Who is Responsible for Road Accidents अपघात Accidents…. म्हटले की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, आज दररोज काहीनाकाही ऐकायला मिळतेच, असा एकही दिवस नाही की अपघाताविषयी आपल्याला ऐकायला मिळत नाही. अपघात होण्यासाठी जबाबदार कोण रस्ते की आपण स्वत:?
अपघात कुणाचाही असो आपले मन आणि हृदय बेचेन होतेच, हो ना? एखादी अपघाताची वार्ता आपल्या कानावर येताच आपण आपल्याच मनाला नाहींनाही ते प्रश्न विचारण्यास सुरुवात करतो, हो की नाही ?
जसे की कुणाचा अपघात Accidents झाला असेल? त्या व्यक्तीला लागले तर नसेल ना? आपले नातलग तर नसतील ना ? आपल्या मित्रांपैकी तर कुणी नसेल ना ? कुठल्याप्रकरची जीवितहानी तर झाली नसेल ना?
आज आपणास माहीतच आहे जगातील कित्येक नामवंत कलाकार, उद्योजक आणि सर्वसामान्यांना आपले प्राण कार अपघातामध्ये गमवावे लागले आहे? एवढे असुनही आपण एवढे निष्काळजीपणाने कसे राहू शकतो?
सप्टेंबर महिन्यातच भारतातील नामवंत उद्योजक, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कार अपघातामध्ये निधन झाले.
सायरस मिस्त्री (Cyber Mistry death in car accident) यांच्या दुर्दैवी निधनाने भारताचेच नव्हे तर संपुर्ण जगाला व उद्योग क्षेत्राला मोठी हानी झाली आहे. अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आपल्यासाठी अपघात कुणाचा झाला हे महत्वाचे तर असतेच आणि अपघात होण्यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न आज सर्वांनाच पडलेला आपल्याला दिसतो.
या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला विचारण्याऐवजी आपण स्वतःलाही विचारायला हवा.
अपघात कधी, कुठे आणि कसा होणार हे कुणालाच ठाऊक नसते म्हणुन काय आपण बिनधास्त वावरायला पाहीजे असाही होत नाही. अपघातावर नियंत्रण ठेवणे हा एकटया प्रशासनाचे कर्तव्य नसुन आपलेही आहे.
एक नागरिक म्हणुन आपलेही कर्तव्य आहे की आपण कार अपघात थांबवण्यासाठी आवश्यक ते उपाय राबवायला हवे आणि याची सुरुवात स्वतः पासुन करायला हवी.
आज आपण आपली मुख्य जबाबदारी विसरत चाललेलो आहे असे स्पष्ट पहायला मिळते. जर एखादा अपघात झाला असेल तर आपण कधी यामागच्या कारणाविषयी कधी मंथन करतो का? नाही, आपण सरळ प्रशासनाला दोष द्यायला सुरुवात करतो.
खराब रस्ते आपण ताबडतोब दुरुस्त करू शकत नाही कारण ते प्रशासनाचे काम आहे आणि ते त्यांना करू द्या.
आपण आपल्या परिवाराच्या सुरक्षितेसाठी विमा नोंदवून घेने श्रेयस्कर समजतो. स्वतःचा आणि कुटुंबाचा विमा काढून ठेवतो आणि निश्चिंत होऊन बसतो.
विमा केल्याने आपला जीव आपण वाचवू शकू का? फक्त पैशाच्या सहाय्याने आपल्याला झालेल्या नुकसानीची भरपाई होऊ शकेल का? विम्यातून मिळालेल्या पैशाने आपण गमावलेली व्यक्ती पुन्हा मिळवु शकू का? निश्चितच नाही, मग विमा काढणे हा एक पर्याय कसा असू शकतो?
तुम्ही जिवंतच नसाल तर काय फायदा असल्या विम्याचा आणि त्यातुन मिळणाऱ्या रकमेचा, तुमच्या पश्च्यात तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल एवढेच. पण तुम्ही त्यांच्या बरोबर नसणार हे ही तेवढेच खरे.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे
२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC
Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील.
मान्य आहे अनेक ठिकाणी रस्ते आणि त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे याचा जाब विचारण्याचा आपल्याला अधिकारही आहे. पण याबरोबरच आपल्याला यातून योग्य उपाय शोधणे व त्याची अंमलबजावणी करणेही तेवढेच महत्वाचे आहे.
मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, खराब रस्ते हा एकमेव कारण आहे का अपघात होण्यासाठी? हाच प्रश्न तुमच्या अंतःकरणाला विचारा.
नक्कीच नाही, या व्यतिरिक्तही भरपूर कारणे असू शकतील ज्यावर आपल्याला विचार मंथन करण्याची आवश्यकता आहे. मग ते कोणती कारणे असतील? विचार करा.
रस्ते दुरुस्ती करणे हे प्रशासनाचे काम आहे त्यांना त्यांची जबाबदारी चांगलीच माहित आहे आणि त्यांना त्यांचे काम करू द्या.
आपण काय उपाययोजना राबवल्याने कार अपघात कमी होतील याचा विचार आपण करायला पाहीजे असं मला वाटते.
काही कारणे जे कार अपघाताला आमंत्रण देतात, चला तर जाणुन घेऊया कोणती कोणती कारणे आहेत.
सर्वात महत्वाचे कारण असे की आपण वाहतुक नियमांचे पालन करत नाही :
हे खरे आहे की, आपण वाहतुकीचे नियमाचे पालन करत नाही याचाच परिणाम आहे की आज दिवसेंदिवस वाढत असलेली अपघाताची संख्या. सिग्नल सुरु असताना आपल्यातील बरेच लोक सिग्नल सुरु असतानाच पुढे निघून जातात.
यामध्ये दुचाकीस्वाराचे प्रमाण जास्त असते. विरुद्ध दिशेने वाहन वेगात चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त पॅसेंजर बसवून दुचाकी चालविणे इत्यादी.
Who is Responsible for Road Accidents
आवश्यकतेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे:
कार अतिजलदगतीने चालविणे हे ही एक मोठे कारण आहे अपघात होण्याचे. कार अतिजलद गतीने चालवताना आपला ताबा सुटल्याने अपघात Accidents होऊ शकतो.
खराब रस्त्यावर जलदगतीने वाहन चालविणे अपघाताला आमंत्रण देते. अपघात टाळण्यासाठी खराब रस्त्यावर आवश्यक त्याच गतीने वाहन चालवा व आपली तसेच आपल्या परिवाराच्या सदस्यांच्या सुरक्षितेची काळजी घ्या.
सीट बेल्टचा वापर न करणे:
आज आपण बघतो आहे की कार चालवत असताना सीट बेल्टचा वापर न केल्याने कित्येकदा वाहन चालकांना व पॅसेंजरला आपला जीव गमवावा लागला आहे.
आपण कार घेताना एअर बॅगची चौकशी करूनच कार घेतो मग प्रत्यक्षात कार चालवताना सीट बेल्ट का लावत नाही? आपल्याला माहीत आहे की, एअर बॅग तेव्हाच उघडेल जेव्हा तुम्ही सीट बेल्ट लावला असेल. तरीसुद्धा आपण सीट बेल्ट लावण्याचे टाळतो.
आपली सुरक्षा आपल्याच हाती असुन कार चालवताना सीट बेल्टचा वापर करायला शिका आणि इतरानाही सीट बेल्टचा वापर करण्यास प्रवृत्त करा.
Late Night Driving रात्री उशीरा प्रवास करणे ( पहाटे ३ वा. च्या सुमारास):
एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की,अपघात हे उशिरा रात्री होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचे कारण असे की आपण बऱ्याचदा रात्री प्रवास करण्याचे ठरवतो.
पारिवारिक प्रवास असो की कार्यालयीन प्रवास असो की मित्रांसोबत प्रवास असो, आपण प्रवास रात्रीच करण्याचे सोयीस्कर मानतो आणि असं करतोही.
चालकांना शारीरिक तसेच मानसिक त्रासामुळे रात्री उशिरा प्रवास करताना डुलकी लागण्याची जास्त शक्यता असते. हे एक महत्वाचे कारण कार अपघातासाठी असु शकते. त्यासाठी रात्रीचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. शक्य झाल्यास ठराविक अंतरावर अल्पविराम नक्कीच घ्यावा.
आपल्या वाहनांची वेळच्यावेळी निगा न राखणे:
वेळोवेळी आपल्या वाहनाची निगा राखणेही अत्यंत आवश्यक आहे. वाहन एक मशीन आहे आणि मशीनमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो यात तिळमात्रही शंका नाही. म्हणुनच प्रत्येकवेळी प्रवासाआधी आपल्या वाहनांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
मद्यपान करून वाहन चालवणे:
मद्यपान करून वाहन चालवताना अपघात होणे हे एक मुख्य कारण आहे जे की अपघाताला आमंत्रण देते. बहुतांश लोकं मद्यपान करून वाहन चालवतात. यामध्ये तरुणवर्गाचा मोठा वाटा आहे असे दिसते.
अमेरिकेत कार अपघात व मृतांची संख्या:
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये २०१८ साली सर्वात जास्त कार अपघाताची नोंद होती. सुमारे २० लाखाहून अधिक अपघात अमेरिकेमध्ये झालेले आहे त्यापैकी ३० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ३० लाखाहून अधिक लोकांना किरकोळ इजा झाली होती.
जगभर २०२3 या वर्षांमध्ये अंदाजे 15 लाखाहून अधिक लोकांना कार अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले होते.
या लेखामध्ये आपणास Who is Responsible for Road Accidentsअपघात होण्यासाठी जबाबदार कोण रस्ते की आपण स्वत:? या प्रश्नाचे उत्तर आणि कारणे तर समजलीच असेल. जर आपल्याला लेख आवडला असल्यास कमेंट व शेअर करा.