चपळ असणार हे रामला माहीत होते. यासाठी रामला स्वताला इतर स्पर्धकापेक्षा चपळ बनावे लागणार होते तरच तो स्पर्धेमध्ये टिकू शकणार होता.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वताची पात्रता सिद्ध करण्यासाठी रामला शारिरीक चाचणीला पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार होते. शारिरीक चाचणीला सुरूवात झाली. शारिरीक चाचणीचा परिणाम आला होता यावेळी रामच्या कठोर परिश्रमामुळे राम आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. 
लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सुरूवात होणार होती. रामने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अतुल्य कामगिरी करून सुवर्ण पदक मिळवले.
रामने जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते. आपल्या ध्येयपूर्तीसाठी पूर्ण लक्ष आपल्या सरावावर दिले होते. यश सहजासहजी मिळत नाही हे रामने सिद्ध केले होते. 
यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम हे करावेच लागते. ध्येय गाठल्यानंतर राम थांबला नाही. यानंतरच्या   अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक रामने मिळवले.
विश्वासाची प्रेरणादायक कथा, चमत्कारी आणि कठोर परिश्रमांची खरी कथा मराठीत
विश्वासाची प्रेरणादायक कथा, चमत्कारी आणि कठोर परिश्रमांची खरी कथा मराठीत

तात्पर्यः ध्येय गाठण्यासाठी नशीबावर खापर न फोडता, खचून न जाता, कठोर परिश्रम करणेच योग्य असते हे या कथेतून सिद्ध होते.
आमचा लेख आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.

6 thoughts on “Best inspiring stories of faith, miracles and hard work true stories in Marathi ! विश्वासाची प्रेरणादायक कथा, चमत्कारी आणि कठोर परिश्रमांची खरी कथा मराठीत”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?