या लेखात आपण सायबर बाबतीत काय काय बघणार आहोत हे थोडक्यात जाणुन घेऊया. आज सायबर क्राईमचा Cybercrime, Cyber incidents वाढत चाललेला प्रकार लक्षात घेता आज आपण वाचकांसाठी हा विषय निवडलेला आहे.

सायबर cyber म्हणजे काय?
सायबर , सायबर क्राईम, सायबर अटॅक असले शब्द आतातर नेहमीच आपल्या कानावर येत असतात. पण आपल्याला सायबर म्हणजे नेमके काय? हे माहित नसते. कुठून आणि कसा बरं आला असेल हा सायबर शब्द.
जगभरात सायबर क्राईम ( सायबर इन्सिडेंट्स) कुठे जास्त आहे?
![]() |
सायबर क्राईम (Cybercrime, Cyber incidents) |
आज संपुर्ण जगभरात सायबर क्राईमची काय परिस्थिती आहे आपणांस माहित आहे का? असो, सायबर क्राईम आज संपुर्ण जगात आपले साम्राज्य प्रस्थापित करत आहे. इंटरनेटचा थेट संबंध जेथे येतो तेथे सायबर क्राईमचा सक्रिय सहभाग असतो.
खाली दिलेल्या आडकडेवारीनुसार हे अगदी स्पष्ट होते कि सायबर हल्ला हा कोणत्या राष्ट्रांमध्ये सर्वाधिक झालेले आहेत. या सायबर हल्ल्यात कोणत्या देशाला किती नुकसान झाले आहे हे पण आपण बघणार आहोत.
सर्व आकडेवारी हि बिलिअन यूएस डॉलर मध्ये आहे.
१. चीन China : अंदाजे ७० बिलिअन यूएस डॉलर
२. ब्राझील Brazil : अंदाजे २८ बिलिअन यूएस डॉलर
३. युनायटेड स्टेटस United States : अंदाजे २५ बिलिअन यूएस डॉलर
४. भारत India : अंदाजे २३ बिलिअन यूएस डॉलर
वरील आकड्यावरुन स्पष्ट दिसते कि चीनचा यात प्रथम क्रमांक लागतो.
जागतिक स्तरावर किती सायबर गुन्हे घडतात?
जागतिक स्तरावर सायबर गुन्हे वाढतच चाललेले आहे. हा आकडा किती असू शकतो हे सांगणे या क्षणाला अवघड आहे मात्र वेगवेगेळ्या संघटनेच्या अहवालावरून एक अंदाज आपण नक्कीच घेऊ शकतो.
कोरोनापासुन सायबर गुन्हयांमध्ये अंदाजे ३००% वाढ झालेली आपल्याला दिसते, त्याचे कारणही तसेच आहे. २०२० पासुन आपला ऑनलाईन वरील Transanction , इंटरनेटचा वापर आणि गैरवापर खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे.
एक हजाराहून जास्त सायबर हल्ले एका हे आठवड्यात नोंदवले जात आहेत आणि हि एक चिंतेची बाब आहे. तज्ञांच्या आधारे २०२५ पर्यंत सायबरमुळे जगात अंदाजे १० ट्रिलियन डॉलर एवढे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.
ब्राझील Brazil , अमेरिका USA , न्यूझीलंड New Zealand या देशामध्ये सर्वात जास्त नोंदी आहेत. या देशातील नागरिकांना सायबर हल्ल्यामुळे बरेच नुकसान सहन करावे लागले आहे.
कोणत्या पाच राष्ट्रांमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
![]() |
सायबर क्राईम (Cybercrime, Cyber incidents) |
जगातील सुरक्षा हॅकर्सचे प्रकार कोणते आहेत?
![]() |
सायबर क्राईम (Cybercrime, Cyber incidents) |
हे सर्व प्रकार वेगवेगळ्या कारणासाठी वापरण्यात येतात. बँक डिटेल्स, गोपनीय माहिती, पैसे, आणि इतर माहितीच्या आधारे पैशासाठी धमकावणे, तुमच्या माहितीच्या आधारे तुमचा व्यवसायावर ताबा घेऊन त्याचा गैरवापर करणे.
जगभरातील सर्वात सुरक्षित ५ राष्ट्रे कोणती?
![]() |
सायबर क्राईम (Cybercrime, Cyber incidents) |
आपण मुख्य ५ राष्ट्राबद्दल येथे बोलणार आहोत, ती राष्ट्रे अनुक्रमे स्वित्झरलँड,डेन्मार्क,नॉर्वे, कॅनडा आणि न्यूझीलंड आहे. या ५ राष्ट्रांमध्ये सुरक्षा खूप चांगली आहे. जगभरातील लोक सुरक्षितेसाठी या राष्ट्रांना प्राधान्य देतात.
सायबर अटॅक चे ५ मुख्य प्रकार कोणते?
![]() |
सायबर क्राईम (Cybercrime, Cyber incidents) |
सायबर क्राईमचा भारताचा कितवा नंबर लागतो?
![]() |
सायबर क्राईम (Cybercrime, Cyber incidents) |
मग आपल्याला “सायबर हल्ल्यामध्ये भारताचा कितवा नंबर लागतो”? हे जाणून घेण्याची उत्सुकता लागणारच.
२०२१ मध्ये एफबीआयने सादर केलेल्या अहवालानुसार सायबर हल्यात भारताचा ४था नंबर लागतो. वाढती लोकसंख्या आणि इंटरनेटचा वाढत चाललेला वापर बघता भारत लवकरच २ऱ्या किंवा ३ऱ्या स्थानावर येईल यात शंका नाही.
भारतामधील काही राज्ये यात अग्रेसर आहेत, तेलंगणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि आसाम. या राज्यात सायबर हल्ल्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.
आपणांस लेख आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. सायबर हल्य्यापासुन बचाव कसा करावा? यावर लेख पाहिजे असल्यास जास्तीत जास्त कमेंट करा. तुमच्या प्रतिसादाने आम्हाला नवीनवीन विषयावर माहिती गोळा करुन तुमच्यापर्यंत पोहचविण्यास उत्साह देतो.