कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?

कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  

कोणी विचार केला होता, की येणारे वर्ष आपल्या आयुष्यातील एक वर्ष वाया जाणार होते. स्वप्नातही विचार केला नसेल की, कोरोना नावाचा एक आजार येईल आणि सर्वकाही स्तब्ध होऊन जाईल.  
३१ डिसेंबर २०१९ च्या रात्री आपण सर्वजण येणाऱ्या नववर्षाचे स्वागत जल्लोशाने, आनंदाने आणि ऊत्साहाने साजरा करण्यासाठी जमलो होतो. कुणी घरी बसून टिव्हीवरील वेगवेगळे कार्यक्रम बघून साजरे करण्यात खुश होते.
काहीजण बाहेर जाऊन हाॕटेलमध्ये जाऊन या क्षणाचा आनंद घेत होते. तर कुणी कंपनीत तृतीय पाळीला जाऊन नववर्षाचे स्वागतासाठी ऊत्सूक होते. या शानदार क्षणाला आपण नेहमीच आणि वेळोवेळी छायाचित्रात कैद करून घेण्यासाठी धडपडत असतो. खरचं किती छान दिवस होते ते? 
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  

या ऊत्सहानंतर आपल्या समोर येणारे नविन वर्ष काय संकट घेऊन येणार होते हे तर देवालाच ठाऊक होते. मार्च महिन्यात या महाभयंकर विषाणूची ओळख पटली. “कोरोना विषाणू“, होय खरंच आहे. सुरूवातीला कासवाच्या गतीने या विषाणूने आपले बीज रोवायला सुरुवात केली. 
या विषाणूंची संसर्गाची गती खुपच जलद होती. बघता बघता चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर निघत होती. लोक उपचारासाठी तडफडत होते. चीनने लगेच लाॕकडाऊन करण्याची घोषणा केली. संपुर्ण शहरात शांतता पसरलेली होती. जशीजशी कोरोना विषाणूंची लागण लोकांना होत गेली तशीतशी या विषाणूंची संक्रमित करण्याची गतीही वाढत गेली.
बघताबघता भारतालाही याचा शिरकाव लागला. याअगोदर अमेरिका, इटली सारख्या मजबुत आणि शक्तीशाली देशांना या विषाणूंनी तडाख्यात घेतले होते. वैद्यकीय व्यवस्था सर्वोत्तम असुनसुद्धा या विषाणूंचा नायनाट करता आला नाही. 
तेथील लोक जगाला ओरडून ओरडून सांगत होते, सावधनतेचा इशारा ते आपल्याला देत होते. जी परिस्थिती त्यांनी अनुभवली होती त्याचा अतिशय गंभीर परिणाम ते लोक अनुभवत होते. 
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  

२२ मार्चपासून संपुर्ण भारतभर लाॕकडाऊन करण्याचा निर्णय भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी घेतला. निर्णय कठोर आणि धाडसीच होता पण निर्णयही घेणे महत्त्वपुर्ण होते. गावं, नगर,तालुके,शहरे,जिल्हे आणि राज्ये तत्काळ बंद करण्यात आली. 
संपुर्ण वाहतूक, रेलवे, हवाईसेवा बंद करण्यात आले. एवढेच काय तर मुंबईतसुध्दा कडाक्याचे बंद होती. आज सर्व बंद होते, शाळा,दुकान,मंदिर आणि मस्जिद या सर्व ठिकाणी शुकशुकाट होता. स्वप्नातही ज्या परिस्थितीचा विचार कधी केला नव्हता,मात्र नेमकी तशीच किंवा त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आज या जगावर ओढावलेली होती. 
जो तो आपली आणि परीवाराची काळजी घेण्यासाठी धडपड करत होता. प्रशासनाने वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देत होते. काही लोकांनी ऐकले त्यामुळे ते आज सुरक्षित राहू शकले. ज्यांनी कोणी ऐकले नाही, त्यातील कित्येकजण आज आपल्यात नाही. 

लाॕकडाऊनमुळे सर्वकाही बंद:

कोणत्याही आजाराचा वाढता प्रादूर्भाव बघता, सरकारला संपूर्ण देशाला लाॕकडाऊन करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घ्यावाच लागतो. आज जगात कोविड १९ ने जे थैमान घातलेले आपण पाहत आहे. 
जवळजवळ अनेक देशांनी, देश संपूर्णपणे लाॕकडाऊन केलेला आहे. या आजाराचा संसर्ग एवढ्या झपाट्याने वाढत आहे की, लाॕकडाऊन शिवाय दूसरा कुठला योग्य पर्यायही दिसत नाही. आज जगामध्ये जवळजवळ ११ करोडहून जास्त व्यक्तींना या आजाराचा संसर्ग झालेला असून १० लाखापेक्षा जास्त व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहे. 
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  

या आजाराचे गांभिर्य असे आहे की,रूग्णांची संख्या एवढ्या जास्त प्रमाणात आहेत की, त्यांच्यावर उपचारासाठी पुरेशे हाॕस्पीटल,मनुष्यबळ आणि उपकरणेही नाहीत. अतिशय गंभीर स्थितीमध्ये असलेल्या रूग्णांना पुरेशे वेंटीलेटर(कृत्रिम श्वास घेण्यासाठी लागणारं उपकरण) नाहीत. 
एवढी गंभीर स्थितीत आपल्याला यायचे नसेल तर वेळेआधीच लाॕकडाऊन करणं गरजेचं आहे आणि आवश्यकसुद्धा आहे. एक संसर्गजन्य आजाराचा संसर्ग सुरूवातीस कमी प्रमाणात जाणवतो, दिवसेंदिवस या आजाराचा संसर्ग एवढ्या झपाट्याने वाढतो की, काय करावे हेच सुचत नाही. 
असंख्य रूग्णांना कशाप्रकारे उपचार करावा हाच गंभीर प्रश्न उभा राहतो. रूग्णांना उपचारासाठी हाॕस्पीटल कमी पडायला सुरूवात होत जाते. बघता बघता परिस्थिती एवढी हाथाबाहेर निघुन जाते की, त्यावर पुन्हा लवकर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. 
अशी महाभयंकर परिस्थिती आपल्यावर ओढावली न जावी यासाठी देशव्यापी लाॕकडाऊन हाच एकमात्र उपाय दिसतो. लाॕकडाऊनचा अर्थ अजुन काही लोकांना कळलेला दिसत नाही. लाॕकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्वकाही बंद असणे आवश्यक असते तरच लाॕकडाऊन यशस्वी होऊ शकते. 
लाॕकडाऊन करने म्हणजे कोणताही आजाराचा संसर्ग होण्यापासून जनतेला घरातच राहण्यासाठी सांगणे. जर कुणीही या लाॕकडाऊन चा नियम पाळला नाही तर, याचा काहीच फायदा होणार नाही. लाॕकडाऊनमध्ये घराबाहेर पडणे टाळलेच पाहीजे. 

शाळा, महाविद्यालय, दुकाने बंद:

कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  

कोरोनाच्या या लाटेसमोर आपण सर्वजण हतबल झालेलो आहे. नुसते शहर,गाव आणि राज्यच नाहीतर सर्व देशातील शाळा, महाविद्यालये आणि दुकानेसुध्दा बंद आहेत.  शाळा आणि महाविद्यालयांनी यावर उपाय शोधून आॕनलाईन शिक्षण सुरू केले आहे. 
आॕनलाईन शिक्षण या प्रणालीला कितपत यश मिळेल हे तर आता वेळच सांगू शकेल. एक नक्कीच आहे कोरोनामुळे शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परीणाम झालेला आहे.

सर्व देवालय बंद:

कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?

शिक्षणक्षेत्राबरोबरच कोरोनाने सर्व देवालयेसुध्दा बंद करायला भाग पाडलेले आहे. देवालयात मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. भाविक आपल्या आराध्यावर श्रध्दा ठेवुन दर्शनासाठी येत असतात. कोरोना वायरस हा संसर्गजन्य आजार असल्याने मोठी हानी होऊ शकते. 
पुढील वाढणारे संकट कमी करण्यासाठी सर्व देवालये बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. लोक मोठ्या श्रध्देने देवालयात जात असतात पण कोरोनाने यासाठी भक्तांच्याही पायात साखळदंडाने बांधले आहे.

कोरोनामुळे रोजगार कसा कमी झाला?

कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  

कोरोनामुळे रोजगारावर मोठ्या प्रमाणावर आघात केला आहे. कमीतकमी संख्याबळावर काम करण्याच्या अटीवर अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली असल्याने बरेचशे कर्मचारी हे घरी बसुन आहेत. 
बरेचशे कारखाने बंद आहेत,उत्पादन बंद असल्याने कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नसल्याने काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलेले आहे. आपल्यापैकी बरेच लोक आज बेरोजगार झालेले आहेत. 
यामुळे परिवारातील सदस्यांना प्राथमिक सुविधा देण्यास कुटुंबप्रमुख असमर्थ झालेले आहेत. लवकरच यावर योग्य उपाय निघाला नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल.

लाॕकडाऊन आणि अर्थ व्यवस्थेवर परीमणाम:

कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लाॕकडाऊन करावेच लागणार आहे हे निश्चित होते. लाॕकडाऊनमुळे असंख्य औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. सर्वत्र फक्त नुकसानच नुकसान दिसत आहे. 
अनेक मोठ्या उद्योजकांनी देशहितासाठी, मानवतेच्या भल्यासाठी स्वताचे अब्जो रूपयांचे नुकसान सहन करण्यासाठी प्राधान्य दिले आहेत. त्यांची मनापासून जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. याशिवाय, आपले कारखाने बंद ठेवण्या व्यतिरिक्त सरकारला मदतीसाठी हाथ ही पूढे केला आहे. 
आर्थिक मदत, वेंटीलेटर बनवण्यासाठी मदत, गरीब जनतेला दैनंदिन जीवनापयोगी सामग्रीचे वाटप करण्यासाठी सहकार्य करत आहे. येणाऱ्या आर्थिक संकंटालाही आपल्याला सामोरे जावे लागणार आहे यात काही शंका नाही.
कोविड १९ मुळे देशाचीच नाहीतर जगाचीही आर्थिक परिस्थितीमध्ये खूप मोठं संकट येणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. मोठ्या उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घर बसल्या पूर्ण वेतन देत आहेत. 
आज संपूर्ण कारोभार बंद असताना वेतन देत आहेत. लाॕकडाऊनमुळे जागतिक आर्थिक संकट या रूपाने जगावर नविन समस्याला सामोरे जावे लागणार आहे.

कोरोनाला साधारण फ्लू समजू नका:

कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?
कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?  

कोरोनाचे विषाणू सापडले आणि तुम्ही एखाद्या मोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचा जर विचार करत असेल तर एवढच समजून घ्या. हे ऐवढे सोपे नाही. खर्चिक तर आहेच पण वेदनादायकही आहे. तुम्ही म्हनाल वेदना कशल्या? तुम्हाला स्वताला दहा दिवस परीवारातील सदस्यापासून दूर जावे लागते. 
त्यांनंतर तुमच्यात असलेल्या विषाणूंचा प्रादूर्भाव जर तुमच्या घरातील सदस्याला संक्रमित केले असेल तर त्या सदस्यालासुद्धा दहा दिवस कुणालाही भेटता येत नाही. मग सुरू होतो मानसिक त्रास, वेदना आणि बरेच काही.
आपल्याला लेख आवडल्यास टिप्पणीद्वारे जरूर कळवावे आणि जास्तीतजास्त शेअर करा.
कोरोनाविषयी अजुन लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

5 thoughts on “कोरोनामुळे (Covid-19)आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले? असं आपल्याला वाटतं ?”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?