विमा(Insurance)करुन घेणे खरच एवढे महत्वाचे आहे का? कोणकोणते प्रकारचे विमा (Types of Insurance) आपण घेऊ शकतो?

विमा(Insurance)करुन घेणे खरच एवढे महत्वाचे आहे का? कोणकोणते प्रकारचे विमा (Types of Insurance) आपण घेऊ शकतो?

विमा (Insurance) करुन घेणे खरच एवढे महत्वाचे आहे का? होय, विमा करुन घेणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपुर्ण आहे. आज आपल्याला भरपुर विमा कंपनी (Insurance companies) आपले नविननविन प्रोडक्ट (insurance policy plan) विकण्यासाठी बाजारात उपलब्ध आहे. 
विमा काढणे म्हणजेच आपल्यानंतरही आपल्या परिवाराची काळजी घेणे. वेगवेगळ्या प्रकारचे विमा आपण उतरवु शकतै. आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल. आपल्यासाठी कोणकोणते प्रकारचे विमा (Types of Insurance) आपण घेऊ शकतो? कोणत्या कंपनीचा विमा आपल्यासाठी चांगला असेल? कमीतकमी प्रिमियममध्ये जास्तीतजास्त सुविधा कोणती विमा कंपनी देते?
car insurance,insurance, geico insurance
विमा(Insurance)करुन घेणे खरच एवढे महत्वाचे आहे का? कोणकोणते प्रकारचे विमा (Types of Insurance) आपण घेऊ शकतो?

आज बाजारात भरपुर विमा कंपन्यामध्ये (Insurance companies) ग्राहक आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. खाजगी असो वा मग सरकारी विमा कंपनी ग्राहकांसाठी एकापेक्षा एक चांगले प्रोडक्टस घेऊन येत आहे. 
यामध्ये जीवन विमा(Life Insurance),आरोग्य विमा(Health Insurance), कार विमा(Car Insurance), टर्म विमा(Term Insurance), मोबाईल विमा(Mobile Insurance), प्राॕपर्टी विमा (Property Insurance), ट्रावेलिंग विमा(Travelling Insurance), आणि बरेच प्रकारच्या विमा आहेत. 
वस्तू,घर,बंगला,आपले जीवन,दुकान यासर्वांचा विमा काढता येतो. भरपुर कंपनीने जाहीराती देऊन आपल्या विमा कंपनी आणि सेवाबद्दल माहीती देत आहे.
विमा(Insurance) कोणी आणि कशासाठी काढला पाहीजे असाही एक प्रश्न आपल्याला पडतोच,नाहीका? नुकतेच लग्न झालेल्यांनी, नोकरी करणाऱ्यांनी, काढणाऱ्या व्यक्तीचे वय कमी असेल तर प्रिमियममध्ये सूट मिळते.
आज कधी काय होईल याचा नेम नाही. आपण एक जबाबदार व्यक्ति असल्याने आपल्यावर अवलंबून राहणारे सदस्यही आहेत. विचार करुन बघा, तुमच्या अचानक जाण्याने तुमच्यावर अवलंबून असलेल्या परिवारातील सदस्यांना आर्थिकदृष्ट्या किती त्रास होईल. 
जर एक विमा काढलेला असेल तर तुमच्या परिवाराला एक आर्थिक आधार मिळेल. यासाठी विमा  आपल्यासाठी आणि परिवारासाठी महत्वाचेच आहे. तुम्ही नसतांनीसुध्दा, तुम्ही आज घेतलेल्या योग्य निर्णयामुळेच उद्या तुमचा परिवारास आर्थिक समस्या येणार नाही.
health insurance, life insurance, insurance companies

विमा(Insurance)करुन घेणे खरच एवढे महत्वाचे आहे का? कोणकोणते प्रकारचे विमा (Types of Insurance) आपण घेऊ शकतो?

आरोग्य विमा (Health Insurance): 

आज प्रत्येकांने स्वताचा तसेच कुटुंबातील सदस्यांचा आरोग्य विमा (Health Insurance) काढायलाच हवा. कुणाचे आरोग्य कधी खराब होईल हे सांगता येत नाही. रुग्णालयात होणारा खर्च सर्वांनाच पेलल्या जाईल असं नसतं. रुग्णालयात होणारा खर्च हा आवाक्याच्या बाहेर असतो. 
पैशासाठी कुणासमोर तरी हाथ पसरावे लागतात. वर्षाला थोडा खर्च होईल, प्रिमियम भरण्यासाठी पण भविष्यात रुग्णालयातील खर्चामुळे कुठलाही त्रास होणार नाही. सर्वसाधारणतः आपण अतिआत्मविश्वासाने वावरत असतो. मला काही होणार नाही उगाच प्रिमियम भरून पैसे कशाला खर्च करायचा. 
याप्रकारची विचारसरणी ठेवुन आपपण वावरत असतो. आज कोरोना महामारीपुढे सर्व जगाने हाथ टेकले हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कुणाला माहीत होते की,कोरोनासारखी महामारीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. 
कोरोनाचा उपचाराचा दररोजचा किमान खर्च रु सात ते दहा हजार येतो. किमान दहा दिवस रुग्णालयात रहावे लागते. एवढा खर्च वेळेवर कुठुन देणार, विचार करुन बघा. याचवेळी आरोग्य विमा (Health Insurance) केलेला असता तर आपले किती रुपये वाचले असते. आरोग्य विमा तर प्रत्येकांने काढुन घ्यायलाच पाहीजे. 
health insurance,insurance,type of insurance,car insurance
विमा(Insurance)करुन घेणे खरच एवढे महत्वाचे आहे का? कोणकोणते प्रकारचे विमा (Types of Insurance) आपण घेऊ शकतो?

जीवन विमा(Life Insurance):

जीवन विमा(Life Insurance) आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी खुप महत्त्वपुर्ण आहे याचे कारण असे की, एका व्यक्तिवर किमान तीन-चार सदस्य अवलंबून असतात. कर्ता सदस्याचे जर काही कारणांने मृत्यु झाला आणि त्याने कुठल्याही प्रकारचा विमा केलेला नसेल तर अडचण कुटुंबातील सदस्यांना येत असते. 
आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अजुनच वाईट होत चालते. जर या व्यक्तिने जीवन विमा काढलेला असता तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना एक आर्थिक मदत मिळालेली असती. मुलांचे शिक्षण आणि लग्न झाले असते. 
आपल्यानंतरही आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी आपल्यालाच घ्यायची असते हे लक्षात असू द्या. टर्म विमा (Term Insurance), आपल्या मृत्युनंतर आपल्या कुटुंबाची काळजी घेत असते. Term Insurance निवडतानी आपल्याला किती वर्षाचा पाहीजे हे ठरवुन घ्या. 
कमीतकमी प्रिमियममध्ये चांगले फायदे देणारी कंपनीचाच विम्याची  (Insurance companies) निवड करावी.

insurance,health insurance,importance of insurance, insurance plan, insurance companies,term insurance

कार विमा(Car Insurance)/Auto car insurance:

कार विमा(Car Insurance/Auto car Insurance), यामध्ये ही भरपुर प्रकार असतात. कार विमा Car Insurance सर्व कार धारकाकडे असणं आवश्यक तथा बंधनकारक आहे. विमा असल्याने कारचा अपघात झाला आणि कारचे नुकसानही झाले असेल तर विमा कंपनी क्लेम पास करुन आपली तसेच समोरील व्यक्तिची नुकसान भरपाई करुन देतात. 

car insurance, car insurance plan,online car insurance,insurance policy,auto car insurance
विमा(Insurance)करुन घेणे खरच एवढे महत्वाचे आहे का? कोणकोणते प्रकारचे विमा (Types of Insurance) आपण घेऊ शकतो?

मोबाईल विमा (Mobile Insurance)

मोबाईल विमा (Mobile Insurance) यासाठी काढावा,जर आपण एखादा महाग मोबाईल खरेदी केला असेल तर तो कधीही खराब होऊ शकतो, एखाद्या अपघातामुळे स्क्रीन खराब होऊ शकते किंवा मोबाईल चोरीही होऊ शकतो. आपल्याकडे मोबाईल विमा(Mobile Insurance) असेल तर विमा कंपनी आपले नुकसान भरपाई करुन देत असते.

ट्रावेलिंग विमा(Travelling Insurance)

आपण कधी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करत असेर आपण ट्रावेलिंग विमा(Travelling Insurance) जरूर काढायला पाहीजे. लगेज चोरी,पासपोर्ट हरवणे, फ्लाईट डिले यामुळे होणारे नुकसान विमा कंपनी आपल्याला देत असते.
यासाठी विमा(Insurance)करुन घेणे खरच महत्वाचे आहे. यामुळेच आपल्याला भविष्याचा विचार करता येतो. विमा करुन घेणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपुर्ण आहे पण विमा करताना कंपनीचा रेकाॕर्ड, क्लेम सेटलमेंट रेशिओ, सर्व्हिस आणि कमीतकमी प्रिमियम यासर्व बाबींचा विचार नक्कीच करावा. आजच आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षितेसाठी एक पाऊल पुढे टाका.
आमचा लेख आवडल्यास आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रांना नक्कीच शेअर करा.

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?