Gangaputra Pitamah Bhishma मी गंगापुत्र भीष्म

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण जाणून घेऊयात महाभारतातील महानायक, परशुराम शिष्य, Gangaputra Pitamah Bhishmaगंगापुत्र भीष्म यांच्या जिवनचरित्राबद्दल,त्यांना जिवनामध्ये किती असह्य वेदना सहन कराव्या लागल्या असतील. या लेखात गंगापुत्र भीष्म यांच्या मनामध्ये किती भयंकर युद्ध चालू होते ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग वाचूया “मी भीष्म”.

मी गंगापुत्र देवव्रत भीष्म, मी पीतामाह भीष्म, शांतनुपुत्र भीष्म,मी परशुराम शिष्य भीष्म,होय, मीच तो गंगापुत्र भीष्म ज्याला इच्छामृत्युचे वरदान मिळालेले होते,हस्तिनापूरची संरक्षण करणारी अभेद्य भिंत म्हणून ओळख असलेला भीष्म ही मीच, तोच हस्तिनापूरचा दास, सेवक आणि सरसेनापती भीष्म, आजीवन धर्माचे पालन व ब्रह्मचर्याची प्रतिज्ञाचे पालन करणारा भीष्म ही मीच,तोच मी भीष्म ज्याने आपल्या कुळाचा शेवटही पाहीला.

या युगातील सर्वात भयंकर युद्ध माझ्याच वाट्याला का? का ईश्वराने या युद्धासाठी माझ्या कुळाची निवड केली? का एवढा विंध्वंस या कूरूच्या पवित्र धरतीवर घडवून आणले.? का?.

Gangaputra Pitamah Bhishma
Image Source: Bhaskar ! Gangaputra Pitamah Bhishma


या युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान जर कुणाचे झाले असेल तर ते माझेच असणार यात मला तिळमात्रही शंका नाही.स्वताच्या परिवाराचा शेवट होताना मला स्पष्ट दिसत होते, आणि या सर्वांना मी स्वतःला जबाबदार मानतो,जर योग्य वेळीच सर्व घडणाऱ्या घटनांना आवर घातला असता तर कदाचित आज हा दिवस मला बघायला मिळाला नसता.

ज्या कूरूकुलाच्या पिढीच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर होती त्यांचेच रक्त सांडत असताना पाहुन मला खुप त्रास होत आहे. हस्तिनापूरच्या ज्या सिंहासनासाठी मी इतिहासातील सर्वात भीषण प्रतिज्ञा केली त्याचाच पश्चाताप आज मला होत आहे.

इच्छामृत्युचे वरदान आज माझ्यासाठी अभिशाप वाटत आहे. पांडूपूत्र पांडव व धृतराष्ट्रपूत्र यांच्यात अपमान व प्रतिशोध एवढ्या टोकाला गेला होता की,त्याचाच परिणाम म्हणजेच हे महाप्रलयकारी,महाविनाशक असे महाभारताचे युद्ध.


पांडवांनी आपल्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी केलेल्या प्रतिज्ञा आजही माझ्या कानात स्पष्टपणे ऐकू येत आहे. केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी प्राण गेले तरी काही चुकीचे नाही अशी भावना त्यांची होती. मलाही माहीत होते काहीही झाले तरी पांडव आपली प्रतिज्ञा पुर्ण करतीलच.

Gangaputra Pitamah Bhishma


आज मी अशा स्थितीमध्ये तुम्हाला महाभारतातील घडलेल्या घटना सांगतोय की,मी स्वतः मृत्युच्या वाटेवर आहे. आज मी स्वइच्छेने शरीराचा कुठलाच अवयव हलवू शकत नाही. धारदार आणि  तिक्ष्ण असंख्य बाण माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून आरपार रूतलेले आहे,असंख्य बाणाच्या शय्येवर शेवटच्या क्षणी पडून आहे.शरीरातून फक्त रक्तच रक्त ओसंडून वाहत आहे.

अधर्माच्या बाजूने उभा राहिल्याची शिक्षा आज मला मिळत आहे. निळेभोर आकाशाकडे फक्त माझी नजर फिरत आहे, माझ्या अवतीभवती सहस्त्र सैनिकांनी आपले प्राण गमावले,तरा कुणाचा हाथ,कुणाचा पाय आपल्या शरीरापासून वेगळे झालेले होते, सर्वत्र रक्तच रक्त दिसत होते.

युद्धामध्ये गतप्राण झालेल्या सैनिकांच्या घरच्यांचे ओरडणे व  रडण्याचा आवाज कानामध्ये स्पष्टपणे ऐकू येत होते.

सहस्त्रच्या संख्येने सैनिक आपल्या राजाला विजय मिळवुन देण्यासाठी गतप्राण झालेले होते व सहस्त्रच्या संख्येने आपल्या राजाला विजय मिळवुन द्यायला मृत्युच्या समोर जायला तयार होते. आज ही कुरूक्षेत्राची धरती लालसर झालेली होती, होणार का नाही? ही धरा अशा कित्येक शूरवीर सैनिकांच्या रक्ताने भिजलेली होती. अजूनही या धरेची तहान भागलेली दिसत नाही असे दिसत आहे.

या युद्धामुळे कितीतरी स्त्रिया विधवा झाल्या होत्या, कितीतरी लहान मुलांचे पितृछाया हरवलेली होती, लहानचे मोठे करून लाडाने वाढवलेल्या त्या सैनिकांच्या माता आज मला प्रश्न करताना दिसत आहे. माझ्या शरीरात आरपार  रूतलेल्या तिक्ष्ण,धारदार बाणांमुळे मला जेवढा त्रास होत नाहीये तेवढा त्रास या युद्धामुळे गतप्राण झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचे दुख बघुन मला होत आहे. 


राजघराण्यात सिंहासनासाठी भावंडामध्ये एकमेकांच्या विरूध्द विष कालावले जाऊ नये म्हणून माझ्या वडिलांचीही इच्छा नसताना मी या युगातील सर्वात भिषण प्रतिज्ञा केली होती, ती काय हे सर्व दृष्य बघण्यासाठी ,छेछे कधीच नाही, यासाठी तर मी प्रतिज्ञा मुळीच केली नव्हती.

हस्तिनापूरमध्ये कुरूंच्या या पवित्र  सिंहासनावर  सामर्थ्य व धर्म एकसोबतच स्थिर व्हावेत एवढी इच्छा करणे हे तर चुकीचे असू शकत नाही ना?. मलाही राज्य सांभाळायचे होते त्यासाठी आवश्यक ते निर्णय ही मलाच घ्यायचे होते.

जोवर हस्तिनापूरला पूर्णवेळ सम्राट मिळत नाही तोवर राज्य चालवण्याची जबाबदारी ही माझीच होती. काही कालावधी गेल्यानंतर धृतराष्ट्र हस्तिनापूरचा नविन सम्राट बनले. व मी माझ्या  प्रतिज्ञेनुसार सम्राटचा सेवक म्हणून काम करणार होतो, सम्राटचा निर्णय हा माझ्यासाठी आज्ञा होती

.
आज ही भावंडे एकमेकांवर सपासप वार करत आहे, यांनी एकमेकांवर जरी वार केले असले तरी त्यांच्या एक अन एक वारामुळे माझ्या हृदयाला जखमा होत होत्या हे ही तेवढेच खरे आहे.एकमेकांना ठार करणे एवढेच एक लक्ष त्यांचे राहीले होते.माझ्या सांगण्यावरून एक महान योद्धा या युद्धापासून आजवर दूर होता, आता उद्यापासून या कुरूक्षेत्रावर तो त्याचा परिचय करून देईल. ज्येष्ठ कौंत्येय, सूर्यपुत्र महारथी अंगराज कर्ण.

गंगापुत्र भीष्म

माझ्या मनात हे एक रहस्य मी लपवून ठेवलेले होते की कर्ण हा पांडवांचा ज्येष्ठ आहे. हे जर कदाचित मला खुप अगोदर माहीत असते तर कर्ण आज हस्तिनापूरचा सम्राट असता, आणि हस्तिनापूरला एक सामर्थ्यशाली व धर्माचा पालन करनारा राजा मिळाला असता, आणि माझीही प्रतिज्ञा पूर्ण झाली असती. मला खंत आहे की असे होऊ शकले नाही.आज सर्व भावंडे एकत्रित,सुखाने व प्रेमाने राहीले असते तर या धरेलाही स्वर्ग बनवले असते यात मला जराही शंका नाही.

पण नियतीला कदाचित  हे मान्य नव्हते.या महाभारतातील महाप्रलयकारी युद्धासाठी मला एक योद्धा म्हणून निवडले आहे हे माझ्या लक्षात आलेले आहे.परमेश्वर याचा रचेता आहे ,ही सर्व त्या भगवंताची योजना आहे आणि आपण त्याचा एक छोटासा भाग. हे युद्ध होणार हे तर निश्चितच होते पण मी हे युद्ध टळण्यासाठी प्रयत्नशिल होतो. अशे अनेक प्रसंग व संधी चालून आल्या पण धृतराष्ट्रपूत्रांनी त्या फेटाळून लावल्या. त्यांना तर फक्त युद्ध हवे होते.

पण त्यांचा हा निर्णय विनाश घडवून आणणारा होता.एखाद्या ज्वालामुखीतून तप्त अग्नी बाहेर पडावा तसा आज माझ्या हृदयातून असह्य वेदना बाहेर येतच होत्या, काही केल्या ते आता थांबने काही शाक्य नव्हते. आज मला तुमच्याशी खूप काही बोलायचे आहे, खूप काहीतरी सांगायचे आहे.

आज अश्रूंनी भरलेले डोळेही माझी साथ सोडू पाहताहेत.डोळे मिटताच रणांगणावरील कल्लोळ कानी पडत आहे सैनिकांना होत असलेल्या असह्य वेदना ऐकू येत आहे.

धर्म- अधर्माच्या या युद्धात मी अधर्माच्या बाजूने उभा होतो, एक सरसेनापती म्हणून आपल्या राज्याच्या सुरक्षितेसाठी,आणि हे माझे कर्तव्य होते. माझ्या वचनामुळे,कर्तव्यामुळे आणि मी मानलेल्या धर्मामुळेच मी या युद्धात सहभागी झालेलो होतो पण माझे मन एका योद्ध्याचे नव्हते.

माझे मन मला या युद्धापासून दूर रहायला सांगत होते पण आपल्या धर्म व वचनाचे पालन करण्यासाठी मला युद्धात सहभागी व्हावेच लागले.या धर्म युद्धात विजय तर धर्माचाच होणार हे ही मी जाणतच होतो कारण धर्माच्या बाजूने साक्षात ईश्वर बसलेले होते.ज्या पक्षाचा सारथी स्वतः परमेश्वर आहेत त्यांचा पराभव शक्यच नाही.

होय ईश्वर, भगवंत,मोरमुकुटधारी,चक्रधारी,मुरारी,माखनचोर,गोवर्धनगिरधारी,परब्रह्म,बासुरीवादक,ब्रह्मांडनायक,वासूदेव श्रीकृष्ण,होय श्रीकृष्ण ,आज वासूदेव श्रीकृष्ण यांनी माझे मार्गदर्शन केले,मला सत्य,धर्म व वचन याचे मार्गदर्शन केले.

आज मला वाटत आहे की का, मी ती प्रतिज्ञा का केली असेल. जर मी योग्यवेळी शस्त्र उचलले असते तर हे सर्व घडलेच नसते.

“आमची पोस्ट Gangaputra Pitamah Bhishma आवडल्यास कमेंट करुन आपल्या मित्रांना  शेअर नक्की  करा. अजुन चांगल्या पोस्ट वाचण्यासाठी FOLLOW AND SUBSCRIBE करा”.
Watch More Stories

8 thoughts on “Gangaputra Pitamah Bhishma मी गंगापुत्र भीष्म”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?