वडिलांचे प्रेम(My Fathers love) समजण्यास आपण कमी पडतो असं नाही का वाटत तुम्हाला?

वडिलांचे प्रेम ( My Fathers love) समजण्यास आपण कमी पडतो असं नाही का वाटत तुम्हाला? मला विचाराल तर याचं उत्तर मी होकारार्थीच देईल. आज आपण आपल्या सर्व सुख-सुविधा अनुभवत आहोत, कुणामुळे? कधी विचार करुन बघा, उत्तर नक्की मिळेल. आईची माया, आईचे प्रेम, आईची उदारता हे तर आपण नेहमीच म्हणत आलो आहोत. काही लिहायची वेळ आलीच तर आपल्याला फक्त आईच आठवते. चांगलेच आहे पण यात तुमचे वडिल कुठे हरवलेत याचा विचार केलाय कधी? नक्कीच नाही. आपल्या लेकरांवर माया करणारी आई आपल्याला आठवते पण याच लेकरांसाठी दिवस-रात्र राबराब राबणारे वडिलांना का विसरुन जातो आपण?
my father, father's love, dad love
वडिलांचे प्रेम ( My Fathers love) समजण्यास आपण कमी पडतो असं नाही का वाटत तुम्हाला? 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


आईची माया,आईच्या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही हे मलाही मान्य आहे पण काय वडिलांच्या प्रेमाचं (Dad’s love) काहीच नाही. आई आपल्या लेकरांजवळ राहुन त्यांना आपले प्रेम देत असते. याच लेकरांच्या आयुष्यात सुख पदरात घालण्यासाठी वडिल (My Father) दूर राहुन राबत असतात. आईसारखं प्रेम जरी ते करू शकत नसतील, तरी आईपेक्षा काकणभर जास्तच प्रेम ते आपल्या लेकरांवर करत असतात. वडिलांना आपले प्रेम शब्दात किंवा वागण्यात दाखवता येत नाही याचा अर्थ ते आपल्या मुलांवर प्रेम करत नाही असा होत नाही. काही वडिलांना आपल्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही याचाच अर्थ ते आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी परिस्थितीशी लढत असतात, पण आपण त्यांना चुकीचे ठरवत असतो.

my father,ignorance to father love,father and son,dad and son love
वडिलांचे प्रेम ( My Fathers love) समजण्यास आपण कमी पडतो असं नाही का वाटत तुम्हाला? 


आजही आपल्याला माहीत आहे, कुठल्याही शालेय स्पर्धा, सामाजिक आणि सार्वजनिक ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा, या स्पर्धांचे विषयातील आवडता आणि ठरलेला विषय असतो तो निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यात आपण आई विषयी जास्तीत जास्त स्पर्धा घेत असतो. वडिल या विषयावर काही तरी स्पर्धा आयोजित करण्याचाही विचार आयोजकांच्या मनात येत नाही. का बरं येत नसावा? आपल्या आयुष्यासाठी स्वताचं आयुष्य त्यांनी खर्च केलेलं असतं आणि आपण त्यांच्या या उपकाराला, आपण जबाबदारी या शब्दाने मोजत असतो. बहुतांश वडिलांना आपलं प्रेम व्यक्त करता येत नसते. आज आपल्याला हवी असलेली वस्तू आपल्याला कशी काय मिळते? कोण देणार, वडिलच. वडिलांना आपल्या मुलांच्या सर्व गरजा कळत असतात. याच गरजा पुरवताना कधीकधी उशीरही होतो,पण आपली इच्छा पुर्ण होणार हे नक्कीच.
dad love,my father,ignorance to father love, father is real hero,
वडिलांचे प्रेम ( My Fathers love) समजण्यास आपण कमी पडतो असं नाही का वाटत तुम्हाला? 


आपल्या मुलांच्या इच्छापुर्तीसाठी प्रत्येक वडिल दिवस-रात्र राबराब राबत असतात,पण आपल्याला त्यांच्या मेहनतीची जाणीवही नसते. जाणीव असुनसुद्धा किंमत नसते असंही म्हटले तर हरकत नाही. आपल्या सर्व इच्छा आपल्या वडिलांच्याच जीवावर होत असतात. बापाची किंमत बाप झाल्याशिवाय कळत नाही हे पण तेवढेच खरे आहे. आपलं नाव देखील वडिलांच्या नावाशिवाय पुर्ण होत नाही. आजकालची मुले थोडं काय शिकली की,लगेच आपल्याच वडिलांना शिकायला निघतात. आपण एक गोष्ट नक्कीच विसरलो आहोत ती म्हणजे, ज्या व्यक्तिने आपलं अख्खं आयुष्य आपल्या मुलांसाठी झिजवलेलं असतं त्याच व्यक्तिला समजण्यास आपण कुठेतरी कमी पडलो. 
my father, father love,dad love, father's day, gift for best father
वडिलांचे प्रेम ( My Fathers love) समजण्यास आपण कमी पडतो असं नाही का वाटत तुम्हाला? 


आपल्याला आपल्या वडिलांबरोबर वेळ घालवायला मिळत नसल्याने आपण आपल्या मनातील गोष्ट वडिलांना न सांगता आईला सांगत असतो. आपल्याला वेळ देण्यास काही वडिलांना शक्य होत नसेल तर आपण त्यांना समजुन घ्यायला हवे. जर आज ते आपल्याला जास्त वेळ देतील तर त्यांना आपले घर चालवणेही अवघड होईल. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांचे वडिल नक्कीच आपला वेळ आपल्या परिवाराला देत असतात. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असते त्यांना तर नियोजीत काम करुनसुद्धा बहुतांशवेळी अतिरिक्त काम करावे लागते. घर चालवणे, मुलांचे शिक्षण,लग्न आणि मुलांच्या गरजा भागवणं एवढे मोठे ओझे डोक्यावर असतानासुद्धा चेहऱ्यावर मात्र नेहमीच एक स्मितहास्य असते. प्रत्येक वडिल(My Father) एक चांगलेच अभिनेता असतात. असंख्य समस्या असुनसुद्धा खुश असल्याचे दाखवत असतात.
जर मुलांची इच्छा मेडीकलसाठी ॲडमिशन घेण्यासाठी असेल तर,आपले ॲडमिशन होऊनच जाते, काय बरोबर ना? कधी विचार केलाय की, आर्थिक परिस्थिती नाजुक असताना तुम्हाला मेडीकल, इंजिनियरींगसाठी ॲडमिशन कसे मिळाले? हेच आपले वडिल आपली फिस भरण्यासाठी , आपले भविष्य घडवण्यासाठी राबराब राबताय. मेहनत करुन, आपला घाम गाळुन, एक-एक पैसा जमवलेला असतो. कुणाकडुन तरी व्याजाने पैशे आणुन आपल्या झोळीत टाकलेले असते. आपल्याला काय त्या पैशाचं मोल कळणार? पैशे कमावण्यासाठी स्वताला झिजवावे लागते, परिवारापासून दुर व्हावे लागते. सर्व दुःखाचे डोंगर हे फक्त वडिलांच्याच वाट्याला येते, कारण स्वताच्या वाट्याला आलेलं सुख तर त्यांनी आपल्या मुलांच्या वाट्याला दिलेले असते.
ज्यावेळी तुम्हाला त्यांच्या आधाराची गरज असते त्यावेळी तुमच्यामागे खंबीरपणे उभे राहतात ते आपले वडिल असतात. नेमकं त्यांच्या म्हातारपणी त्यांना आपल्या आधाराची गरज असते आणि आपण त्यावेळी त्यांच्याकडे पाठ फिरवतो. त्यांच्या उपकाराला जबाबदारीचे नाव देऊन मोकळे होतो. आज मुलांना आपल्यापेक्षा जास्त कमावताना पाहुन वडिलच सर्वात जास्त खुश होतात. आपण कितीही कमावलं तरी आपण आपल्या कमाईने फक्त आपल्या गरजाच भागवू शकतो कारण मजा तर फक्त बापाच्याच पैशावर होते ही म्हणही तेवढीच खरी आहे.
आपल्यासाठी आणि परिवारासाठी आपल्या वडिलांनी किती मेहनत घेतली आहे. काय काय सोसले आहे? हे आपल्याच वडिलांना एकदातरी विचारा. त्यांचा अनुभव ऐकताना तुमच्या डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासाठी स्वताचे आयुष्य खर्चुनसुध्दा तुमच्याकडुन त्यांना काहीच नकोय. त्यांना तुमच्याकडुन हवयं फक्त दोन शब्द प्रेमाचे.
आमचा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटद्वारे आपले मतही आपण देऊ शकता.

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?